STORYMIRROR

ninad rajpathak

Drama Others

4  

ninad rajpathak

Drama Others

प्राजक्त आणि प्रारब्ध

प्राजक्त आणि प्रारब्ध

4 mins
247

कथा म्हणली की कोणे एके काळी पासून नाही तर आटपाटनगरा पासूनच चालू व्हायला पाहिजे असा थोडी नियम आहे ? ही कथा मी स्वता बघितली आहे,अनुभवली आहे.

        गावाच्या वेशीवर एक भव्य वडाचे झाड कित्येक वर्षा पासून उभे होते.येणाऱ्या जाणाऱ्या वाटसरुला सावली देणे हेच त्यांचे ध्येय.स्थितप्रज्ञा सारखाच वड ही कुणालाही वेगळं वागवत नसे,आपल्या आश्रयाला सावलीला आलेला मनुष्य असो वा प्राणी त्याने सावली देताना कधीच भेदभाव केला नाही.हा पण सावली देत असला तरी त्याच्या आजूबाजूला त्याने कधीच दुसरे झाड उभे राहून दिले नाही म्हणा किंवा त्याचे भव्य रूप बघून कोणा झाडाची तिथे उगवायची हिम्मत पण झाली नाही कधी.पण आयुष्य माणसाचे असो प्राण्यांचे असो वा वृक्षाचे असो नेहमीच एक सारख आपल्याला हवे तसे थोडीच असते ? आणि झालेही तसेच भले भले जिथे उगवू शकले नाहीत तिथे एक प्राजक्ताच्या रोपाने जन्म घेतला.मोह माया या सगळ्या पासून दूर असलेल्या वडाला सुद्धा हे इवलेसे रोप पाहून आश्चर्य वाटले आणि कुतूहल पण.लहान मूल बघून एखादा क्रूर दरोडेखोर सुद्धा गहिवरतो ना मग हा तर स्थितप्रज्ञ वटवृक्ष होता.काही दिवसा पासून असलेले कुतूहल वात्सल्यात कधी बदलले वडालाही कळले नाही.दिवसेन दिवस वाढणाऱ्या प्राजक्ताच्या रोपांची आता स्वता वडच काळजी घेऊ लागला.सोसाट्याचा वारा असो प्रचंड कोसळणारा पाऊस असो वड आपल्या पारंब्यांच्या कवेत प्राजक्ताच्या रोपाला संरक्षण देत गेला.वड आपले वडपण विसरून प्राजक्ताच्या कधी प्रेमात पडला त्याला कळलेच नाही.प्राजक्ताचं झाड आता मोठे झाले त्याला फुले येऊ लागली.इतके वर्ष रुक्ष आयुष्य जगणाऱ्या वडाच्या भोवती रोज प्राजक्ताचा सडा पडू लागला.जितका वड प्राजक्ताच्या रोपात गुंतला तितकेच प्राजक्ताचं रोप या प्रेमा बाबत अनभिज्ञ होते.कुणी तरी आपल्या प्रेमात पडले हे त्याच्या गावी पण नव्हते.ते आपले आपली फुले आपला सुगंध यातच रमायचे.वडाने त्याची काळजी करणे हे प्राजक्ताच्या रोपाने गृहीत धरले होते.वडाने केलेलं संगोपन त्याची काळजी प्राजक्ताच्या रोपाने कधी जाणलीच नाही.या उलट वड त्याने कधी ना प्राजक्ताच्या रोपाच्या फुलांची अपेक्षा केली होती ना कधी सुगंधाची.प्रेमात माणूस वेडा होतो ना तसेच वडाचे झाड प्राजक्त आपल्या जवळ आहे यातच खुश होता.अपेक्षा नसताना रोज त्याच्या अंगणात प्राजक्ताच्या फुलांचा सडा पडला की वड आनंदाने खुलून जायचा इतका की एरवी सोसाट्याच्या वाऱ्याने ढिम्म न हलणारा वड एका वाऱ्याच्या झुळकी बरोबर ताल धरणाऱ्या प्राजक्ताच्या झाडासारखाच ताल धरू लागला.प्राजक्ताचं झाड आता वडाचीच गरज झाली होती.प्राजक्ताच्या फुलांच्या सड्याची इतकी सवय झाली होती की सकाळी सडा पडायची स्वप्ने पहात पहात रात्र जागून काढत असे.तासन तास त्या फुलांच्या सड्यात स्वताचे मन रमवत गेला.प्राजक्ताच्या झाडाला वाढायला जागा हवी म्हणून स्वताच्या पारंब्या सुद्धा वेड्याने नष्ट केल्या.किती तरी स्वप्ने घेऊन रोज वड प्राजक्ताच्या झाडा प्रेम करत गेला.पण नियतीला हे वडाचे मुके प्रेम कदाचित मान्य नसावे.

              एक दिवस गावात प्रचंड मोठे वादळ आले घनघोर पाऊस घेऊन.गावात घरे इमले पत्याच्या बंगल्या सारखे कोसळू लागले.वेशीवर या वादळाच्या वाढत्या प्रभावाने प्राजक्ताचं झाड कावरे बावरे झाले.प्राजक्ताच्या झाडाची मनस्थिती वडाला समजली होती आणि का नाही समजणार ? त्याने तर प्रेम केले होते ना.वड प्राजक्ताला म्हणाला तू काळजी नको करुस माझ्या पारंब्या तुझे पूर्ण संरक्षण करतील तुझ्या पानालाही वादळ धक्का लावू शकणार नाही वादा है मेरा असा तद्दन फिल्मी हिरो सारखा म्हणाला.

प्राजक्ताला माहीत नव्हते की वड आपल्यावर जीवापाड प्रेम करतो पण हे माहीत होते की वड आपली नेहमीच काळजी घेत आलाय.प्रेम म्हणून नाही तर अनुभव म्हणून प्राजक्ताचा वडावर विश्वास होता.वादळ हळूहळू वाढतच गेले वडाचे झाड आपली पाळे मुळे एकवटून प्राजक्ताचं संरक्षण करण्यात गुंतून गेले.रात्र उलटू लागली वादळ काही थांबायचे नाव घेईना वडाच्या संरक्षणात असल्याने वादळाची दाहकता प्राजक्ताच्या गावी पण नव्हती.पहाटे पहाटे बहरायचे,सुगंध पसरवायचा, फुलांचा सडा पाडायची स्वप्ने बघत प्राजक्त इतक्या वादळात ही फुलांनी बहरून गेला.इकडे वादळ वडाच्या हट्टीपणा मुळे दुखावले गेले होते.वडाला धडा शिकवायचा त्या वादळाने चंगच बांधला.आपली सर्व शक्ती एकवटून वादळाने वडाला जोरदार धडक दिली.वादळाचा घाव वडाच्या वर्मी बसला.इतके वर्ष ठामपणे उभ्या वटवृक्षाला क्षणात धाराशायी व्हावे लागले.वादळाचा अहंकार सुखावला आपल्याला आडव्या आलेल्या वडाला धडा शिकवला या आनंदातच वादळ माघारी फिरले.इकडे वटवृक्ष निष्प्राण होऊन पडला पण ती वेळ प्राजक्ताच्या बहरण्याची होती त्यामुळे वड कोसळला याचे तिच्या गावी पण नव्हते.इकडे वड उध्वस्त झाला तिकडे प्राजक्त बहरून आला.वडाच्या जाण्याची प्राजक्ताच्या झाडाला ना खंत ना खेद त्याला आपले सौंदर्य,सुवास यातच रमलेले.जसे उजाडले तसे गावात माणसे जमा झाली वडाचे भव्य झाड कोसळले हे कळताच लोक तिकडे धावले.बघतात तो वडाचे झाड प्राजक्ताच्या झाडाच्या विरुद्ध दिशेला कोसळले होते.गावचा पाटील म्हणाला सुद्धा एव्हढा मोठा वड जमीनदोस्त झाला पण हे नाजूक प्राजक्ताचं झाड आजही तसेच बहरले आहे त्याचा सडा ही पडतोय.हे खरंच आश्चर्य आहे.पाटलाला काय माहित वडाची कथा ? ज्याने जाणून घ्यायची त्या प्राजक्तालाच ती कळली नाही अन्यथा ज्या वडाच्या भोवती एरवी फुलांचा सडा शिंपला होता त्या वडाच्या निष्प्राण कलेवरावर 2 तरी प्राजक्ताची फुले नक्की टाकली असती.वडा सोबत संरक्षणात असलेले प्राजक्ताचं झाड असेही स्वताच्या कोशातच असे.हळू हळू गावाचे जीवन पुन्हा मार्गी लागले.आता वेशीवर वडाच्या झाडाच्या जागी प्राजक्ताचं झाड बहरू लागले.पण पहिल्या सारखे स्वताहून फुलांचा सडा शिंपायला त्याच्या कडे फुले शिल्लकच रहात नव्हती.येणारे जाणारे लोक झाड हलवून फुले आपल्या पदरात ओंजळीत आधीच काढून नेऊ लागली.आता प्राजक्ताच्या झाडाला वडाची आठवण आली.पण आठवण आणि महत्व कळायला खूप उशीर केला होता प्राजक्ताच्या झाडाने.वडाचे प्रारब्ध वडाने जणू स्वताचा हाताने लिहिले होते.आता प्राजक्त मना पासून बहरत नाही निसर्ग नियम म्हणून फुलतो इतकेच काय ते.पण फुले असूनही प्राजक्त मनात एकाकीच पडला होता.कधी तरी वडाला पुन्हा पालवी फुटेल या आशेने फुलांचा सडा शिंपतो आहे.वड परत यावा हे प्राजक्ताचं प्रेम की केलेल्या अन्यायाने त्याचे मन त्याला खाते कुणास ठाऊक ?


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama