Pradnya deshpande

Inspirational

4.3  

Pradnya deshpande

Inspirational

शब्दांच माहेर पुस्तक

शब्दांच माहेर पुस्तक

1 min
242


जादूगार हा साहित्यातला

कला असे अवगत 

पेटीत दडवले सारे विश्व

ही जादूची ताकत


पुस्तक म्हणजे काय ?असा प्रश्न जर विचारला तर प्रत्येकाचे उत्तर वेगवेगळे येईल .कोणी म्हणेल माझा गुरु, माझा मित्र ,माझा सखा ,सोबती इत्यादी पण माझ्या दृष्टीने तर पुस्तक हा जादूगार आहे. प्रत्येक रुपात भेटतो त्याच्या शब्दांची आपल्यावर अशी काय जादू करतात  एका वेगळ्याच जगात घेऊन जातात हे आपलं आपल्याला सुद्धा कळत नाही

आभासी जग हे

कवेेत मला घेते

सारे विसरून मी

स्वाधीन तुला होते

 सूर्य आपल्या किरणांनी फुुलं उमलत असतो, नवीन बी रुजण्यासाठी जेवढी धूप लागते ती पुरवत असतो परंतु ते फुल व बीज यांच्यावर किरणांचे संस्कार होणे महत्त्वाचे असते . अगदी तेच काम पुस्तक करत असतात. 

हळूहळू तेे जीवनाचा भाग होतात वाचता वााचता त्यांच्यात हरवून जाणं आवडू लागतं.

पुस्तकांनी दिलेलं दान म्हणजे ज्ञान होय हे देणं आपण कसं काय उतराई होऊ शकतो याचा विचार केला आणि मग ठरवलं आता इथून पुढे भेट म्हणून पुस्तकच द्यायचं


 शब्दांची दाटी झाली

गर्दीतून वाजली तुतारी

मी येतोय बाहेर

शोध माझं माहेर

घे मला उचलून

माझी जागा पाहून

तू कुठे ठेवशील?

का नुसताच घेऊन फेकशील

पुस्तकच माझं घर

मी होईन अमर

मी होईन अमर



Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational