Mandira Joshiee

Inspirational

4.3  

Mandira Joshiee

Inspirational

एवरेस्ट बेस कँप आणि सिंहगड

एवरेस्ट बेस कँप आणि सिंहगड

2 mins
1.1K


सिंहगड अँड ईबीसी

हा हा म्हणता ईबीसी ला एक महिना झाला. सिंहगड मुळे ईबीसी effortlessly झाला.

10/12 वर्षापूर्वी पुण्यात आले तेव्हा अभिजीत, माझा नवरा.. पहिल्यांदा सिंहगड ला घेऊन आला. धापा टाकत केलेला तो पहिला सिंहगड.... नंतर त्याची हळूहळू दोस्ती होत गेली. धो-धो पावसातल्या सिंहगड, धुक्याची शाल गुंडाळलेला सिंहगड, रणरणत्या उन्हातला सिंहगड... कधी पौर्णिमेच्या रात्री चांदण्यात नाहले ला सिंहगड.. तर कधी ओव्हर स्मार्टपणा दाखवून अमावस्येला मिट्ट काळोखात चढलेला सिंहगड... कधी वर्ष-दीड वर्षाच्या ऋग्वेदाचे छोटे छोटे हात धरून चढलेला सिंहगड.. आणि आता त्याला झप झप चढताना धूसर होताना बघितलेला सिंहगड... कधी मैत्रिणीबरोबर टवाळक्या करत चढलेला सिंहगड... तर कधी धीर गंभीर होऊन एकटीनेच तुडवलेली पायवाट... अशी अगणित रूपं पाहिली होती या सिंहगड ची जेव्हा जीजीआएम मी सुचवलं टेकडी किंवा सिंहगड करा प्रॅक्टिस साठी, तेव्हा मात्र याच्या वाऱ्या सुरू झाल्या आणि मग एखाद्या अनोळखी त्रयस्थ सारखा वाटायला लागला सिंहगड. त्यात मला buddies ही असे मिळाले होते की ज्यांची speed वाऱ्यासारखी मी ज्या स्पीडने सिंहगड करायचे त्यात त्यांचे दोन वेळा व्हायचे. ते काही बोलायचे नाही पण मला मात्र मेल्याहून मेल्यासारखं व्हायचं त्यात मी पडले देशस्थ 20-25 मिनीट उशीर म्हणजे आमच्यासाठी रुटीन त्यात कोणी 4/5 mins उशीर झाला म्हणून घड्याळ दाखवलं की मी संपलेली च असायचे वेळेचं आणि वेगाचे गणित मांडता मांडता माझ्या नाकी नऊ आले. त्यात ईबीसी, चे खर्च मारुतीच्या शेपटीसारखे वाढत होते.... ही शारीरिक मानसिक आणि आर्थिक मेहनत एखादा मेरू पर्वत सर करण्यासारखी होती.

बघता बघता 5th May la ईबीसी झाला सुद्धा खूप सारे जिवाभावाचे मित्र-मैत्रिणी आणि खूप सारे गोड आठवणी देऊन हा ट्रेक संपला

12th May ला परत आलो पुण्यात. EBC cha hangover होताच पण पुन्हा सिंहगडही खुणावत होता. आल्या आल्या लगेच रविवारी ईबीसी च्या मित्र-मैत्रिणींबरोबर सिंहगड केला... ईबीसी च्या गप्पा मारत मारत त्यामुळे exercise करतोय practice trek करतोय असाच feel येत होता. परवा मात्र एका मैत्रिणीला पकडलं आणि आधीच ईबीसी केलं आपल्याला सिंहगड एकदम निवांत करायचा आहे. प्रत्येक भू भू ला गोंजारत, फोटो बिटो काढत, प्रत्येक स्टॉलवर काही ना काही खात, सरबत पीत चढलो सिंहगड आणि काय बरं वाटलं म्हणून सांगू एखादा जुना मित्र कडकडून भेटावा तसा भेटला मला सिंहगड. अगदी पूर्वी भेटायचा तसा... कुठल्या वेळेच बंधन नाही.... कुठल्या वेगाचा दडपण नाही.. भान हरपून दोन मित्रांनी गप्पा माराव्या तसा भासला मला सिंहगड.

"किती आभार मानायचे तुझे मित्रा,आज केवळ तुझ्या मुळे ईबीसी effortlessly करू शकले मी" आणि तोही म्हणाला, "अशीच येत राहा ग! बरं वाटतं तू आलीस की. तुला improve करताना बघायला छान वाटतं"

अजून एक गंमत सांगू.... 5:15 ला मी घर सोडलं 5:30 ला मैत्रिणीला पिक उप करून 6:30 la गड चढायला सुरुवात केली. सगळं रमतगमत करूनही मी 8:30 ला पायथ्यापाशी होते. चक्क सगळं वेळेत झालं होतं


I guess कुठल्याही नात्यात expectations ठेवल्या नाहीत की सगळ्या गोष्टी सुरळीत पार पडतात.


Rate this content
Log in