STORYMIRROR

Chandan Dhumane

Inspirational

4  

Chandan Dhumane

Inspirational

प्रबळ इच्छाशक्ती

प्रबळ इच्छाशक्ती

1 min
185

माझी आत्या वय वर्षे पंचाऐंशी पण अगदी तरतरीत. थोडा गुडघ्याच्या दुखण्याने त्रस्त. पण सदा आनंदी. सगळ्यांवर अतोनात प्रेम करणारी. सगळ्या नातवांची, पणतूची मुलांची तसेच भाच्यांची आठवण काढून स्वतःच आठवणीने फोन करून आपुलकीने चौकशी करणारी. अशी माझी प्रेमळ आत्या इंदिराबाई खोजे. आम्ही सर्व तिला आक्काच म्हणतो.


आयुष्यात तिने खूपच चढ-उतार पाहिले. खूपच दुःख सोसले. जवळजवळ तीस वर्षांपूर्वी तिची मुलगी कवयित्री संजिवनी खोजे अपघाती निघून गेली. त्यानंतर मुलगा व नातू अपघातात गेले. तिच्यावर एवढे दुःख आले तरी ती खचून न जाता दुःख पचवत उभी राहिली. त्यानंतर तिचे पती देवाघरी गेले. मुलगा व सून यांच्या सहवासात तरीही ती आनंदात राहत होती.पतीच्या निधनानंतर खूपच खचली होती. पण तिचे व सुनेचे छान जमायचे. पण नियतीला ते ही मान्य नव्हते. अचानक सुनेचे हृदयविकाराने निधन झाले व पुन्हा वर्षातच मुलगाही कोरोनाने गेला. एवढी संकटे, दुःख पचवून तिलाही कोरोना झाला होता. पण जगण्याशी लढा देण्याची हिंमत व प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर ती खंबीरपणे आपल्या अस्तित्वाचा लढा लढण्यास आपल्या दुसऱ्या मुला-सुनाकडे आनंदाने तयार आहे. तिला माझे शतशः प्रणाम...


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational