Atul Shirude

Children Stories

3.8  

Atul Shirude

Children Stories

विनियोग अनपेक्षित सुट्टीचा....

विनियोग अनपेक्षित सुट्टीचा....

2 mins
213


   कधी-कधी बघा नां अनपेक्षित परिस्थितीत आधी हव्या असलेल्या गोष्टी नकळत मिळून जातात. काहीसे असेच क्रुती, समर या बहिण, भावंडाच्या बाबतीत घडले. क्रुती, समर लहान बहिण, भाऊ. क्रुती पाचवीत तर समर सातवीचा विद्यार्थी. दोघांचीही वार्षिक परिक्षा जवळ आलेली. 

    अचानक एक संसर्गजन्य बीमारी चीनमध्ये जन्म घेऊन हळूहळू संपूर्ण जगभर पसरायला लागते. भारतातही त्याचे रुग्ण दिसू लागल्याने भारत सरकार संपूर्ण देश काही दिवस लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेते.संपूर्ण देश लॉकडाऊन म्हणजेच बंद केल्याने सरकार नववीपर्यंतच्या परिक्षा रद्द करते तर इतर परिक्षा पुढे ढकलते. अन् अशा प्रकारे

समर, क्रुतीचीही नियोजित वार्षिक परिक्षा रद्द होते.वार्षिक परिक्षा न देताचं पुढच्या वर्गात गेल्याने व हव्या असलेल्या सुट्ट्या लागल्याने दोघेही खुप खुश होतात.क्रुती सहावीत तर समर आठवीत जातो.

    सर्वत्र लॉकडाऊन म्हणजेच बंद असल्याने सर्वांवरच खुप बंधने येतात.फैलावलेली बिमारी संसर्गजन्य असल्याने कामाशिवाय घराबाहेर निघण्याचीही कुणाला मुभा नसते. अशा प्रकारे मग क्रुती आणि समरलाही आई-वडील घराबाहेर निघू देत नाहीत. आई-वडील दोघांनाही घरातचं खेळायला सांगतात. परिस्थितीला प्रतिसाद देत मग दोघेही घरातच आपले मनोरंजन करु लागतात.त्यांच्या मनोरंजनामध्ये कँरम, बुद्धीबळ, पत्ते, चोर-पोलीस, सापशिडी, लुडो इ.खेळ असतात. त्याशिवाय ती दोघेही अधुनमधून पुठ्ठ्यांचे घर बनवून त्यावर नक्षी काढणे, चित्र काढणे, कागद कापून नक्षी बनवणे इ.कलाकुसरीची कामे करु लागतात. या सगळ्यात कंटाळवाणे झाल्यास दोघेही मग बाबांनी आणलेली चंपक, चांदोबा तसेच इतर गोष्टींची पुस्तके वाचतात.आईच्या सांगण्यावरुन या सर्वातून ती दिवसातून कमीत कमी दिड तास पुढच्या वर्गाच्या अभ्यासासाठी काढतात. अभ्यास करतांना काही अडले, अडचण आली तर आई-बाबांची मदत घेतात. 

     अशा प्रकारे मग दोघांचीही पुढच्या वर्षाच्या अभ्यासाची तयारी या अनपेक्षित सुट्ट्यांमध्ये चांगल्या प्रकारे होऊ लागते. दोघांचीही आता, खेळ, मनोरंजन अभ्यास अशी दिनचर्याचं होऊन जाते. दोघेही आता कुठलाही गडबड, गोंधळ न करता आपल्या दिनचर्येतचं तल्लीन राहू लागली. दोघांच्याही अशा शिस्तबद्ध वागण्यामुळे आई-वडिलांना त्यांच्याबद्दल वाटणारी अनाहूत भिती, काळजी आपोआप दूर झाली. 

    अशा प्रकारे त्यांचे आई-वडील क्रुती-समरला बाहेर फैलावलेल्या बिमारीच्या संसर्गापासून दूर ठेवण्यात यशस्वी झालीत. बघता-बघता मग अडीच-तीन महिने होतात, बिमारीचा संसर्ग आटोक्यात आल्याचे बघून सरकार काही अटींवर लॉकडाऊन मागे घेते व अशा प्रकारे मग क्रुती-समरसह सर्वांचेच जीवन सुरळीत चालू होते.


Rate this content
Log in