STORYMIRROR

Vilas Yadavrao kaklij

Tragedy

3  

Vilas Yadavrao kaklij

Tragedy

शेवटी मृत्यही शांत झाला

शेवटी मृत्यही शांत झाला

2 mins
235

आज अचानक शरीरात भंयकर काहुर माजले इतक्या वेदना कि सांगणे शक्य नाही. कोणत्या अवयवावर हल्ला हेही सांगता येत नाही मात्र पहाणाऱ्याच्या अंगावर शहारे येत . समोर थांबू शकत नाही एखाद्या जिवंत प्राण्याचे लचके इतर प्राणी तोडतात आणि समोर बघुन आपण काहीच करू शकत नाही ? हे बघुन शरिरात दाह निर्माण होतो . अगदी तसेच जिवंत हरणाच्या पाडसाचे सिंह लचके तोडतो डोळयासमोर तसेच डॉक्टरानी सारे देवावर सोपवले होते आमचे विज्ञान . प्रयत्न संपले आम्ही अगतिक आहोत . घरातल्यांना . ज्यांना आपण आयुष्यभर आपले म्हणतो त्यांच्यासाठी सारे आयुष्य संपत्ती अर्पण करतो स्वतःच्या पोटाला चिमटा देवून प्रसंगी सारे सुख खुशी अर्पण करतो त्यांनाच आज वाटतेे देवा यांना आयुष्य नको पण हे हाल थांबव?


मात्र नियतीने ठरवल्याप्रमाणे सर्व काही भोगल्याशिवाय या देहापासूून मुक्ति नाही आपल्या जन्मातील सर्व कर्मे भोगल्या शिवाय सुटका नाही हे फक्त ऐकले होते. आज मात्र डोळ्यांनी अनुभवत .. होतो . समोर मृत्युचे आमंत्रण देवून गेला होता फक्त केव्हा उचलणार हे मात्र नियतीच्या तराजूत काही कर्माची फळे प्रत्येक तासाला टाकत होतो कोणत्या क्षणी बॅलन्स होईल तो या आयुष्याचा .मानवी जीवनाचा शेवटचा क्षण असेल घडयाळाकडे बघत व माझा श्वासाकडे बघून सर्व अंदाज घेत होते . अर्थात सर्वाच्यां जीवनात हे घडणार मात्र निदान नियतीने आमंत्रण दिले नव्हते. आयुष्यभर शांत स्वभाव ना कुणाची खंत ना कुणाला त्रास सतत हसत मुख असणारा मित्र सांसारिक सुखदुःख न शेअर करणारा दुःख लपवून शांत रहाणारा शेवटपर्यत शांत राहिलास मित्रा अगदी शेवटी क्षणाक्षणाला जळत राहिला मात्र आग आणि ज्वाळा ही शांत धग मात्र आम्हाला जाणवायची पण शांतता मात्र ढळू दिली नाही शांततेत शेवटी दवाखान्यात गेला शांततेत आणि तिथेच कायमचा शांत झालास परत ना घरी ना दारी आलास परस्पर शांततेत ना जवळच्यांना दर्शन ना शेवटचे पाणी घेतले .ना प्रेतयात्रा ना अंत्ययात्रा घरीही सर्वांना शांत करून गेला ना आक्रोश ना दुःख 'ना सांत्वन ना भजन, ना किर्तन का? मित्रा शेवटी मृत्युलाही शांत करून गेला . "शेवटी मृत्युही शांत झाला "


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy