साथ दे तू मला - भाग 1
साथ दे तू मला - भाग 1
आज शहरातल्या स्टेडियम मध्ये लोकांनी खूप गर्दी केली होती. अगदी उभ राहायला देखील जागा कमी पडत होती. तिथे असलेल्या प्रत्येकाच्या ओठावर एकच नाव होत 'अभंग'.
अभंग प्रजापती बॉलिवूड इंडस्ट्री चा रॉकस्टार. त्याचा आवाज इतका मधुर होता कि ऐकणारा मंत्रमुग्ध होऊन जायचा.लहान-थोर सगळेच त्याचे फॅन होते. दिसायला देखणा आणि एखाद्या हिरो लाही लाजवेल अशी त्याच फिटनेस होत. मुलीतर त्याच्या चेहऱ्यावर आणि गाण्यावर फिदा होत्या. पण त्याला याच काही घेणं देण न्हवत. त्याला फक्त त्याची कला महत्वाची होती. तो स्टेज वर आला आणि त्याने हातात गिटार घेतली.गिटार च्या तारा छेडत त्याने गाणं गायला सुरुवात केली.
हम तेरे बिन अब रह नहीं सकते
तेरे बिना क्या वजूद मेरा?
हम तेरे बिन अब रह नहीं सकते
तेरे बिना क्या वजूद मेरा?
तुझ से जुदा अगर हो जाएँगे
तो ख़ुद से ही हो जाएँगे जुदा
क्योंकि तुम ही हो, अब तुम ही हो
ज़िंदगी अब तुम ही होओ-ओ-ओ,
चैन भी, मेरा दर्द भी
मेरी आशिक़ी अब तुम ही हो
तेरा-मेरा रिश्ता है कैसा?
एक पल दूर गवारा नहीं
तेरे लिए हर रोज़ हैं जीते
तुझ को दिया मेरा वक्त सभी
कोई लमहा मेरा ना हो तेरे बिना
मेरी साँस पे नाम तेरा
क्योंकि तुम ही हो, अब तुम ही हो
ज़िंदगी अब तुम ही होओ-ओ-ओ,
चैन भी, मेरा दर्द भी मेरी आशिक़ी अब तुम ही हो
तुम ही हो
तुम ही हो
गाणं संपलं तस संपूर्ण स्टेडियम टाळ्या आणि शिट्यांचा आवाजाने गजबजला.त्याने गर्दी कडे पाहून एक फ्लाईंग किस दिली आणि तो स्टेज खाली आला.आज तो खूप थकला होता त्यामुळे तो पटकन गाडीत बसला आणि तिथून निघाला.आजच्या दिवसाचा विचार करत तो गाडी चालवत होता. रात्रीचे 7 वाजले होते.हिवाळा होता त्यामुळे थोडी थंडी वाजत होती.त्याला कुणी ओळखू नये म्हणून त्याने त्याच्या हुडी ची टोपी घातली आणि तोंडाला मास्क लावला. पुढे एक गार्डन होत त्याने तिथे गाडी थांबवली. तो गाडी खाली उतरला.
"Infinite green" त्या गार्डन च नाव पुटपुटत तो मंद हसला. Infinite green अगदी त्या गार्डन ला साजेसं नाव होत .सगळीकडे हिरवीगार झाडी,सगळीकडे पसरलेलं हिरवंगार गवत. इथे फक्त हिरव्या रंगाचं साम्राज्य आहे कि काय असच वाटायचं तिथे. ही त्याची आवडीची जागा. तो नेहमीच इथे यायचा.
तो तिथेच एका बाकावर बसला. लहान मुळे खेळण्यात गुंग होती आणि त्यांचे आई वडील गप्पांनमध्ये.गर्दी जरी असली तरी तिथे त्याला खूप प्रसन्न वाटायचं.तो हे सर्व पाहण्यात गुंग होता तेव्हड्यात एक मुलगी तिथे आली आणि त्याचा कॉलर धरून तिने त्याला उठवलं.तो काही बोलणार त्या आधी तिने त्याला एक चापट मारली.
"खूप हौस आहे ना तुला मुलींना छेडायची हा बोल ना आता का गप्प आहेस " त्याची कॉलर पकडून ती बोलू लागली.तिचे डोळे रागाने लाल झाले होते.
"हे बघा तुम्हाला काही गैरसमज झाला आहे मि असं काहीही केलेलं नाही" त्याला ही खूप राग आला होता पण रागावर संयम ठेवत तो म्हणाला. पण ती मात्र एकूण घ्यायला तयारच न्हवती.
"ए शहाण्या तुमच्या सारख्या मुलांना ना मि चांगलाच ओळखते करायची ती घाणेरडी काम करता आणि नंतर पळवाटा शोधता.कसले संस्कार देतात रे तुझे आई वडील तुला." ती अगदी उपहासाने म्हणाली. पण आता अभंग चा संयम मात्र सुटला.
"ओह हॅलो संस्कार कोणाचे काढतेस तू. तुला काही manners आहेत का आधी ते बघ. Enquiry न करता कुणावरही आरोप करायचा हेच असतात का संस्कार."स्वतःची कॉलर तिच्या हातातून सोडवत तो अगदी रागात म्हणाला.
" चांगली मुलं ना तुझ्या सारखं मुलींची छेड नाही काढत समजलं ना आणि मि enquiry करूनच आले लाल हुडी घातलेला तू एकच मुलगा इथे आहेस."ती रागात म्हणाली.
"हे बघा मिस मी शेवटचं सांगतोय तुम्ही ज्याला शोधताय तो मी नाहीए" तो खूप वैतागला होता.त्यांच्या या भांडना मुळे आजूबाजूची लोक तिथे जमली होती.
" तो तूच आहेस आणि हे तुझं मास्क जेव्हा उतरेल ना तेव्हा कळेल" ती म्हणाली.
" हेय नो " त्याचे बोलणे पूर्ण व्हायच्या आधीच तिने त्याचा मास्क खेचून काढलाय आणि त्याचा चेहरा पाहून तिचा हात आपोआप तिने तोंडावर ठेवला. तिथे उपस्तित सर्वांनीच त्याचा चेहरा पहिला होता आणि त्याच्याकडे धाव घेतली. ती त्या गर्दी च्या मागे होती. तिला तिच्या वागण्याचा पस्तावा होता आणि हे तिच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत होत. तो गर्दीतून तिला आवाज देत होता त्यामुळे ती पटकन तिथून पळाली. पण तो मात्र तिच्या पाठमोऱ्या आकृती ला रागात पाहत होता. उगीचच कुणावरही काहीही आरोप करणारी लोक त्याला आवडायची नाही आणि आता ती पण त्याच लिस्ट मध्ये ऍड झाली होती.
*************************************
"म्हणजे डॉ.किमया राजे पहिली वेळेस चुकली बापरे" तनु
" मस्करी करू नको ग. इथे मला किती वाईट वाटतंय ते मलाच माहित " किमया
" अग मग मी तुला सांगितलं होत ना लाल हुडी घातलेला मुलगा जो गार्डन च्या बाहेर आहे त्याने छेडलं होत आपल्या हॉस्पिटल च्या मुलींना" तनु
"हो ग मीच नीट ऐकलं नाही आणि त्या बिचाऱ्या अभंग ला मारून आले. मला याच रिग्रेट वाटतंय " किमया
" ठीक आहे तुला तुझी चूक कळली ना आता मग बस. पुन्हा कधी भेट झाली तर माफी माग त्यांची and i know that कि या भेटी नंतर तो तुला विसरणार तर नक्कीच नाही. काय मिस भांडखोर किमया " तनु म्हणाली. किमया ने लटक्या रागात तनुच्या हातावर मारले आणि दोघी हसायला लागल्या.
"चाल आपल्या गँग नि खूप हाणलंय त्या खऱ्या हुडी वाल्याला तर आपणपण हात साफ करू त्याच्यावर " तनु
"हो चल " हसत किमया म्हणाली आणि त्या दोघी तिथून निघाल्या.
अभंग ची माफी पुढे जर भेट झाली तर मागायची हे किमयाने मनात ठरवलं होत.पण तिला हे माहित न्हवत कि त्या दोघांची भेट लवकरच होणार होती.

