Pradnya deshpande

Tragedy

4.0  

Pradnya deshpande

Tragedy

डोह मायेचा

डोह मायेचा

2 mins
108


आजी म्हणजे नातवंडांसाठी संस्कारांच व्यासपीठच आहे. लहानपणापासून कृष्णाच्या, रामाच्या गोष्टी सांगणे, ,अंगाई गीत गाणे, तिच्या लहानपणीचे चुटकुले सांगणे यामधून बरच काही आम्ही नातवंडे शिकत गेलो


चेहरा हसरा, चंदेरी केसांचा छोटासा अंबाडा, त्यामध्ये चांदीचा आकडा. गुंडगुळ्या अंगाची नऊवारी लुगडयातली गोरीपान माझी आजी खूप सुंदर दिसायची.


आजोबा लवकर वारल्यामुळे त्यांची माया, प्रेम मिळाले नाही. काही गोष्टी आई-वडिलांशी मोकळेपणाने बोलण्यात दडपण यायचे; परंतु आजीशी बोलण्यात कधीच ते जाणवले नाही आमचे काही चुकले तर मायेने प्रेमाने सांगायची तिने समजावले तर कधीही राग यायचा नाही .


जसजशी मी मोठी होत गेले तस तसे त्या वयातले अनुभव मला सांगायची . तिच्या जीवनात आनंदाचे दुःखाचे प्रसंग खूप आले; पण तिने न डगमगता नेटाने संसार केला तिच्या अनुभवाची शिदोरी प्रसंगी आईलाही उपयोगी पडते . 


वृद्धापकाळात छोट्या छोट्या गोष्टीही मनाला लागतात, मन हळवेेे नाजूक झालेले असते. त्यांच्यात जणू एक लहान मुलच दडलेले असते . उरलेले आयुष्य नातवंडाची पापी घेऊन मिळणार या आनंदात घालवायचे असते. ती फक्त मायेची भुकेली असतात. आपल्या लहानपणीचेे रुसवे-फुगवे, हट्ट लाडाने पुरवले हे सर्व करण्यात कधीच ,थकली नाही ,आपणही तिच्या उतारवयातील रुसवे,फुगवे ,हट्ट अलवार हाताने ,मायाळू स्पर्शाने त्यांचेे सर्व रिते क्षण आनंदाने भरूया .


मायेच्या डोहातून उगवलेला असा हा मायेचा वटवृक्ष नातवंडांनी बहरलाय तिने दिलेले हळवे मायाळू क्षण तोरंबा बनून माझ्या जीवनात सदैव झुलत राहतील .


मायची माऊली ,तू डोह मायेचा

किती तळ मोजूू ,न अंत याचा

अनुभवाचा बटवा ,नाना औषधी

त्या त्याा प्रसंगी, पडे उपयोगी

किती जाहलो मोठे परी,

हवी तुझी उबदार मांडी ,

खूप झाला शिण आता,

झोप आली, गा अंगाई

आजी ,ग आजी

आजी, ग आजी....


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy