शिक्षकांचा आशीर्वाद -राग
शिक्षकांचा आशीर्वाद -राग
ज्ञानाचे माहेरघर मानल्या जाणाऱ्या पुण्यातील एका लहानशा गावात कोथरूड येथे घडलेली ही घटना. निसर्गाच्या कुशीत वसलेले हे गाव लहान असले तरी याची कीर्ती मात्र फार मोठी आहे. गिनीस बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये अनेकदा या गावाचे नावही आले आहे. हे गाव नेहमीच जनतेचे लक्ष वेधून घेत असते.
याच सुंदर गावात एका ज्ञानाच्या मंदिरात घडलेली ही घटना. सरस्वती विद्यालय ही या गावातील एक सुंदर शाळा. सर्वज्ञ नावाचा एक मुलगा होता. सर्वज्ञ इयत्ता सातवी मध्ये असताना या शाळेत आला होता. तो इयत्ता दहावी शिकत होता. सातवी पासूनच त्याला मराठी हा विषय शिकवायला अपर्णा हिंगे या शिक्षिका होत्या.
या शाळेतील सर्वाधिक कडक शिक्षिका म्हणून अपर्णा हिंगे या ओळखल्या जात होत्या. वर्ग शिक्षिका म्हणून चार वर्षे सर्वज्ञच्या वर्गाला अपर्णा हिंगे याच शिक्षिका मिळत होत्या. प्रत्येक वर्षी सर्वज्ञ देवाकडे या शिक्षिका नको म्हणून प्रार्थना करत असे.
सर्वज्ञ हुशार होता. त्याच बरोबर तो शाळेतील सर्व शिक्षकांचा आदरही करायचा. पण अपर्णा हिंगे त्याच्याही न आवडत शिक्षिका होत्या. अपर्णा मॅम सर्वांवरच रागवायच्या पण सर्वज्ञवर थोडं जास्तच रागवत होत्या. म्हणून त्याला त्यांचा अधिकच राग यायचा. इयत्ता दहावीत सर्वज्ञला ९९% मिळाले. सर्वज्ञ जेव्हा मॅमला पेढे द्यायला गेला तेव्हा त्यांनी पेढा घेतला नाही. त्या सर्वज्ञला म्हणाल्या, " मी हा पेढा तेव्हाच घेईल तेव्हा तू आयपीएसच्या नात्याने हा पेढा देशील. म्हणून आता तू जा." सर्वज्ञला मॅमच्या खूप राग आला होता.
१५ वर्षे होऊन गेली. सर्वज्ञ एक प्रसिद्ध आयएएस ऑफिसर झाला होता. त्याच्या मनात अपर्णा हिंगे यांना भेटण्याचा विचार आला. तो शाळेत गेला. शाळेत गेल्यावर त्याला समजले की अपर्णा हिंगे मॅमला शाळा सोडून ५ वर्षे झाली होती. त्याचबरोबर त्याला आणखी एक सत्य समजले जे ऐकून त्याला खूप मोठा धक्का बसला.
सर्वज्ञला मुख्याध्यापक म्हणाले, " कामाला जाण्याआधी मॅमला नक्की भेटून जा कारण आज ही पदवी तुला त्यांच्यामुळेच मिळाली आहे." सर्वज्ञने विचारले, " तुम्ही असे का बोलत आहात सर?" मुख्याध्यापक म्हणाले, " बाळा, आठवीत असताना तुझे आईवडील गेले. तुला तुझ्या आजीने सांभाळले. तुझी आजी तुला शिकवू शकत नव्हती पण तू शिष्यवृत्तीच्या जोरावर शिकलास असे तुला वाटते, बरोबर ना? पण हे सत्य नाही. तुला शिष्यवृत्ती मिळाली नव्हती. जे काही पैसे तुला शाळेकडून मिळत होते ते खरे तर मॅमच्या पगारातले पैसे होते. त्यांची परिस्थिती फार सुखद नव्हती. तरीही तुझी जिद्द पाहून त्यांनी तुला शिकवले. तुझ्यापासून हे सत्य लपवण्याचे वचन त्यांनी माझ्याकडून घेतले होते. पण मी आज स्वतःला थांबवू शकलो नाही. जा जाऊन भेट एकदा त्यांना."
सर्वज्ञचे डोळे पाणावले होते. मॅम त्याच्याशी कडकपणाने का वागायच्या या प्रश्नाचे उत्तर मिळाले होते. मॅमला कधी भेटतोय असे त्याला वाटत होते. त्यांच्या पाया पडून त्यांची माफी मागायची होती. सर्वज्ञ लगेच त्यांच्या घरी गेला. त्यांच्या घराच्या बाहेर भयान शांतता पसरलेली होती. सर्वज्ञ घरात गेला. तेव्हा सर्वज्ञला कळाले की मॅमला कॅन्सर होता. त्यांच्याकडे आता खूपच कमी वेळ उरला होता. त्याने जाऊन मॅमचे पाय पकडले व म्हणाला, " मला माफ करा. आज मला कळाले की तुम्ही किती महान आहात. तुमच्यासारखा गुरु मिळणे सौभाग्याची गोष्ट आहे. तुमचा ओरडाच हा माझ्यासाठी सर्वात मोठा आशीर्वाद आहे. मला एकदा तुमचा आशीर्वाद द्या.
ज्या व्यक्तीने गेल्या महिन्यापासून हालचाल केली नव्हती ती तिच्या विद्यार्थ्यांचा आवाज ऐकून चक्क बोलायला लागली. त्या म्हणाल्या, " अरे गाढवा! कधी अक्कल येईल तुला देव जाणे. कधी मोठा होशील तू? आता चांगलं काम कर. सगळ्यांचे भलं कर." घरातली व तिथे असणारी सर्व लोक हा आवाज ऐकून थक्क झाली होती कारण आज एका गुरुने त्यांच्या शिष्याचा आवाज ऐकला होता. सर्वज्ञने त्यांचे पाय पकडले व म्हणाला, " गुरू पूर्णिमा:गुरू ब्रह्मा गुरू विष्णु, गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः" हे ऐकून त्यांनी आनंदात डोळे मिटले.
