प्रवास
प्रवास
तुझ्या सोबत मी किती प्रवास केला असेल याचा हिशोबच नाही
कसलं निष्ठुर जग होतं हे
आठवतं का तुला
कितीवेळा ....कितीवेळा
तू आणि मी शेजारी शेजारी बसायचो
तू पैसे द्यायचे आणि मी घ्यायचे हा अलिखित नियमच होता
एका दिवशीच नव्हे तर प्रत्येक दिवशी
तू न बोलता प्रवास करायची आणि मधेच उतरून जायची
आणि मी
उदास मनाने तू गेलेल्या दिशेकडे पाहात
जोरात दरवाजा लावून घ्यायचो
घंटी वाजवायचो आणि म्हणायचो
मागे कोणी बाकी आहे का
तिकीट... तिकीट