STORYMIRROR

Ricky Bangar

Children Stories Inspirational

2  

Ricky Bangar

Children Stories Inspirational

शिक्षकांची देणगी

शिक्षकांची देणगी

1 min
56

        कोणत्याही माणसाच्या जीवनात दोन ठिकाणे खूप महत्त्वाची असतात. एक म्हणजे त्याचे घर आणि दुसरी म्हणजे त्याची शाळा. शाळा हे नाव जेव्हा कानावर पडते तेव्हा मी, आपण सर्व मनोमनी विद्यार्थी जीवनात जाऊ लागतो. शाळेत केलेली मस्ती, भांडणं, मैत्री तर नक्कीच आठवते, पण त्याचबरोबर आपली शिक्षक ही आठवतात. 

        काही शिक्षक आपल्याला आवडणारे असतात तर काही न आवडते. कधी हे शिक्षक आपल्याला ओरडतात तर कधी आधारही देतात. माझ्या ही आयुष्यात असे अनेक शिक्षक होते. पण प्रामुख्याने मला शिक्षकांबद्दल आवर्जून सांगावेसे वाटते.

        सर्वप्रथम आमच्या इयत्ता नववीच्या मराठीच्या शिक्षिका स्वाती कुटे मिस. आमच्या शाळेतील सर्वात कडक स्वभावाच्या शिक्षिका. आमच्याशी नेहमी रागावून बोलत पण त्यांच्यामुळे आम्हाला शिस्त लागली. एकदा आम्ही लेखक शंकरराव खरात यांचा 'माझे शिक्षक व संस्कार' हा पाठ शिकवत असताना आमच्यातील तमाशा व लावणी या दोन कलेंबद्दलचा दृष्टिकोन बदलून टाकला. त्यांचं म्हणणं होतं या कला चांगले आहे पण यांना दूषित रूप समाजातील काही वाईट माणसांनी दिले आहे.

        आमच्या शाळेतील इयत्ता दहावीच्या शिक्षिका अस्मिता खुडे मिस. त्याही मराठी विषय शिकवायच्या पण त्यांच्याकडून कळत आणि नकळत मिळालेले ज्ञान कधीही न संपणारी आहे. रोज वर्गात आल्या की आम्हाला मेडिटेशनला बसवायच्या. त्यांच्यामुळे आम्हाला मेडिटेशनची सवय लागली. पुस्तकीय ज्ञानाबरोबरच आम्हाला त्यांनी अध्यात्मिक ज्ञानही दिले. ज्या गोष्टी आपल्याला येत नाहीत त्या बिनधास्तपणे आम्हाला विचारायला शिकवल्या. याची सुरुवात त्यांनी स्वतःपासून केली. इंग्लिश मधले शब्द लिहिता वाचता येत नव्हते ते शब्द त्या आम्हाला विचारायच्या. 

        खरोखरंच या शिक्षकांचे आमच्यावर कधीही न फिटणारे ऋण आहे. 



Rate this content
Log in