Mandira Joshiee

Others

3  

Mandira Joshiee

Others

कळसुबाई

कळसुबाई

3 mins
2.6K


कळसुबाई प्रत्येक trekker च्या bucket list मध्ये असतेच... मलाही करायचा होता कळसुबाई! पण मागच्या वर्षी कळसुबाईची जत्रा... Traffic jam @ Kalsubai असे fb वर post बघून इतका crowded trek खरंच करावा का, असं वाटत होतं. पण महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर ही ख्याती काही स्वस्थ बसू देत नव्हती. मागच्या वर्षी कळसुबाई ह्या ना त्या कारणाने postpone झालाच होता. या वर्षी decide केलं होतं फार जास्त पाऊस सुरू होण्याच्या आतच जाऊन यायचं. गड जेवढा हिरवागार होतो तेवढी गर्दी वाढते. शिवाय जास्त गर्दी झाली की सगळं slippery n risky होऊन जातं.


22nd June ला रात्री निघालो Good luck cafe hun 9 pm la. नाशिक इगतपुरी रस्त्यावर बारी नावाचे एक छोटेसे गाव आहे. भल्या पहाटेपहाटे पोचलो. म्हटलं वाह इतक्या पहाटे आलोय म्हणजे फार गर्दी नसणार, पण आमच्या आधी एक बसभर माणसं पोहोचली होती. एका घरात PHE (trekking group) ने आमची चहा बिस्किटं आणि washroom ची व्यवस्था केली होती. सगळं आटपून 5 / 5:15 ला आम्ही trekkers एकमेकांची जुजबी ओळख करून निघालो. हे 1646mt /5400 ft उंचीचं शिखर सर करायला. Trek leader च्या सूचना सुरू झाल्या. फार दम लागला तरच बसा, फार ऊन होण्याच्या आत आपल्याला समिट करायची आहे... वगैरे वगैरे... सूचना ऐकत आमचा ट्रेक सुरू झाला. अंधारबुडूक होता तरीही काही अतिउत्साही लोकांचे कॅमेरे गोप्रो बाहेर आलेच. कुणी धापा टाकत पुढेे सरसर चढत... कुणी आपण फारच Pro आहोत असं दाखवत... तर कुणी टॉर्चच्या प्रकाशात ग्रुप फोटोज सेल्फी काढण्याचा प्रयत्न करत... सरतेशेवटी चालायला सुरुवात केली. आमच्या सुदैवाने वातावरण pleasent होतं. पाऊस नव्हता आणि फार गर्दी-गोंधळही नव्हता. आम्हीच 15/20 डोकी थोड्या गप्पा मारत, ओळख वाढवत, थोडा चिवचिवाट करत पक्षांना कंपनी देत होतो. अधूनमधून किर्र... किर्र... करून काही रातकिडे आम्ही अजूनही जागे आहोत बरं का, अशी वर्दी देत होते. आमच्या ग्रुपमध्ये काही धाडसी लोक होती. ज्यांनी intro मध्ये This is my first trek असं सांगितल्यावर trek leader चे धाब दणाणले होते. पण एखाद्या best actor प्रमाणे त्याने चेहऱ्यावर जराही न दाखवता... चलो हो जायेगा म्हणत श्रीगणेशा केला होता.


दोन आख्यायिका कळल्या या कळसूबाईच्या! कळसू नावाची एक मुलगी / बाई इथल्या गावच्या पाटलाच्या घरी काम करत होती. तिने पाटलाला आधीच सांगितलं होतं, घरातली सगळी पडेल ती काम करेन पण धुणीभांडी करणार नाही. एक दिवस पाटलाकडे खूप पाहुणे आले आणि मदत म्हणून पाटलाने तिला धुणीभांडी करायला सांगितलं. तिला त्याचा फारच राग आला आणि रागारागाने घर सोडून ती या शिखरावर राहायला गेली.


दुसरी गोष्ट अशी की, कळसू या गावातली सून होती. तिला बऱ्याच औषधी वनस्पतींची माहिती होती. जेव्हा कोणी गावात आजारी पडायचे, ती खूप काळजी घ्यायची. कालांतराने ती वारली. तिची आठवण म्हणून गावकऱ्यांनी या कळसाला तिचे नाव दिले आणि तिच्याच स्मरणार्थ एक छोटेसे मंदिर गडावर बांधले. नवरात्रात सकाळ-संध्याकाळ गावकरी इथे पूजा करतात. लाईटची सोय नसली तरी ही as a token of gratitude किंवा श्रद्धा म्हणू या... लोक येथे आवर्जून येतात.


पहिली गोष्ट थोडीशी Illogical जरी वाटली तरी, कळसू किती धाडसी असेल हे सुचवून जाते. नाही म्हणायला पायथ्यापाशी एक विहीर आहे. पाण्याची सोय होते. आम्हाला एक विषारी घोणस दिसला. त्या काळी किती हिंस्त्र श्वापदं, साप, विंचू, काटे असतील. अशा परिस्थितीत इथे येऊन राहणे म्हणजे धाडसाचेच काम! आता कदाचित ते वेडेपणाचे वाटेल... असो!


तर अशी ही थोडीशी वेडी... थोडीशी धाडशी... किंवा खूप परोपकारी कळसू! जे आज आपल्या महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर आहे आणि हजारो trekkers येथे आपली bucket list पूर्ण करायला येतात!!


एक दुग्धशर्करा योग जुळून आला या कळसुबाईवर... इंद्रवज्र! जे बघण्यासाठी लोक खास हरिश्चंद्रगड - कोकणकडावर camping करतात. Patiently वाट बघतात पण ते दिसेलच याची काही gurantee नसते. डोक्यावर ढगांवर आपली सावली पडली आणि मागून प्रखर ऊन असले की एक गोलाकार इंद्रधनुष्य दिसतं. आपण फोटोमध्ये किंवा जुन्या पिक्चर्समध्ये देवीच्या पाठीमागे aura बघायचो ना अगदी तस्सा. फार मनमोहक दृश्य असते. अगदी डोळ्याचे पारणे फिटणे म्हणजे काय प्रकार असतो ते कळलx त्यादिवशी! Awesome / mind blowing / fab, कडकssss असे सगळे भारीभारी शब्द फिके पडावे इतके ते इंद्रवज्र भारी होते. मोहिनी पडावी इतकं मनमोहक... मंत्रमुग्ध करणारं... खरंतर शब्दात मांडणं निव्वळ अशक्यच आहे...


एका सुंदर अनुभुतीसाठी पावसाळ्यात कळसुबाई करणं MUST


Rate this content
Log in