साथ दे तू मला...2
साथ दे तू मला...2
किमया दबक्या पावलांनी एका घरात गेली. दर्पन त्या घराचं नाव. चालत ती मेन डोर जवळ आली आणि हळूच तिने आत वाकून पाहिलं.आत सोफ्यावर एक स्त्री मॅगझीन वाचत बसलेली तिला दिसली. त्या तिच्या काकू अंजली राजे होत्या. ती दबक्या पावलांनी आत आली आणि हळूच पायऱ्यांवरून वर जातं होती.
"सोना" अंजली ताईंनी हातातली मॅगझीन खाली ठेवली आणि त्या किमया कडे वळल्या. त्यांनी तिला आत येताना पाहिलं होत.
त्यांनी आवाज दिल्या बरोबर तिने जीभ चावली.
" माझ्या कडे बघ आणि इतका उशीर का झाला ते सांग" त्यांनी हाताची घडी घातली आणि तिला विचारलं.
" ही ही ही ही ते ना...मला ना..." तिला काहीतरी बहाणा करायचा होता पण तिला सध्या काही सुचत न्हवत कारण जर तिने हे सांगितलं कि ती तिच्या गँग सोबत अजून एक कांड करून आली आहे तर मग तीच काहीच खरं न्हवत.
"का उशीर झाला " अंजली ताईंनी पुन्हा विचारलं.
"अग सांग ना कि आपण दोघी पाणी पुरी खायला बाहेर गेलो होतो" रिया म्हणाली. ही किमया ची मोठी बहीण,अंजली यांची मुलगी.
" हा अग मम्मा मी हेच सांगत होते" किमया म्हणाली. कोणत्या तरी मोठ्या संकटातून आपण वाचलो असे एक्स्प्रेशन होते तिच्या चेहऱ्यावर. 'उंदराला मांजर साक्ष' ह्या म्हणितले मांजर आणि उंदीर ह्या दोघीच, किमया आणि रिया. रिया किमया जवळ आली आणि अंजली ताईचं लक्ष नाही हे पाहून तिने हळूच किमया ला डोळा मारला.
" मम्मा आम्हाला ना खूप दिवसापासून पाणीपुरी खावीशी वाटत होती म्हणून मी आणि सोना गेलो होतो" रिया
"खर?" अंजली
" हो ग मम्मा किती प्रश्न पडतात ना तुला. तुला माहिती आहे तू जेव्हा असे प्रश्न विचारतेस ना तेव्हा मला कुणाची आठवण येते?" किमया
"कुणाची?" अंजली आणि रिया एकदाच म्हणाल्या पण त्यांना माहित होत हीच उत्तर नक्कीच काहीतरी अजब असणार.
" ते जुदाई मूवी मधल्या परेश रावल ची" किमया. तिच्या ह्या उत्तरावर मात्र रिया ला हसू आवरता आले नाही आणि ती हसायला लागली.अंजली ताईंनी किमया च्या दंडावर एक मारलं.
" खूप आगाऊ होत चाललीस तू दिवसेंदिवस" आणि त्या ही हसायला लागल्या.
" अरे वा का हसताय आम्हालाही सांगा आम्ही पण हसतो" मि. मोहन राजे म्हणजे किमयाचे काका म्हणाले. त्यांच्या सोबत आजी पण होत्या.
" काही नाही हो ही आपली सोना काहीतरी जोक चालूच असतात हिचे" अंजली. सगळ्यांची सोफ्यावर मेहफिल जमली.
" हो ही असली ना घरी कि घर घर वाटत. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर स्माईल असते ही असल्यावर" रिया म्हणाली आणि इकडे किमयाने तिची नसलेली कॉलर वर केली एकदम आत्माराम भिडे टाईप.
" मग माझी सोनपापडी आहेच तशी" आजी म्हणाल्या. आजी आणि मोहन राव किमया ला सोनपापडी म्हणायचे. अंजली आणि रिया तिला सोना म्हणायचे. घरात सगळ्यात लहान असल्या मुळे ती खूप लाडाची होती. तिचे आई वडील ती लहान असतानाच एका कार ऍक्सीडेन्ट मध्ये वारले होते. तेव्हा पासून तिला तिच्या काका काकुंनीच सांभाळलं होत. अंजली आणि मोहन ची ती लाडकी होती.
"माझी सोना" अंजली ताईंनी तिला मिठी मारली.
" ए मी पण मी पण" रिया पण त्यांना जॉईन झाली आणि नंतर त्या तिघींनी आजी आणि मोहन ला पण त्यांच्यात सामील करून घेतलं. खूप छान दिसत होते ते सगळे एकत्र. पण त्यांची ही हैप्पी मोमेन्ट पाहून कुणाला तरी खूप राग आला होता.
प्रजापती मेन्शन च्या बाहेर एक काळी ऑडी थांबली. वॉचमन ने गेट उघडलं आणि ती गाडी मध्ये गेली. त्यात अभंग होता. त्याने गाडी पार्किंग मध्ये लावली आणि तो सरळ त्याच्या रूम च्या दिशेने निघाला. पण त्याला असं जाताना पाहून गार्डन मध्ये बसलेल्या त्याच्या मोठ्या भावाला,आर्यनला, विचित्र वाटल म्हणून तो त्याच्या मागे गेला. इकडे अभंग त्याच्या रूम मध्ये आला आणि डायरेक्ट बेड वर आडवा झाला. त्याच्या मागे मागे आर्यन पान वर आला.
"काय झालं रॉकस्टार, खूप थकला वाटत" आर्यन बेडवर बसत म्हणाला. खरंतर तो थकला होता पण त्यापेक्षा ज्यास्त त्याला किमया चा राग आला होता. तिथल्या लोकांना ऑटोग्राफ देऊन त्याचे हात आणि उभ राहून त्याचे पाय दुखत होते. आर्यन त्याचा मोठा भाऊ कमी बेस्ट फ्रेंड होता. तो त्याच्या सोबत सगळंच शेअर करायचा. नेहमी प्रमाणे त्याने आज काय झालं ते आर्यन ला सांगितलं.
"तुला सांगू भाई, मी एवढा इरिटेट झालो होतो ना एकतर त्या मुलीची बडबड आणि तीच ते माझ्यावर आरोप कारण. ओह गॉड, मला तिचा एवढा राग आलेला ना पण मुलगी आहे म्हणून मी गप्प बसलो" अभंग
" अरे झाला असेल अभि काहीतरी गैरसमज. तू ते सोड मला हे सांग कि आजी साठी डॉक्टर बोलावलेस ना?" आर्यन
" अरे हो तुला सांगायचं विसरलोच. आज बोललो मी हॉस्पिटल च्या डीनशी तर उद्या येतील सर्व डॉक्टर्स मेन्शन मध्ये" अभंग
" ओके ठीक आहे. चल फ्रेश हो आणि खाली ये डिनर साठी"आर्यन
"ओके" अभंग ने हसत प्रतिसाद दिला.
आर्यन गेला आणि अभंग बेड वर पडल्या- पडल्या किमयाचा विचार करू लागला.तेव्हा रागात त्याच लक्ष न्हवत पण आता त्याला तिचे तो बोलके, पाणीदार डोळेच आठवत होते. पण नंतर लगेच त्याला त्यांचं भांडण आठवलं आणि तिला परत आठवायचं नाही हे ठरवून तो उठला. पण त्याला हे कुठे ठाऊक होत कि जिला तो डोक्यातून काढण्याचा प्रयत्न करत होता तिची जागा त्याच्या जीवनात फिक्स होती.
न्यूलाईफ कॉलेज अँड हॉस्पिटल च्या मिटिंग रूम मध्ये काही डॉक्टर्स ची मिटिंग चालू होती. त्यात किमया आणि तिची गँग म्हणजेच तनु, परमदीप आणि निल पण होते. हॉस्पिटल चे डीन बोलत होते," तर डॉक्टर्स ऍज यू ऑल नो कि आपल्या हॉस्पिटल चे आधीचे ओनर मि.देसाईंनी हे हॉस्पिटल आता दुसर्यांना विकलं आहे आणि त्याच नाव आहे.... मि.अभंग प्रजापती, दि रॉकस्टार"
सगळ्या डॉक्टर्स मध्ये कुजबुज चालू झाली पण किमया आणि तिच्या फ्रेंड्स चे मात्र डोळेच मोठे झाले. पण हा त्यांच्या साठी फक्त पहिला धक्का होता.
" तर डॉक्टर्स आजची मिटिंग ह्या साठी आहे कि मि.प्रजापती ह्यांच्या आजींची ताब्यात खूपच खालावली आहे त्यामुळे आपल्या पैकी चार डॉक्टर्स ना तिथे काही दिवस जावं लागेल. आणि त्यांची नाव आहेत....डॉ.तनु, डॉ.परमदीप,डॉ.निल आणि आपल्या हॉस्पिटल च्या बेस्ट डॉक्टर, डॉ.किमया " डीन म्हणाले आणि सगळ्यांनी टाळ्या वाजवायला सुरुवात केली. हा किमया आणि फ्रेंड्स साठी दुसरा झटका होता आणि ह्या झटक्या मुळे किमयाला आता फक्त हार्ट अटॅक यायचा बाकी होता.

