प्रवासात भेटलेली ती आणि पाऊस
प्रवासात भेटलेली ती आणि पाऊस
मे महिन्याच्या शेवटचा आठवडा आणि माझं अचानक गावी काम निघालं. त्यात गावी जायच्या ट्रेन चं तिकीटसुद्धा मिळालं नाही, मग निघालो असच, दादर वरून ट्रेन होती. ट्रेन आली आणि ओळखीचं कोण दिसतोय का पाहत मी ट्रेन मध्ये चढलो, पण तेव्हा कोण दिसलं नाही. ट्रेन तिकीट नं मिळाल्यामुळे खूप जणं तिकीट नं काढताच ट्रेन मध्ये होते. गाडी चालू झाली मग मी आणि एक माझ्याच वयेचा मुलगा गेट वर जाऊन बसलो. थोडा वेळ गाडी पुढे गेल्यानंतर अचानक पाऊस सुरु झाला.त्यामुळे आम्ही दोघे आत आलो मी पॅसेज मधेच बाजूला उभा राहिलो. तेवढ्यात माझी नजर समोरच्या शीट वर बसलेल्या मुलीकडे गेली. ती दुसरी तिसरी कोणी नसून मला आवडणाऱ्या, मला प्रेमात पाडायला लावणारी माझी SHIZUKA होती. पण मी पाहून नं पहिल्यासारखं केलं. मग तिनेच मला आवाज दिला नी तिच्याकडे यायला सांगितलं, पण मी लाजाळू असल्यामुळे एवढ्या माणसांतून तिच्याकडे कसं जायचं म्हणून नाही गेलो. तीने call लावायचा प्रयत्न केला पण call नव्हता लागतं कारण मी तिला ब्लॉक केलेलं, हे माझ्या लक्षात आलं आणि मी अनब्लॉक करून तिला call केला. पहिल्यांदा ती रागावली कारण एवढ्या दिवस ना तिला call ना sms काहीच नाही. तीने विचारपूस चालू केली, कसा आहेस, एवढ्यादिवस तुला माझी आठवणं पण नाही आली का, आणि एकटाच गावी चाललाय असे खूप सारे प्रश्न विचारले. मी बस्स sorry बोलूनं गेलो नी बोल्लो तू तेव्हा जे काही बोललीस त्यानंतर मला वाटलं तुझ्याकडे नं बोल्लेल बरं म्हणून गप्प बसलेलो, हा मी एकटाच चाल्लोय गावी आणि तू? हो मीपण एकटीच चाललीय. खूप गप्पा मारत मारत आम्ही पुन्हा जवळ आलो आणि माणगाव कधी आलं कळालंच नाही. दोघेही उतरलो पण पाऊस असल्यामुळे आधी बाजूला जाऊन उभे राहिलो. ती बोलते चल जाऊया आपण पण एवढ्या पावसातून कसं जाणार. ती बोलते अरे मी आणलीय छत्री, मग निघालो सोबत बस स्टॅन्ड वरून बस पकडून गावची बस पकडली एकाच सीट वर बसून तालुक्यापर्यंत प्रवास आणि तिची सोबत बरं वाटलं. गप्पा मारत मारत कधी आमचा स्टॉप आला तेही कळालं नाही. त्यात पाऊस अजून थांबलेला नव्हता ती बोलत होती छत्री घेऊन जा पण ती भिजेल म्हणून नको बोलून दुसऱ्या दिवशी भेटू असं बोलून मी घरी निघालो. आजून ही ती पहिल्यासारखीच होती बस्स आमच्यात थोडी गफल्लत झाल्यामुळे दुरावलेलो आज खूप दिवसांनी पुन्हा ह्या प्रवसामुळे एकत्र आलो.
