STORYMIRROR

Pradnya deshpande

Others

4  

Pradnya deshpande

Others

उब मायेची

उब मायेची

1 min
373

नमाच्या लग्नाला पंधरा वर्षे पूर्ण झाली होती. तिला संधीवाताचा आजार होता .थंडीच्या दिवसात तो जास्तच तीव्र होई .किती आयुर्वेदिक उपचार केले ,मालिश केले, औषध घेतली ,शेक दिले ,नाना उपाय केले तरीही दुखणे काही थांबत नव्हते, एकदा तिची आई तिला भेटायला आली. येताना डिंकाचे लाडू ,अळीव लाडू घेऊन आली. आई स्वतः तिची काळजी घेऊ लागली ;आणि काय गंमत तिचं दुखणं लगेच कमी झालं कुडकुडणाऱ्या थंडीत गोठणाऱ्या मनाला आज खऱ्या अर्थाने मायेची उब मिळाली.


Rate this content
Log in