Mangesh Kulkarni

Drama

4.5  

Mangesh Kulkarni

Drama

साथ

साथ

1 min
1.8K


नेहमीप्रमाणे morning walk..पण आज साथीला पाऊस!!! 6.30 वाजले असावेत.. Mobile वर पिया तोसे नैना लागे रे.. मनावर वहीदा रेहमानचे गारुड... नखशिखान्त भीजलेलो!!! आनंद ..


कुठलायSSस्स??

अचानक समोरून आलेल्या प्रश्नाने मी दचकलो... 

मंगुडयाचा...मी.

तरिच!!! समोरचे काका..धोतर, सदरा, टोपी ...चिम्ब भिजलेले!!! चेहरा सुरकुत्याने भरलेला. डोळ्यात चमक.

सुपारी खातूस का?? 

द्या थोड़ी??

तुम्ही कुठले? मी..

बारशीचा!!!... 

काका तुम्ही...तरिच अस का म्हणाला?

आरं भीजलायस म्हणून इचारलं.. पयल्या पावसात ..आन वळखल.. तू हिथला नस्नार... पोरं भीजत न्हाइत रं हिथली.

तुम्ही हिकडं कुठं?? 

आल्तू पोराकडं मालकिणी बरुबर....

किती दिस मुक्काम??

उद्या निगायच...एकलच.

का?? मालकिण नाय का येणार?

अन् काकांचे डोळे भरून..

तिला भिजायला लय आवडायच... कालच्याला भिजतच गेली रं...

मी सुन्न..

काका भिजतच पुढे...

पाऊस सुरुच...

Ear phone वर ...ती गेली तेव्हा पाऊस निनादत होता....

आभाळ भरून आलं...


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama