Pradnya deshpande

Inspirational

4.1  

Pradnya deshpande

Inspirational

पणती उजळली

पणती उजळली

2 mins
200


भिंतीला टांगलेला रामूचा फोटो पाहून आजी ढसाढसा रडू लागली. तिचा एकुलता एक लोक दिवाळीच्या सणाला 'हार्ट अटॅक' येऊन कायमस्वरूपी तिला सोडून गेला होता. आता या घटनेला खूप वर्ष लोटली होती पण आजी विसरली नव्हती.


  घरातला कर्ता पुरुष गेल्यानंतर कुटुंबाची हालत; आगीत हळूहळू धुपत जळणाऱ्या पाचोळ्यासारखी होते .

सीता (सुनबाई) इवलुशा दीड वर्षाच्या रखमाला कडेवर घेऊन दारोदार कामासाठी भटकू लागली. त्यांचा दिवाळी सणाला पणत्या बनवून विकण्याचा पारंपारिक व्यवसाय होता, पण त्याची विक्री वर्षातून एकदाच होत असे त्यामुळे या धंद्यावर पोट भरू शकेल एवढी मिळकत येत नसे.

हळूहळू रखमा मोठी होत होती व आईच्या कामात मदत करत होती.. शाळेत पण तेवढीच हुशार होती. दहावीत रखमा 95 टक्के गुण मिळवून केंद्रात पहिली आली. आजीला रखमा मोठी झाल्यामुळे तिच्या लग्नाची चिंता वाटू लागली .सारखी सीताच्या मागे लागे "रखमासाठी चांगला मुलगा बघुन लवकरात लवकर लग्न करून टाकूया." परंतु रखमाला अजून पुढे शिकायचे होते. मोठ्या पगाराची नोकरी करून घरची परिस्थिती सुधारायची होती. आईला सुखाचे दिवस द्यायचे होते आणि आजीचे डोळ्याचे ऑपरेशनही करायचे होते खूप विनवणी केल्यानंतर सीता रखमाच्या पुढील शिक्षणासाठी तयार झाली परंतु शहरात राहून शिक्षण पूर्ण करणे भाग होते त्यासाठी पैसाही लागणार होता. रखमाच्या जिद्द व चिकाटीने तिला मार्ग दाखवला. रखमाने शिकत शिकत नोकरी केली व स्वतः कमवून आपले शिक्षण पूर्ण केले.

रखमा आयटी इंजिनियर झाली भरपूर पगाराची नोकरी मिळाली तिने आजीच् डोळ्याचे ऑपरेशन केले , नवीन घर बांधले. रखमाचा जॉब तालुक्याच्या ठिकाणी होता दिवाळी सणाला तिने घरी यावे अशी आजीची खूप इच्छा होती. आजीला व आईला सरप्राईज द्यायचे म्हणून रखमा न कळवताच दिवाळी दिवशी आली, तेव्हा संध्याकाळची वेळ होती आजीने पणत्या स्वच्छ करून वाती घालून ठेवल्या होत्या रखमाला बघताच आजीचा आनंद गगनात मावेनासा झाला. आजीने तिला कडकडून मिठी मारली

आणि मुखातून एक सारखं उच्चारत राहीली," माझी पणती उजळली ,माझी पणती उजळली"..



Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational