शो मस्ट गो ऑन...
शो मस्ट गो ऑन...
आजीने सुहासला हाक मारली, खूप वेळ झाला पण सुहासचा आवाज काही आला नाही, मग आजी उठून सुहासच्या खोलीत गेली. तो आकांक्षाचा फोटो बघत हरवून गेलेला... आजीने त्याच्या पाठीवर हात ठेवला अन् आजीच्या कुशीत जाऊन तो रडू लागला.... आजीला पण भरून आले पण सुहाससाठी तिने स्वतःला आवरले... असे काय झाले होते चला बघू या.....
आजी म्हणजे मंदा ताई.... आजोबा तसे लवकर गेले... त्यांनी 2 मुलांना वाढवले.... दोघांचे लग्न झाले, मुलगी तर सासरी होती.... आणि मुलगा सुधीर त्याचे लग्न झाले, सून आली... त्यांची ही मुले सुहास आणि आकांक्षा... आज रक्षाबंधन होते... म्हणून तो आपल्या बहिणीचा फोटो घेऊन बसला होता.... आजी आज आपल्या आकांक्षाचा वाढदिवस आहे गं.... आणि रक्षाबंधनला तिला लॅपटॉप हवा होता ना.... हो रे आजी म्हणाली.... आणि दोघे हरवले विचारांत....
मागच्या वर्षी रक्षाबंधन खूप जोरात केले होते त्यांनी... सुट्ट्या लागून आल्यामुळे त्याची आत्या आणि तिचा मुलगाही आला होता.... सगळे फिरायला गेले.... आकांक्षा एकटीच मुलगी म्हणून खूप लाडकी होती..... त्याच्यापेक्षा लहान होती, त्यामुळे रक्षाबंधन, भाऊबीज आली की त्याच्या मागे मागे फिरायची.... दादा मला ना हे हवंय... मला ड्रेस घे.... मोबाइल घे... तिची लिस्ट कधी संपायचीच नाही.... सतत त्याच्यामागे भुणभुण करायची.... तो खूप चिडवत असे मग रडत ती आजीकडे जायची.... तिला माहित होते आजी दादाला ओरडते.... खूप प्रेम होते दोघांचे एकमेकांवर..... अजिबात करमत नसे.....
सुहासची फायनल परीक्षा होती... आणि मावशीकडे लग्न.... आणि आकांक्षाची बारावीची परीक्षा झाली होती.... म्हणून आई-बाबा आणि आकांक्षा तिघे लग्नाला गेले..... आजी आणि सुहास दोघे घरी होते.... आकांक्षाने खूप चिडवले त्याला, आम्ही मज्जा करू तू बसं अभ्यास करत... अगदी जाईपर्यंत दोघे भांडत होते.... शेवटी सुहासने तिचा वीक पॉईंट पकडला.... आणि म्हणाला, आजी, तुला माहीती आहे का या वर्षी रक्षाबंधन आणि कोणाचा तरी वाढदिवस एकाच दिवशी आहे.... आणि मी पर
ीक्षा पास झालो की माझी नोकरी फिक्स.... आणि माझा पगार होईल... मग त्या पगारात कोणाला तरी लॅपटॉप हवाय.... कारण डबल सेलेब्रेशन आहे.... ते ऐकले आणि आकांक्षा त्याला सॉरी बोलली मस्का मारत होती....
आजी हसली.... आणि म्हणाली, तुम्ही दोघे ना सारख्याला वारखे आहात.... खरंच किती मस्ती करता रे लहान आहात का आता...???? आजीचे डोळे आनंदाने भरून आले.... मनात म्हणाली, असेच प्रेम राहू दे रे... पण नियतीसमोर कोणाचे चालते का...???? त्यांच्याबाबतीत पण व्हायला नको तेच झाले....
लग्न लावून घरी येताना गाडीचा अपघात झाला आणि त्यामध्ये त्याचे बाबा आणि आकांक्षा दोघे जागीच गेले..... आई कोमात गेली अजून काहीच सुधारणा नव्हती तिच्यात... आणि आजचा हा दिवस आला... म्हणून त्याला खूप आठवण येत होती आकांक्षाची... तिचा वाढदिवस आणि रक्षाबंधन एकत्र होते... म्हणून लॅपटॉप घेऊन देणार होता तिला.... खूप रडला आजी जवळ.... आजी त्याला समजावून सांगत होती.... आता जे झाले ते तर बदलू नाही शकत.... तू आता सावर... तुझ्यावर माझी आणि तुझ्या आईची जबाबदारी आहे.... जीवन असेपर्यंत ते जगायला हवं... कोणासाठीही आयुष्य थांबत नाही रे, ते म्हणतात ना 'शो मस्ट गो ऑन....'
आपल्या सगळ्यांच्या मनात आठवणी राहतील कायम पण त्यात गुंतून राहू नकोस... पुढे हो.... आणि नवीन आठवणी बनव.... चल आज बाहेर किती तरी आकांक्षा आहेत ज्यांना गरजू वस्तू मिळत नाहीत.... आपण दरवर्षी त्यांना घेऊन रक्षाबंधन साजरे करू....
तुझी आईपण वाट बघतेय तुझी... चल तिला भेटायला.... तिच्याशी बोलून बोलून तिची तब्येत सुधारणार आहे.... तिला आपल्याला काही सांगायचं नाही आहे खरं.... आता तरी.... तिला सगळं माहित नाही... आणि ती बरी होईपर्यंत आपल्यालाच सत्य लपवून ठेवायचे आहे.... आपण सांगूं तिला तुमचे रक्षाबंधन झाले.... राखी बांध ही.... दाखव तिला....
सुहासला पटतं.... तो फ्रेश होतो.... आणि म्हणतो आजी खरं आहे तुझे.... शो मस्ट गो ऑन..... आणि डोळे पुसतो....