STORYMIRROR

Ricky Bangar

Inspirational

4  

Ricky Bangar

Inspirational

शिक्षकांचा आशिर्वाद - राग

शिक्षकांचा आशिर्वाद - राग

3 mins
375

        ज्ञानाचे माहेरघर मानल्या जाणाऱ्या पुण्यातील एका लहानशा कोठरूड गावात घडलेली ही घटना. निसर्गाच्या कुशीत वसलेले हे गाव लहान असले तरी याची कीर्ती मात्र फार मोठी आहे. जीनियस बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये अनेकदा या गावाचे नावही आले आहे. हे गाव नेहमीच जनतेचे लक्ष वेधून घेत असते.

         याच सुंदर गावात एका ज्ञानाच्या मंदिरात घडलेली ही घटना. सरस्वती विद्यालय ही या गावातील एक सुंदर शाळा. सर्वज्ञ नावाचा एक मुलगा होता. सर्वज्ञ इयत्ता सातवी मध्ये असताना या शाळेत आला होता. तो इयत्ता दहावीत शिकत होता. सातवी पासूनच त्याला मराठी विषय शिकवायला अपर्णा हिंगे या शिक्षिका होत्या.

        या शाळेतील सर्वाधिक कडक स्वभावाच्या शिक्षिका म्हणून अपर्णा हिंगे या ओळखल्या जात होत्या. वर्ग शिक्षिका म्हणून चार वर्षे सर्वज्ञच्या वर्गात अपर्णा हिंगे या शिक्षिका होत्या. प्रत्येक वर्षी वर्गातील सर्व मुले या शिक्षिका नको म्हणून देवाकडे प्रार्थना करत असायचे. 

        सर्वज्ञ हुशार होता. त्याचबरोबर सर्व शिक्षकांचा तो आदर ही करायचा. पण अपर्णा हिंगे त्याच्या ही नावडत्या शिक्षिका होत्या. अपर्णा मॅम सर्वांवरच दाखवायच्या पण सर्वज्ञवर थोडं जास्त, म्हणून त्याला त्यांचा अधिकच राग यायचा. इयत्ता दहावीत सर्वज्ञला ९९ % मिळाले. सर्वज्ञ जेव्हा मॅमला पेढे द्यायला गेला तेव्हा त्यांनी पेढा घेतला नाही. त्या सर्वज्ञला म्हणाल्या, " मी हा पेढा तेव्हाच घेईल तेव्हा तू आयएएसच्या नात्याने हा पेढा देशील." सर्वज्ञला खूप राग आला होता.

        १५ वर्षे होऊन गेली. सर्वज्ञ एक प्रसिद्ध आयएएस ऑफिसर झाला होता. त्याच्या मनात अपर्णा हिंगेंला भेटण्याचा विचार आला. तो शाळेत गेला. शाळेत गेल्यावर त्याला समजले की अपर्णा हिंगेंना शाळा सोडून ५ वर्षे झाली होती. त्याच बरोबर त्याला आणखी एक सत्य समजले जे ऐकून त्याला आश्चर्याचा धक्का बसला. 

        सर्वज्ञला मुख्याध्यापक म्हणाले, " कामाला जाण्याआधी मॅमला नक्की भेटून जा कारण आज ही पदवी तुला त्यांच्यामुळेच मिळाली आहे." सर्वज्ञने विचारले, " असं का बोलत आहात तुम्ही सर." मुख्याध्यापक म्हणाले, " बाळा, आठवीत असताना तुझे आईवडील गेले. तुला तुझ्या आजीने सांभाळले. तुझी आजी तुला शिकवू शकत नव्हती पण तू शिष्यवृत्तीच्या जोरावर शिकला, असेच वाटते ना तुला? पण हे सत्य नाही. तुला शिष्यवृत्ती मिळाली नव्हती. जे काही पैसे तुला शाळेकडून मिळत होते ते मॅमच्या कष्टांचे पैसे होते. त्यांची परिस्थिती फार सुखद नव्हती. तरीही तुझी जिद्द पाहून त्यांनी तुला शिकवले. मला त्यांनी तुला हे सत्य न सांगण्याचे वचन घेतले होते. पण मी आज स्वतःला थांबवू शकलो नाही.

        हे सर्व ऐकून सर्वज्ञ सुन्न झाला. त्याला‌ मॅम त्याच्याशी कडकपणाने का वागायचे याचे उत्तर मिळाले होते. मॅमला कधी भेटतो असे झाले होते. सर्वज्ञ मॅमच्या घरी गेला. तिथे भयान शांतता पसरलेली होती. तो घरात गेला. त्याला कळले की मॅमला कॅन्सर होता व त्यांच्याकडे फार कमी वेळ उरला होता. त्याने जाऊन मॅमचे पाय पकडले व म्हणाला, " मला माफ करा. आज‌ मला कळले की तुम्ही किती महान आहात. मॅम, तुमचा ओरडा हाच माझ्यासाठी सर्वात मोठा आशिर्वाद आहे. मला आशिर्वाद द्या."

       मॅम मोठ्यने म्हणाल्या, "अरे गाढवा! कधी मोठा होशील तू. कधी अक्कल येईल काय माहीत?" आजुबाजुची लोकं आवाज ऐकून थक्क झाली कारण ज्या बाईला काल पर्यंत कोणताच आवाज येत नव्हता, तिने आज तिच्या विद्यार्थ्याचा आवाज ऐकला. सर्वज्ञ मॅमच्या पायांवर पडला व म्हणाला, " गुरू ब्रह्मा गुरू विष्णु, गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः" हे ऐकून मॅमने आनंदात डोळे मिटून घेतले.



Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational