STORYMIRROR

Chandan Dhumane

Inspirational

2  

Chandan Dhumane

Inspirational

खरचं आपण स्वतंत्र झालो का?

खरचं आपण स्वतंत्र झालो का?

2 mins
316

  भारताला स्वातंत्र्य मिळाले जवळजवळ पंच्याहत्तर वर्षे उलटून गेली ,तरीही मनात एकच विचार निर्माण होतो, खरंच आपण स्वतंत्र झालो का? असा विचार जर केला तर ,ज्या क्रांतिकारकांनी, महान नेत्यांनी देशासाठी त्यांंचे स्वतःचे रक्त सांडले, भारताला इंग्रजांच्या गुलामगिरीतून सोडवण्यासाठी अतोनात प्रयत्न केले ,स्वतःच्या प्राणाचे बलिदान दिले व भारत देश 15 ऑगस्ट 1947 आली स्वतंत्र झाला.

   या सर्व क्रांतिकारकांनी ने,त्यांनी आपल्या हवाली स्वतंत्र देश दिला, पण आपण काय करत आहोत? फक्त एक राजकारण ,प्रत्येक गोष्ट आपल्यालाच कशी मिळेल त्याच्या मागे धावत आहोत. देशाचं काय होईल? त्यासाठी आपण काय करू शकतो ? याचा विचारही दूरदूरपर्यंत मनाला शिवत नाही . म्हणायला देश स्वतंत्र झाला आहे ,प्रत्येकाला हक्क आहेत ,कर्तव्य आहेत परंतु मिळालेल्या हक्कांचाच आपण विचार करत असतो व आपले सारे कर्तव्य विसरून जातो. विविध सणांना उत्सव साजरे करून फक्त खोटा आव आणत आहोत. खरंच सावित्रीबाई फुले ,ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ,महात्मा गांधी ,पंडित नेहरू ,सरोजिनी नायडू या थोर व्यक्तींनी यासाठीच का खस्ता खाल्ल्या ,त्यांच्या दृष्टिकोनातून देशाचे कल्याण महत्वाचे होतेे.

  

खऱ्या अर्थाने भारत स्वतंत्र व्हायला हवा होता परंतु प्रत्यक्षात आपण अजूनही खूपच मागासलेले आहोत. आपल्याला फक्त आपल्या प्रगतीचे घेणे आहे. समाजात काय चालले आहे ?समाज किती क्रूर बनत चालला आहे? जातीयवादावरून भांडत आहे. महिला खरच स्वतंत्र झाल्या आहेत का? शिक्षणाचा हक्क जरी मिळाला तरी महिलांवरचे अत्याचार दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. छोट्या छोट्या बालिकेला सुद्धा हा क्रूर समाज आपल्या वासनांध नजरेने संपवू पहात आहे. कधी थांबणार हे सगळं? सावित्रीबाईंमुळे स्त्रीला शिक्षणाचा हक्क मिळाला .स्त्री शिकली मोठी झाली भारताचे राष्ट्रपती बनली.पायलट झाली,अवकाशात गेेेली.

  

तरीही आजच्या आधुनिक तंत्रज्ञानामुळे स्त्रियांवरील अत्याचार वाढत चालले आहेत. तिच्यावर अत्याचार होतच आहेत .हे कुठेतरी थांबले पाहिजे आणि हे सर्व आपण थांबू शकतो .आपल्या सर्वांना आपल्या माणुसकीला जागा करायला पाहिजे .माणुसकी नावालाच उरली आहे .मनुष्याला अजूनही सत्तेची लालसा ही देशाच्या प्रगतीचा अडथळा बनत चालली आहे .हे कुठेतरी थांबले पाहिजे घरापासून जरा पण सुरुवात केली तरच आपल्या समाजातील स्त्रियांना मान देऊ शकतो .घरातील स्त्रियांचा आदर करणे, बहिणीचे रक्षण करणे हे संस्कार प्रत्येक घरात जपणे गरजेचे आहे. तरच आजची स्त्री सुरक्षित राहू शकते .आणि तिला कोणालाही घाबरण्याची गरज उरणार नाही. त्यांनी आता सक्षम होणे गरजेचे आहे .स्वतः सक्षम झाल्ययाशिवाय ती ताठ मानेने जगू शकत नाही. प्रत्येकाने प्रत्येकाकडे माणूस म्हणून पाहिले तर नक्कीच भारत देश खऱ्या स्वतंत्र झाल्याशिवाय राहणार नाही.

जय हिंंद जय भारत.


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational