The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW
The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW

Mandira Joshiee

Others

5.0  

Mandira Joshiee

Others

कबूतर आणि वेडं प्रेम....

कबूतर आणि वेडं प्रेम....

1 min
919


गेले आठ दिवस झाले खूप तगमग होतीये जीवाची... रडू यायचंच तेवढे बाकी आहे.... कुणी प्रेमाने गुलुगुलु गप्पा मारत असलं किंवा सारखे गळ्यात गळे घालत असलं की आपण म्हणतो झालं सुरू यांचं गूटरगु 😉 त्यांच्या एकंदरीतच आवाजामुळे किंवा सारखी मान हलवण्यामुळे मला वाटत होतं हकनाक बदनाम झालय बिचार. पण ते खरंच एकमेकांवर खूप प्रेम करतात, याची प्रचिती येतीये मला....

माझ्या client च्या terres flat वर आम्ही योगा करतो रोज. एका छोट्या duct ची जाळी थोडी कापल्यासारखी दिसली आणि एक कबुतर त्यावर बसून आत डोकावण्याचा प्रयत्न करत होतं. त्याच्या एकंदरीतच खूप घाण करण्याच्या सवयीने त्रस्त असल्या कारणाने मी लगेच काळजीच्या स्वरात माझ्या client ला म्हटलं - "अहो ती जाळी रिपेअर करून घ्या पटकन, हे आतमध्ये घुसेल "त्यावर ती म्हणाली, "परवा आम्ही बाहेर गेलो होतो दिवसभर, कुणास ठाऊक असे पण एक कबूतर त्यात अडकले. त्याने बाहेर पडावं म्हणून आम्हीच ती जाळी कापली. कसाबसा त्याला बाहेर काढलं पण ते इतकं dehydrate झालं होतं... की मेलं बिचार....


गेले आठ दिवस झाले त्या मेलेल्या कबुतराच्या आठवणीने व्याकुळ होऊन हे दुसरे कबूतर रोज त्या जाळी भोवती गिरक्या घालत असत... काहीतरी जुगाड करून आपला पार्टनर बाहेर येईल या वेड्या आशेवर जगतय बिचार.... कसं समजावू सांगू त्याला one night stand आणि casual dating च्या जमान्यात नको रे इतकं जीव तोडून प्रेम करू 😤😢तुला ditch करून नाही रे वेड्या... हे जगच सोडून गेलाय तुझा जिवलग... सावर स्वतःला.... Move on 😭😭😭Rate this content
Log in