पाऊस
पाऊस
लहानपणापासूनच पहिल्या पावसाची ओढ वाटत असते. तो कधी येतोय आणि आम्हाला पावसात कधी एकदाची भिजायला मिळते असे वाटत असते. लहानपणी किती मुक्त होऊन पावसात भिजायचं ,चिखलातून बेडकाच्या मागे उड्या मारायचे ,साठलेले पाणी पायाने उडवायचे अगदी मोकळ्याा मनाने खेळायचे. कोणाला काय वाटेल "मी कशा उड्या मारायच्या, कसे दिसेल ते ;कपडे घाण होतील का माझे?" अशा कोणत्याही प्रकारच्या शंका-कुशंका मनात आल्या नाहीत. मला मात्र या सर्वांचे खूप आकर्षण आहे, मला पाऊस खूप आवडतो मी मुलांना घेऊन गच्चीवर जाते आणि पावसात चिंब भिजते मनसोक्त आनंद लुटाते. मुलांची आई असले तरी हा आनंद घेतल्याशिवाय राहात नाही.
असेच मत मला आयुष्य जगण्याबद्दल आहे तेही असेच आनंदाने जगायला हवे लोकांना काय वाटेल याचा विचार करू नये हा पण हा आनंद खरा न्यायी आणि संस्काराला धरून असावा.
पाऊस येतो घेऊनी आनंद,
भिजून घे क्षण प्रत्येक चिंब,
जगणे आहेे थेंब प्रसंगाचे
बरसुनी येते सुख-दुःखाचे
नश्वर देह जाईल एक दिन
उगाच कशाला दवडे क्षण
हर्ष आहेे अभिजण्यातला
नको करू कदा संकोच
मोकळे मन झरू दे आता
पुन्हा नव्याने दिस उगवता
