धन्यवाद शिक्षक
धन्यवाद शिक्षक
"शिक्षक हा न मागता आयुष्यात मिळालेला, लहान मोठा,आपल्याला चांगल्या किंवा वाईट ज्ञानाची वाट दाखवणारा मार्गदाता". लहान पासून ते मोठे होईपर्यंत जी व्यक्ती चांगले वाईट सांगते तोही माझ्यासाठी शिक्षकच आहे. चांगले कि वाईट यातून आपल्याला काय घ्यायचं आहे ते आपल्याला ठरवता यायला पाहिजे. कारण शाळेमध्ये असताना शिक्षक आपल्याला पूर्ण पुस्तकांमधले धडे, कविता शिकवतात. पण शेवटी परीक्षा होते तेव्हा आपण किती ज्ञान घेतलंय ते परीक्षेमध्ये समजतं.
तसेच आपण बाहेरच्या वातावरणात वावरत असताना जी जी व्यक्ती भेटली त्यांनिही आपल्याला खूप काही मोलाचे सल्ले दिले. तू हे कर हे नको करू असं बरेच जणांनी सांगितलं, पण आपण तेच घेतलं जे आपल्याला पुढे उपयोगी पडेल.
माझ्या बाबतीत सांगायचं झालं तर, मी लहान असताना शाळेमध्ये अभ्यासामुळे खूप मार खाल्ले. पहिलीला अंजार्लेकर गुरुजी होते नंतर त्यांची बदली झाली आणि त्यांच्या जागी अशोक सहाणे गुरुजी आम्हाला दुसरी पासून सातवी पर्यंत होते. ते एक चांगल्या शिक्षकांपैकी होते, पण आम्ही त्यांना खूप घाबरायचो. का? तर ते मारतात, ओरडतात म्हणून.
सहाणे गुरुजींच हस्ताक्षर शाळेमध्ये सर्वात मस्त होते, ते आम्हाला शुद्धलेखन लिहून आणायला लावत. त्यांच्यामुळे आज माझा हस्ताक्षर सुधारलं. ते कोणते कपडे घालून यायचे यावर आम्ही त्यांचा मूड कसा आहे हे ठरवायचो. तसेच बाहेर जाणार कि नाही तेही आम्ही बरोबर ओळखायचो आणि तसच पुढे होत होतं.
नंतर आठवी ते दहावी गायकवाड सर, पाटील सर, दर्गे मॅडम, पाटील मॅडम आम्हाला शिकवत. यामध्ये गायकवाड सर सर्वात कडक शिक्षक. ते गणित शिकवत. त्यांना पाढे,सूत्र,घन, वर्ग सर्व पाठ पाहिजे असे नाहीतर मार नक्कीच. पाटील मॅडम मराठी शिकवत त्या एका दिवसालाच एक धडा किंवा कविता पूर्ण करत आणि प्रश्नांची उत्तरे लिहून आणायला संगात. त्या बरोबर ओळखत कोणी स्वतःहून लिहिलंय कि दुसऱ्याकडून लिहून घेतलंय. पाटील सर तर मजाक मस्ती आणि कधी काही डोक्यात टपली मारायचे. दर्गे मॅडम इंग्रजी शिकवत.
नंतर कॉलेज ला बरेच शिक्षक मिळाले पण त्यामध्ये परशुराम पाटील सर सर्वांसोबत friendly वागायचे. कॉलेज संपल्यानंतर सर्वजण आपआपल्या कामात व्यस्त झाले पण कधीतरी त्यांची भेट होत होती आणि तेही हिताच्या चार गोष्टी सांगत. कुठे कसं काय करावं किंवा काय करू नये.
क्रिकेट च्या मैदानात तर माझ्याकडून कधी बॅटिंग बॉलिंग चुकीची झाली तर एक हरीश कदम आहे तो तर मला प्रत्येक बॉल ला काहींना काही बोलायचा. हे असं ते तस कर सोबत सँडी दा, ओमकार या आधी सर्व सोबत असताना पप्या दा, वैभव दा सर्व लेक्चर द्यायचे. त्यांच्यासोबत आताही खेळायला मज्जा येते आणि ते आजही मला टिप्स देत असतात.
गावच्या टीम मधून सागर, विजा दा, हित्या दा,प्रवीण दा, नितीन भाई, राजू दा,रोहित, अमित हे मधून मधून काहीना काही सांगतच असत. पण जास्त करून सागर सर्वांना सांभाळून घ्यायचा आणि त्याचे सर्वजण ऐकायचे.त्याने खूप मॅच माझ्या सोबत तर कधी इतर फिल्डर सोबत फायनल पर्यंत नेल्या. मॅच संपल्यानंतर मला तर सर्वजण बोलायचे तू असा खेळायला पाहिजे तस नको, अजून खूप काही. अजय शिर्के, शंकेश, भावेश हे तर रात्री फोन करून उलट सुलट बोलून, मज्जा मस्ती, मस्करी करून महत्वाचे समजावून सांगत.
सर्वात महत्वाचं म्हणजे मला ज्यांच्यामुळे आज फ्री होऊन मन मोकळं फिरायला, खायला आणि अजून काही मिळतंय ते माझे आई वडील यांच्यामुळे मला खूप काही शिकायला मिळतंय. पैसे कसे बचत करायचे, कुठे खर्च करायचे, किंवा कोणाशी कसं बोलावं, कसं नाही हे सर्व आई पप्पांमुळेच. हे जीवन जगत असताना मला अजूनही मित्राच्या, मैत्रिणीच्या भाऊ, बहीण यांच्या रूपाने जी जी माणसे मिळतं गेली किंवा मिळतात ते माझ्यासाठी शिक्षकच आहेत आणि आजही मी शिकतच आहे. तुम्हा सर्व शिक्षकांचे मनापासून धन्यवाद. "Thank you TEACHERS".
