Deepti Gokhale

Classics

4.0  

Deepti Gokhale

Classics

शाळा माऊली

शाळा माऊली

2 mins
150


6 नोव्हेंबर 2022 हा दिवस माझ्यासाठी खूप महत्त्वाचा होता. मी अगदी आतुरतेने या दिवसाची वाट पहात होते , हो ना कारणच तसे होते ... महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या सातारच्या कन्या शाळेचे शताब्दी वर्ष चालू होते आणि त्यानिमित्ताने शाळेमध्ये माजी विद्यार्थीनींचा मेळावा आयोजित केला होता.

  शाळेत जायचे म्हणून खूप उत्साही होते.मी 

आणि माझ्या दोन मैत्रिणी स्नेहल आणि श्वेता मिळून शाळेत

गेलो आणि समोर दिसले ते आमचे चित्रकलेचेे 

ढाणे सर..काय सांंगू किती आनंंद झाला ते.सर  

पण अगदी छान हसतच सामोरे आले आणि माझे नाव घेऊन ," काय देशमुख ,कशी आहे?कुठे असतेस ? काय करतेेेस ?" ही सगळी चौकशी करत होते. सरस्वती देवीला नमस्कार करून आत जाताना मन अगदी९६,९७,९८ सालामधे गेलं.

  शाळेतल्या शिक्षकांनी गुलाबाचे फुल देऊन 

सर्व माजी विद्यार्थिनींचे स्व्वागत केेेले.चहा व नाष्टा करून आम्ही चौकात आलो .आणि शाळेची घंटा वााजली.आहाहा काय सुंदर क्षण होता तो.. आम्हा सगळ्याांंच्या आग्रहाखातर शिपाईकाकांनी परत एकदा घंटा वाजवली 

आणि कार्यक्रमाला सुरुवात झाली. आण्णांंच्या पुर्णाकृती पुतळ्याला 100 दिव्यांंनी औक्षण करून , हार घातला .. नंतर मान्यवरांंची भाषणे आणि अनेक कार्यक्रम झाले .. शाळेत दुुपारी स्नेहभोजन होते..पण खरी मजा ही नवतीच ...

  खरी मजा होती मैत्रिणींंना भेटण्यात आणि शिक्षकांंना भेटण्यात... जसजसे शिक्षक 

आणि आम्ही मुली एकमेकांंशी संवाद साधू लागलो तशा अनेक आठवणी माझ्या भोवती पिंगा घालू लागल्यया. एकमेकींना चिडवणे,रडवणे, वाटून खाल्ल्लेले आणि सांडलेले डबे , खाल्लेल्य्या छड्या आणि 

छड्या चुकवते म्हणून अजुन वाढलेेली शिक्षा.. बेगमपुरे बाई तर मला खूप आवडायच्या. मी डब्यातले आंब्याचे लोणचे चालू तासात त्यांंच्या नकळतपणे खायचे अशी पैज लावायचे. हा माझा नित्यनेमच होता .. बेगमपुरे बाईंनी हे खूप वेळा पाहिले होते . एकदिवस त्यांनी मला ऑफिस मधे बोलवून चांगलाच शाब्दिक प्रसाद दिला होता .. अशा एक ना अनेेक आठवणी मनात घेऊन आम्ही सर्वजणी आजी आणि माजी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांना भेटत होतो ,सगळ्यांची चौकशी करत  होतो.इतक्या वर्षाांनी शिक्षकांनी आपल्याला नावासह,गुणदोषांसह ओळखलेे , लक्षात ठेवलेे याचा आनंंद काय सांगू? आपापल्या वर्गात जाऊन आपल्या बेंचवर बसुन आम्ही फोटो काढत होतो आणि त्या अवखळ मुलींचे जीवन जगत होतो.. एकमेकींची थट्टा मस्करी करत होतो. प्रत्येक जण आठवणींमध्ये रमलो होतो . वेगवेगळ्या गेम्समध्ये सहभागी होत होतो. असे करता करता पाच वाजले आणि आता घरी जायची वेळ झाली, नकळत डोळे पाणावले. आता माऊलीला सोडून जाण्याची वेळ झाली होती. माहेरी आलेल्या मुलीची सासरी जाताना जशी घालमेल होते, अगदी तसेच होत होते. पण नाईलाजाने निघावे लागणार होते. अण्णांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुन्हा एकदा नमस्कार केला. शिक्षकांना भेटून, नमस्कार करून, मैत्रिणींना परत परत भेटण्याचे कबूल केले आणि घरी जाण्यासाठी निघालो. पावले जड झाली होती. पण... 

   मी, स्नेहल आणि श्वेता राजवाड्यावर गेलो. सुपनेकरांचा वडा खाऊन रिक्षाने घरी गेलो. लेकरं वाट बघत होती. . त्यांना खूप प्रश्न विचारायचे होते संपूर्ण दिवसभरातील घडामोडींबद्दल. 

अशा रितीने आम्ही कन्या शाळेचा महामेळावा उत्साहात म साजरा केला... विद्यार्थी दशा ही आयुष्यात सर्वात महत्वाची असते. आयुष्यभर तुम्ही काय करता, कसे वागता हे विद्यार्थी दशेत तुमच्यावर झालेल्या संस्कारांवर ठरते... 

ते संस्कार आम्हाला आमच्या शाळेने आणि आमच्या शिक्षकांनी खूप छान केले आहेत. जगभरात कुठेही गेले तरी मी माझ्या शाळा माऊलीला कधीच विसरू शकत नाही, हे मात्र नक्की. 


Rate this content
Log in

More marathi story from Deepti Gokhale

Similar marathi story from Classics