माझे गाव माझी कथा
माझे गाव माझी कथा
रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यामधील केलटे माझं गाव. गावाचं वैशिष्ट्य म्हणजे गावदेवीचं नव्याने बांधलेलं मंदिर. रोज सकाळी पूजेसाठी नेमलेले पाटील. गावामध्ये एक वाडी, केलटे गाव आणि बौद्धवाडी. आणि गावची एकी म्हणजे बिनविरोध निवडून दिलेले सरपंच.
गावच्या विकासामध्ये त्यांचा तसेच सर्व गावाकऱ्यांचा मोलाचा वाटा असतो. कोणतंही काम असलं तरी सर्व मिळून पूर्ण करतात. कोणतं सण उत्सव असले तरी आनंदाने सोबत येऊन मिळून राहतात. म्हातारी माणसांसोबत नवीन पिढीही त्यांना साथ देऊन असते.
गावात ग्रामस्थ मंडळ केलटे, प्रगती महिला मंडळ केलट आणि श्री समर्थ क्रिकेट संघ केलटे सर्व गावच्या विकासासाठी तसेच शाळेतील मुलांसाठी योग्य आणि आवश्यक असणाऱ्या वस्तू भेट म्हणून देतात. तसेच कोणाला मदत लागलीच तर सर्व गावकरी स्वतःच्या ऐपतीप्रमाणे हातभार लावतात.
मे महिन्यामध्ये गावची पूजा असते. तेव्हा क्रिकेट चे सामने आयोजित केले जातात. युवक पिढीसोबत वरिष्ठ माणसे खेळात सहभागी होऊन क्रिकेट खेळतात. होळीच्या सणाला सर्व मिळून गावच्या देवाची पूजा करतो.
कोण कुठे चुकत असेल किंवा भांडण झालं असेल तर लगेच त्यावर चर्चा करून योग्य तो निर्णय गावकी घेऊन प्रश्न मिटवतात. गावामध्ये सर्वांच्या घरी नळयोजना देण्यात आली. ती उत्तम रित्या चालू आहे.गावामध्ये पाण्याची कमी कधीच नसते.
कोणाचे लग्न समारंभ असले कि जेवण करण्यापासून ते जेवण वाढण्यापर्यंत तसेच बाकी कामे करण्यासाठी गावची मंडळी सवडीने आणि आवडीने कामे करतात. थोडक्यात सुख दुःखात सर्व गाव सोबत असतो. रस्त्याच्या बाजूने झाडे लावणे साफसफाई गावकरी मिळून सर्व करतात.
गावाचं नावं मोठं करण्यासाठी जोतो आपआपल्या परीने सर्व प्रयत्न करतात. क्रिकेट सांग मैदानमध्ये तसेच मैदानाबाहेर गावाचं नावं मोठं करण्यात हातभार लावतात. कोणी गर्वाने नाही तर माणुसकीने सर्वजन एकमेकांशी तशेच बाहेरच्या माणसांशी वागतात.
