Chandan Dhumane

Others

2  

Chandan Dhumane

Others

जागर स्त्रीशक्तीचा

जागर स्त्रीशक्तीचा

3 mins
138


आज 'जागतिक महिला दिन' या दिवशी सर्वत्र महिलांचा सत्कार केला जातो तिला शुभेच्छा दिल्या जातात तिचे गुनगान केले जाते.तिच्या कर्तृत्वाच्या कथा गायल्या जातात. ती खरच खूप महान आहे .तिची पूजा केली पाहिजे असे वाटते ...पण हे कितपत सत्य आहे .हे तपासणे गरजेचे आहे.

 सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके ।

शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते ।।

स्री शक्ती तू ,तूच जगात माता ,

तूच आदिशक्ती तूच कालिकामाता ।।


अनेक रूपे धारण करणारी आदिशक्ती जगदंबा मातेचा नवरात्री उत्सव जणूकाही सर्व भारतभर मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. आश्विन महिन्याच्या पहिल्याच दिवसापासून मातेचा उत्सव मोठ्या प्रमाणात विविध कार्यक्रम आयोजित करून साजरे करताना प्रत्येकाचा उत्साह पाहण्यासारखा असतो. जणूकाही नवरात्रीच्या आदिशक्तीच्या जागराच्या नावाखाली फक्त स्पर्धा चाललेली दिसून येते. अनेक रूपे धारण करणारी आदिशक्ती आपल्याला कधी प्रेमळ मातेच्या तर कधी दुष्टांचा नाश करणारी संहारीनी वाटते तर हीच आदिशक्ती कधी एक सहनशीलतेचा झरा दिसते .

 तीच आहे सहनशीलतेचा झरा 

तिच विश्वाची खरी वसुंधरा.


  अशा विविध रूपांनी नटलेल्या या जगदंबेची रेणुकेची आपण सर्वजण या नवरात्रात मनापासून पूजा करतो. तिचा जागर मोठ्या उत्साहात विविध कार्यक्रम घेऊन जसे गरबा, दांडिया व जोगवा यातून तिला जागवण्याचा तिच्या शक्तीला आवाहन करण्याचा प्रयत्न करतो पण विचार करा खरचं हा जागर तिला हवा आहे का?  या सर्व गोष्टीतून या शक्तीचा जागर खरंच होईल का? नाही. या शक्तीचा जागर करण्यासाठी गरज आहे ती आपल्या सर्व भारतीयांच्या मनातील खऱ्या 'स्त्री' शक्तीला जाग करण्याची .कुठे गेली प्रत्येकाची आत्मीयता ? आपल्या मातेबद्दल ,बहिणी बद्दलची आपुलकीची भावना. सर्व समाजव्यवस्थेने देवीची पूजा जागर करून नवरात्री पुरतेच तिला महत्त्व देऊन या स्त्रीशक्ती तुमच्या आमच्या मुली भगिनी यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न सुटेल का? का अजून किती मनीषा बळी जाणार आहेत अत्याचाराला ? प्रश्न सुटेल कसा ?


तो सुटेल जेव्हा आपण पण स्त्रीकडे माणूस म्हणून खऱ्या अर्थाने तिच्याकडे पाहू तेव्हा .हा प्रश्न सुटेल स्त्री जातीबद्दल असलेल्या आपल्या मनातील वाईट भावना बदलून तिला तिच्या योग्य स्थानावर मानून तिचा आदर केल्यावरच.  तिला या जगात जगण्याचा हक्क आहे. तिलाही मन भावना आहे, असा विचार सर्व तळागाळातील समाज जेव्हा करेल तेव्हाच खरी परिस्थिती बदलेल. स्त्री ही फक्त उपभोगण्याची वस्तू नसून तिचे प्रत्येकाशी वेगळे नाते आहे. ती कोणाची आई आहे, कोणाची पत्नी, कोणाची बहिण, कोणाची मावशी, आत्या तर कोणाची मुलगी या रूपात ती सतत वावरत असते. पण या वासनेने उन्मत्त झालेला निर्ढावलेला समाज फक्त स्त्री जातीला संपवायला निघाला आहे.


प्रत्येकाला आई हवी, बायको हवी, बहीण हवी असते. फक्त पोटी मुलगी नको. का? तिलाही या जगात येण्याचा हक्क आहे. एकीकडे देवीचा उत्सव करायचा किती पूजा करायची आणि दुसरीकडे तिला आपल्या पोटच्या मुलीला मुलगी म्हणून जन्माला म्हणून पोटात संपवायचं. थांबणार कधी हे सर्व? हे थांबलंच पाहिजे.

 का हो बाबा मुलगी जन्मणार

 म्हणून फिरवली तुम्ही मान,

 नका मारू फेकू नका बाबा

 मी तर तुमच्या रक्तातच कण.

 

एकीकडे स्त्रीभ्रूणहत्या तर दुसरीकडे तिच्यावर होणारे अत्याचार हे ऐकून क्षणभर हे जीवन असह्य वाटतं ज्या देशातील स्त्री अंतराळात जाऊन पोहोचली, देशाची राष्ट्रपती तर पंतप्रधान होते. त्याच देशात स्त्रीवर होणारे अत्याचार पाहून मनात या समाजाविषयी प्रचंड अशी सूडाच्या ज्वाला उसळतात कधी थांबले सगळं? खरं तर आपली पुरुषप्रधान संस्कृती आहे अशा या समाजात स्त्रीला या पुरुषांचे संरक्षण असणे आवश्यक आहे नाही तर ते असायलाच पाहिजे, ते सोडून तिची विटंबना करतो आहे.


तिला जगू द्या या जगात सन्मानाने प्रत्येक पुरुष तिच्या मागे एक सुरक्षिततेचा आधार म्हणून उभा राहिला तर नक्कीच ती मोकळा श्वास घेऊ शकेल आणि हाच स्त्रीशक्तीचा जागर होईल. तर चला मग करू या

स्त्री शक्तीचा जागर 

देऊ तिला सुरक्षितेचा आधार 

👏👏👏👏


Rate this content
Log in