akshata alias shubhada Tirodkar

Tragedy Inspirational Thriller

3  

akshata alias shubhada Tirodkar

Tragedy Inspirational Thriller

फ्लॅट नंबर भाग ८

फ्लॅट नंबर भाग ८

2 mins
152


इन्स्पेक्टर मोहीत आणि त्याचे सहकारी भराभर जिना चढून वर वर गेले तसे सोसायटी चे रहिवासी कुजबुजू लागले काय होणार ?कोणी केला असेल हल्ला? असे अनेक प्रश्न तिथे उपस्तिथ होत होते इन्स्पेक्टर मोहीत ने ३०६ ची बेल वाजली तसा दरवाजा उघडण्यात आला


"इन्स्पेक्टर साहेब तुम्ही"?


"हो मिस कांचन मी आत येऊ"


"हो"


"हवालदार पुर्ण खोल्या तपासा काही हाती लागु शकते" तसे हवालदार लगेच तीन खोल्यांत शिरले


आणि मोहित ने कांचन कडे मोर्चा वळवला "तर कांचन माझ्या काही प्रश्नांची उत्तरे द्या जेणेकरून आम्ही हल्लेखोराला लगेच पकडू "

हे ऐकताच कांचन घाबरली


"हे पहा घाबरू नका तुम्हाला कोणावर संशय असेल तरी सांगा कोणाची गय केली जाणार नाही"


"तर तुम्ही त्या दिवशी सोफ्यावर कुठे बसला होता"?


"ती व्यक्ती कोण होती म्हणजे स्त्री होती की पुरुष होता "? 


"त्या व्यक्तीने कसले‌ कपडे‌ घातले होते


"तेव्हा तुम्ही काय करत होता "


असे अनेक प्रश्नांची सरबत्ती इन्स्पेक्टर मोहित ने सुरु केली त्यावर कांचन ने डगमगत भीत भीत काही प्रश्नांची उत्तरे दिली चौकशी संपवून मोहीत खाली येत असताना वाटेत अमीत आणी अवनी भेटले


"धन्यवाद इन्स्पेक्टर साहेब तुम्ही आमचे नाव नाही घेतले "


"शू.....मी मुद्दाम नाही सांगितले हल्लेखोर आजुबाजुला असु शकतो त्यामुळे तुम्ही सतर्क राहा "असे म्हणून इन्स्पेक्टर मोहीत खाली उतरला तर सोसायटीचे लोक चिंतेत खाली उभे होते


मोहीत ने त्यांना पाहात म्हटले "चला कामाला लागा इथे उभे राहुन काय करणार आहात हल्लेखोराला आम्ही लवकरच पकडू तो‌ पर्यंत हवालदार शिंदे इथे थांबतील आणी हो आमच्या शिंदेंची नजर चोख आहे गुन्हेगाराचा वास जरी लागला आला तर त्याची खैर नाही आणि पोलिसांची गाडी सोसायटी बाहेर पडली 


पण गाडी जातात "कोण कोणी केला असेल हल्ला "असे निकष सोसायटी वाले लावू लागले 


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy