Atul Shirude

Drama Romance

3.8  

Atul Shirude

Drama Romance

प्रवासात जुळलेले नाते

प्रवासात जुळलेले नाते

3 mins
133


     दैनंदिन जीवनात कुठल्या परिस्थितीत कुणाचे, कुणाशी आणि कधी तात्पुरते वा कायमचे नाते निर्माण होईल हे सांगता येत नाही. काहीशी तशीच आरवच्या बाबतीत घडलेली गोष्ट. आरव एक अभियंता तरुण पुण्यात एका नामांकित कंपनीत नोकरी करत होता. आरव मुळचा नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागातला. आरवची नोकरी वगैरे सर्वकाही व्यवस्थित चाललेले असते. त्याच दरम्यान पुण्यात अचानक डेंग्युसद्रुश्य आजाराची साथ सुरु झाली. आजाराची साथ आरव राहात असलेल्या परिसरात मोठ्या प्रमाणात पसरु लागली. आता आरवलाही त्याची भिती वाटू लागली.त्याच्या ३० दिवसांच्या सुट्ट्या बाकी असल्याने त्याने वरिष्ठांच्या सहमतीने एक महिन्याकरता गावी जाण्याचा निर्णय घेतला. ठरल्याप्रमाणे मग नाशिकला येण्यासाठी आरव नाशिक फाटा, पिंपरी चिंचवड येथून बस पकडतो.बस प्रवाशांनी पूर्ण भरलेली असल्याने आरव बसमध्ये उभाचं राहून प्रवास करु लागतो. पुढे बस राजगुरुनगरमध्ये आल्यावर काही प्रवासी बसमधून उतरतात.


आरवला बसण्यासाठी जागा होते व तो बाजूच्याच बाकावर एका तरुणीशेजारी बसतो.आता बसायला जागा मिळाल्याने आरव आपली बॅग व्यवस्थित ठेवून निश्चिंत होऊन बसतो. अशा प्रकारे मग त्याचा पुढचा प्रवास सुरु होतो.आरव आता थोडा रिलँक्स होण्यासाठी खिशातला मोबाईल काढतो व फेसबुक, व्हाटस्अपमध्ये गुंग होतो.शेजारील तरुणीही कानाला हेडफोन लावून मोबाईलमधली गाणी ऐकण्यात व्यस्त असते. बराच वेळ कुणीच कुणाशी काहीच बोलत नाही. नंतर मात्र आरव स्वतःहून तिची चौकशी करतो. अशा प्रकारे मग दोघांमध्ये संवाद सुरु होतो.आरव तिला स्वतःची माहिती सांगतो. ती तरुणीही आरवला स्वतःबद्दल सांगते.ती एक डॉक्टर असून तिचे नाव आरोही असते.ती मुळ नाशिक शहरातील असून पुण्यात M.D. चे शिक्षण घेत असते.कॉलेजमधील सबमिशन्स वगैरे झाल्याने व परिक्षेला अजून जवळजवळ दिड महिना बाकी असल्याने ती काही दिवसांसाठी घरी नाशिकला जात असते. इतकी सारी तिच्याबद्दलची माहिती आरवला तिच्याकडून समजते.बघता-बघता दोघेही आता एकमेकांबरोबर मनमोकळेपणाने संवाद साधू लागतात. आतापर्यंतच्या संवादातून उभयतांना एकमेकांविषयी पुरेशी माहिती मिळालेली असते. अशा प्रकारे मग सुमारे सहा-साडेसहा तासांचा पुणे-नाशिक प्रवास पूर्ण होत येतो. प्रवास कधी संपतो हे दोघांच्याही लक्षात येत नाही. नाशिकच्या मध्यवर्ती बस स्थानकात दोघेही उतरतात.


दोघेही एकमेकांचे चांगले मित्र झाल्याने एकमेकांचा मोबाईल नंबर घेऊन निरोप घेतात. दोघेही घरी पोहचतात. घरी पोहचल्यावर दोघेही खूप आनंदी होतात मात्र या आनंदातही ते एकमेकांना विसरलेले नसतात. रात्री आरोही सहजचं आरवला हाय असा मेसेज करते.अशा प्रकारे त्यांच्यात आता व्हाटस्अपच्या माध्यमातून वारंवार संवाद होऊ लागतो. अशा वारंवारच्या संवादातून दोघांनाही आपण एकमेकांकडे ओढले जात असल्याची जाणीव होते.आता ते एकमेकांना भेटण्याचे ठरवतात. ठरवल्याप्रमाणे मग दोघेही काही दिवसानंतरचं नाशिक इथे एकमेकांना भेटतात. दोघेही मग एकमेकांची सखोल चौकशी करुन आपापल्या शंका-कुशंकांचे निरसन करुन घेतात. दोघांच्याही शंका दूर झाल्यानंतर आरव एक छान क्षण बघून गुडघ्यावर बसतो व रोमँटिक मुडमध्ये आरोहीला प्रपोज करतो. आरोहीसुद्धा काहीही आढेवेढे न घेता त्याला सकारात्मक प्रतिसाद देते. घरी गेल्यावर दोघेही आपल्या मनातील सारे आपापल्या घरच्यांना सांगतात व घरच्यांना त्यांची भेट घेण्याविषयी आग्रह करतात. दोघांचेही घरचे सुरुवातीला आढेवेढे घेतात मात्र आरोही, आरव दोघेही स्वजातीय असल्याने भेटण्यास तयार होतात. ठरल्याप्रमाणे मग लवकरच दोघांच्याही घरच्यांची भेट होते. भेटीत आरवच्या आईवडिलांना आरोही तर आरोहीच्या आईवडिलांना आरव मनापासून आवडतो. भेट यशस्वी झाल्याने मग दोघांचीही पत्रिका जुळते याची खात्री करुन एका शुभ मुहुर्तावर साखरपुड्यातचं दोघांचाही विवाह उत्साहात संपन्न होतो.


तात्पर्य : प्रेमात योग्य निवड, प्रामाणिकपणा इ.गोष्टी असतील तर घरची मंडळीही त्या निर्माण होणाऱ्या नवीन नात्यास आनंदाने होकार देते.


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama