STORYMIRROR

akshata alias shubhada Tirodkar

Tragedy Inspirational Thriller

3  

akshata alias shubhada Tirodkar

Tragedy Inspirational Thriller

फ्लॅट नंबर भाग ५

फ्लॅट नंबर भाग ५

2 mins
143

रात्र सरली आणि दिवस उजाडला अमित आणि अवनीच्या डोळ्याला डोळा लागला नव्हता ते जणू त्या रात्री त्या बाईचे पहारेकरी झाले होते सकाळ उजाडली तशी त्या बाईने अवनी ला दरवाजा उघड म्हणून सांगून ती बाई निघून गेली तशी अवनी हि आपल्या ऑफिस ला जाण्याच्या तयारीला लागली दोघे हि नाश्ता करण्यासाठी बसले पण आज नेहमी प्रमाणे ते दिसतं नव्हते दोघेही गोधळलेले होते 


"अरे यार अवनी रात्र भर झोप नाही लागली असंख्य प्रश्न डोक्यात घुमत होते "


"माझं हि तसेच झाले अमित त्या बाईला विचारवं तर काय हेच कळत नव्हते "


"तेच ना तू एवढे दिवस ३०६ करायची पण हे असे काही पुढ्यात येईल असे विचार हि आला नव्हता "


"काय विचित्र बाई आहे धमकी चे पत्र येतात पण तिला मदत नको मला असे वाटते आपण सोसाटीचे चेयर मॅन च्या कानावर घालूया उगीच मग आपल्याला त्रास नको "


"बरोबर आहे अवनी ती बाई किती नको म्हणटली तरी आपण रिस्क घेऊ शकत नाही उद्या आपल्या समोर हजार प्रश्न नको मी आजच संध्यकाळी भेटतो "


"हो चल निघूया ऑफिस ला उशीर होईल "


दोघे हि बाहेर पडले अवनी येता-जाता ३०६ वर लक्ष मारत असे पण आज अमित ने हि दरवाजावर लक्ष मारले आणि ते ऑफिस साठी निघाले संध्यकाळी ठरवलेल्या नुसार अमित भेटण्यासाठी निघाला तशी अवनी हि तयार झाली मग दोघे हि निघाले दुसऱ्या मजल्यावर आणि २०५ ची बेल वाजली दरवाजा उघडण्यात आला 


"नमस्कार "


"अरे या या ३०६ वाले देवधर ना "?


"हो तुमचे मिस्टर आहेत का "


"हो आहेत ना या "


सुर्वे सोसायटी चे चेयर मॅन टीव्ही पाहत होते ह्यांना पाहतच 


"अरे देवधर या बसा "


"आम्ही तुम्हला डिस्टर्ब नाही ना केलं "


"नाही हो हे कामावरून आले कि आम्ही टीव्ही बघत बसतो आणि काही नाही बसा तुम्ही चहा आणते" 


"नाही वाहिनी नको "


"देवधर कशाला नको पर्थमच तुम्ही दोघे आला आहात कर तू घेतील ते "


"मिस्टर सुर्वे मला तुमच्याशी थोडं बोलायचं होत "?


"बोला ना काय झालं काही प्रॉब्लेम आहे का बिंदास सांगा" 


अमित आणि अवनी ने सगळे काही मिस्टर सुर्वेच्या कानावर घातले त्यावर ते हसले आणि म्हणाले 


"मिस्टर देवधर तुम्ही चांगली माणसे आहात म्हणून सल्ला देतो तुम्ही त्या बाईच्या भानगडीत पडू नका तीच तिलाच काही ते पाहू दे "


"पण तिच्यावर हल्ला झाला तर "?


"अहो कर्म जसे कराल तसे फळ मिळेल "


तेव्हड्यात सुर्वेच्या मिसेस चहा घेऊन आल्या त्या हि आतमधून सगळे ऐकत होत्या येता येता त्या म्हणल्या "विसरून जावा हो सगळे तुम्ही तिला मदत करण्याच्या भानगडीत पडू नका उद्या तुम्हीच फसाल "


त्याच्या अश्या बोलण्याने अमित आणि अवनी गप्प झाले सुर्वेनी वेगळा विषय काढला आणि थोड्या वेळात मिसेस सुर्वेनी खण नारळांनी अवनीची ओटी भरली आणि त्याच्या निरोप घेऊन अमित आणि अवनी परतले पण त्याच्या महत्वाचा मुद्दा तिथेच राहिला आणि त्या बाईला मदत करायची कि नाही आणि आता काय करायचं ? हा प्रश्न मात्र अनिरूत्तरीत राहिला 


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy