STORYMIRROR

Mangesh Kulkarni

Comedy

3  

Mangesh Kulkarni

Comedy

बधाई हो

बधाई हो

1 min
195

काल पासुनच घरात गड़बड़ सुरु होती.

आज सकाळी थोड़ा पाऊस झालेने उत्साह होता.


14 वर्षानी आज घरात पाहुणा सोन पावलानी येणार होता

हुरहूर दाटून आली 


आज नक्की होईल ना रे पप्पा? प्रेम विचारित होता.

मी शांत ..गंभीर....


आजचीच तारीख दिली आहे. चांगला मुहूर्त आहे..आज चैत्र शुक्ल अष्टमी..दिवस उत्तम आहे. एक दोन वाजेपर्यन्त नक्की होईल..पोक्त माणसे पंचांग बघून सांगत होती.


बायका कुजबुजत होत्या.. कसे होणार ? कधी होणार? 14 वर्षे झाली ग .नीट होईल ना बाई?


पोरं इकडे तिकडे उगीचच पळत होती. 

पोरीना हे करू कि ते करू असे झाले होते.


शेजारणी सारख्या डोकावून जात होत्या

काही लागले तर सांगा हो असे सांगत होत्या.


मी फळेआणि भाजी आणायला चाललोय.. काही आणायचे आहे का? इति शेजारचे आजोबा.


सांगली, मुंबई, कराड, सातारा, परळी वैजनाथ, कोल्हापुर, सोलापूर, हैद्राबाद, पंढरपुर, वसई, अम्बरनाथ, कल्याण, महुद, सांगोला , कोथरुड, अमेरीका येथून नातेवाईक, मित्र मंडळी यांचे सारखे फोन ...काय खुशखबर? झाले की नाही?अशी विचारणा करत होते. प्रत्येकाला उत्तर देऊन घसा बसायची वेळ आली होती.


Whatsappआणि messegesला उत्तर देता देता नाकी नऊ आले होते.


10 वाजल्या पासून जास्तच गड़बड़ सुरु झाली..

वातावरणातला तणाव जाणवत होता.

पुरुष मंडळीची सकाळपासून चहाची तिसरी फर्माइश ...

यांना काही वेळकाळ समजत नाही असे बड़बड़त बायका गॅसवर चहा चे पातेले आदळत होत्या.


आणि अचानक...सूर्य नभि थांबला..वारा निश्चल झाला...पाखरे मूक झाली..झाड़े वेली स्तब्ध झाल्या

घरात नीरव शांतता...


चर्र अश्या आवाजाबरोबर घरात खमंग वास दरवळला....


बधाई हो..अभिनंदन..congratulations ..टाळ्यांच्या गजरात...

14 वर्षाच्या प्रदीर्घ काळानंतर....

एक वाजून 13 मिनिटे आणि 32 सेकंद..

...


माझ्या ताटात बायकोने केलेला बटाटे वड़ा आला हो!!!



साहित्याला गुण द्या
लॉग इन

More marathi story from Mangesh Kulkarni

Similar marathi story from Comedy