STORYMIRROR

Chandan Dhumane

Others

2  

Chandan Dhumane

Others

आई

आई

1 min
77

 आई ममतेचा सागर

 आई जीवनाचा आधार,

 आई विश्वाचा कल्पतरू

 आईमुळे जगाचा संसार..

  खरच 'आई ' शब्दात किती ताकद असते. आईमुळेच आपण हे जग पाहू शकतो . बालपणापासून तर जवळ जवळ लग्न होईपर्यंत आपण आईवरच अवलंबून असतो. प्रत्येक गोष्ट ती आपल्याला पुरवत असते आपली काळजी घेत असते. मग ती मुलगी असो की मुलगा हा भेदभाव करत नाही .

   आई शिवाय आपण अपूर्ण आहोत याची जाणीव आपल्याला आई जवळ नसल्यावर होते. आई नेहमी मुलाबाळांची काळजी घेत असते. तिच विश्वच मुलांत सामावलेल असत. अशी आपल्या सर्वांची आई ही सारखीच ना ?

  मग ती मुलाची असो अथवा मुलीची प्रत्येक आईचा मान राखला पाहिजे . बऱ्याच वेळेला समाजात असे दिसून येते की , जेव्हा आई मुलाचे लग्न करते . तेव्हा मुलाची आईविषयीची भूमिका थोडी बदलते . तो बायकोचा जास्त विचार करतो . पण बायकोचा विचार करणे उत्तमय आहे . तरीही आईलाही विसरता कामा नये . तिला न दुखवता आनंदी ठेवण्याचा प्रयत्न आपणच करणे गरजेचे आहे .

    आई , बायको , बहिण ,वहिनी स्त्रीची अनेक रुपे आपण पाहतो , तरीही बऱ्याच अंशी घरात पुरुषांना प्राधान्य दिले जाते . व स्त्रीयांना दुय्यम स्थान दिले जाते . हे सर्व कुठेतरी थांबवल पाहिजे . 

आपण जो पर्यंत स्त्रियांना मान देणार नाही तोपर्यंत स्त्रीवरील अत्याचार थांबणार नाही तोपर्यंत स्त्री खऱ्या अर्थाने मुक्त होणार नाही ......


Rate this content
Log in