Mandira Joshiee

Romance

3  

Mandira Joshiee

Romance

पुरंदर

पुरंदर

2 mins
1.1K


परवा पुरंदर ला गेले होते. पुण्याहून अवघ्या 40km वर आहे. जवळच्या जवळ आणि लवकर होईल म्हणून निघालो. सध्या गड Miltry च्या ताब्यात आहे. Timings 9 - 5 आहेत. हे कळले होते. त्यामुळे फार लवकर जाऊन उपयोग नव्हता. 8am la निघालो. खरं सांगायला गेलं तर आताशा गड किल्ले असे फार उरलेच नाहीयेत. सगळी पडझड झाली आहे. सगळे भग्नावशेष बघायचे आणि त्या काळाचे लोक किती great होते असे म्हणत... एखादा बुरुज, एखादं गोड्या पाण्याचे टाक बघून विस्मयजनक खेद व्यक्त करायचा.... फार इतिहास प्रेमी नाहीये मी, त्यामुळे गडाची उंची किती, तो कोणी बांधला.. अशा फारश्या तपशिलांमध्ये शिरत नाही. Trekking सुरू करण्यामागचा उद्देश खरंतर एक outing चार चांगले फोटो, मित्र-मैत्रिणींबरोबर शिळोप्याच्या गप्पा हाच होता. पण हळूहळू लक्षात यायला लागलं ही फक्त एक healthy activity नाहीये.. ही एक ओढ आहे! धोतर, सदरा, पागोटे आणि हातात एक तलवार घेउन जीवाचं रान करून लढणाऱ्या मावळ्यांची गाथा आहे. मुरारबाजी देशपांडे किंवा बाजीप्रभूंचा दोन्ही हातात तलवार घेऊन त्वेषाने लढताना चा पुतळा बघितला अंगावर काटा येतो! काय अफाट ताकद असलेल्या मनगटांमध्ये प्रचंड आत्मविश्वास... तुटपुंज्‍या शिबंदी वर शत्रूच्या हजारोंच्या सैन्यापुढे... साथीला असलेल्या निवडक मावळ्यांना बरोबर जीवाचे रान करून झुंजायचं. थंडी, वारा, ऊन कशाचीही पर्वा न करता.

         पुरंदर, संभाजी महाराजांचे जन्मस्थान! तिथल्या बुरुजांना, दाराला हात लावताना क्षणभर असं वाटलं... इथे संभाजी महाराजांनी हात लावला असेल... इथेच रांगत रांगत पुढे गेले असतील का? का खेळता खेळता या बुरुजाच्या मागे लपले असतील? गडावर असलेल्या केदारेश्वराच्या मंदिराचा जिर्णोद्धार झालाय. पण याच जागेवर शिवाजी महाराज, संभाजी महाराज देवाच्या पाया पडले असतील. या कल्पनेनेच भारी वाटत होतं.  

खूप काही सोसलं ह्या पुरंदर ने.... कधी आदिलशाही, कधी मुघल.. तर कधी स्वराज्याच्या अधिपत्याखाली... सरतेशेवटी ब्रिटिश राजवटीच्या खाली होता हा गड. जसे मंदिर आहे गडावर तसेच दोन चर्चही आहेत . पाण्याच्या टाक्यांची मुबलक सोय आहे. Miltry चे काही quarters ही आहेत. गडापर्यंत थेट गाडीने जाता येते. जवळच नारायणपूरचे प्रसिद्ध दत्त मंदिरही आहे. चहा नाष्टा जेवणाची पण व्यवस्थित सोय होते.

                4/5 च्या पुस्तकात पुरंदरचा तह असा एक धडा होता. पुरंदर सहित23 किल्ले शिवाजी महाराजांना मिर्झाराजे जयसिंग यांना द्यावे लागले. का कोण जाणे पण हा धडा कायमचा लक्षात आहे. अगदी गर्भश्रीमंत नसले तरी सुस्थितीत आहे मी. कोणाला एका झटक्यात50k द्यावे लागले तर काय वाटेल मला. इतक्या मेहनतीने.... इतक्या मावळ्यांच्या बलिदानाने जिंकलेले किल्ले एका झटक्यात देताना कोण कालवाकालव झाली असेल महाराजांच्या मनात. अर्थात तो एक धोरणी दूरदर्शी निर्णय होता. मुरारबाजी पडल्यावरही मावळे लढत होते. औरंगजेबाच्या इतक्या मोठ्या फौजेपुढे आपला टिकाव सध्या लागणार नाही हे ओळखून, इतर जीवितहानी टाळण्यासाठी घेतलेला तो एक कठोर निर्णय होता. असो....

           असा राजा होणे नाही आणि अशी जीवाला जीव देणारे मावळे ही होणे नाही....

          कुठलाही गड किल्ला फिरून आलं की राहून राहून वाटतं... असे एखादे ध्येय मिळावं आयुष्याला. जिवाच रान करावा त्यासाठी... तहानभूक याचेही तमा नसावी... Time machine असती आज... तर मला नक्की शिवरायांचा शूर वीर मावळा व्हायला आवडलं असतं.


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance