Participate in the 3rd Season of STORYMIRROR SCHOOLS WRITING COMPETITION - the BIGGEST Writing Competition in India for School Students & Teachers and win a 2N/3D holiday trip from Club Mahindra
Participate in the 3rd Season of STORYMIRROR SCHOOLS WRITING COMPETITION - the BIGGEST Writing Competition in India for School Students & Teachers and win a 2N/3D holiday trip from Club Mahindra

Chandrakant Dhangawhal

Fantasy


3.7  

Chandrakant Dhangawhal

Fantasy


फक्त एक पेन

फक्त एक पेन

2 mins 200 2 mins 200

आपल्या हालाखीच्या परिस्थितीवर मात करतं सुरेश बाराव्वीत पहिला आला.सुरेशची हुशारी पाहुन मग आईवडीलांनी आपल्या गरिब परिस्थितीचा विचार न करता सुरेशला पुढे शिकवण्याच ठरवले.आपल्या मुलाने शिकुन मोठा साहेब व्हाव हे स्वप्न मनाशी बांधुन त्यासाठी जे मिळेल ते काम करून अधीक कष्ट करू लागले. आईबाबांच्या कष्टाची जाणिव सुरेशला होतीच म्हणून सुरेशनेही आईबाबांचे कष्टाची परतफेड खुप शिकुन काहीतरी मोठा अधीकारी होवून करायची म्हणून सुरेशने आपली शिक्षणाची वाट सोडली नाही.पण आईबाबांनीच कष्ट करून आपल्या शिक्षणाचा भार घ्यावा हे सुरेशला योग्य वाटत नव्हते. तेव्हा त्यानेही चार पैसे मिळतील असे काहीतर काम करायच ठरवून काही ओळखीच्या मदतीने स्टेटबँकेच्या बाहेर चहाची गाडी सुरु केली.डोळ्यात आईवडीलांचे स्वप्न व शिकुन मोठा साहेब होण्याच्या जिद्दीने झपाटलेला सुरेशने मात्र अभ्यासही सोडला नाही.स्वभाव आणि चांगल्या वागणूकीमुळे सुरेशचा चहाचा व्यवसाय चांगलाच चालु लागला.या दरम्यान बँकेचा अधीकारी कर्मचारीवर्गाशी त्याची चांगल्याच ओळखी झाली.फावल्यावेळेत सुरेशला अभ्यास करताना पाहुन काहीना त्याच्यातली शिक्षणाची तळमळ कळली व परिस्थितीची लक्षात घेवून त्याला अभ्यासाबद्दल मार्गदर्शनही मिळत गेले. 


एकेदिवशी गाडीवर चहा पिणाऱ्यांची गर्दी असताना,कोणाचेतरी नकळतपणे पैशांचे पाकीट राहुन गेल्याचे सुरेशच्या निदर्शनास आले.पाकीत उघडुन पाहीले तर त्यात काही महत्वाचे दस्तावेज व पैसे होतो.क्षणाचही विलंब न करता कुणाचेतरी पैशाचे पाकीट राहुन गेल्याचे सुरेशने बँकेतील साहेबाच्यां लक्षात आणून दिले. चौकशीअंती बँकेतील देशमुख साहेबांचे पाकीट होते.सुरेशनू ते पाकीट अगदी सन्मानाने देशमुख साहेबांच्या हाती सोपवले.या दुनियेत माणसाच्या गर्दीत असेही प्रामाणिक माणस असल्याच देशमुखसाहेबांना आश्चर्याच वाटले.ठरवले असतेतर त्याने ते पाकीट स्वतःजवळ ठेवून घेतले असते.पण प्रामाणिकपणाची व आपल्या गरीबीची लाज राखत सुरेने खऱ्या मनाने ते पैशांच पाकीट परत केले.मग देशमुख साहेबांनीही वेळ न घालवता सुरेशच्या हातात बक्षीस म्हणून हजार रूपये दिलेत.पण सुरेश परिस्थितीशीच नाही तर स्वतःशी देखील प्रामाणिक होता तेव्हा खुप आग्रह करूनही सुरेशने हजार रूपये घेतले नाही.सुरेने एकच विनंती केली. द्याच असेल तर तुमच्या खिशातला पेन द्या.पैशाची गरज असताना फक्त एक पेन मागणाऱ्या सुरेशची सऱ्यांनाच नवलाई वाटायला लागली.ज्याला स्वबळावर काहीतरी करून दाखलण्याची उर्मी असते तो पैशाला कधीच महत्त्व देत नाही. पैसे दिल्यावरही सुरेशने पैसे न घेता साहेबांच्या हातातुन पेन घेतला. त्याच कारण विचारल्यावर चेहऱ्यावर स्मितहास्य आणत सुरेश म्हणाला.साहेब हा पेन माझ आयुष्य बदलवू माझी परिस्थिती सुधारू शकतो.आणि सुरेश तो पेन साहेबांच्या हातुन घेतं कपाळाला लावून बँकेच्या बाहेर पडला.साहेब त्याच्या कडे एकटक सुक्ष्म नजरे पहात राहीले.आणि जवळ उभा असलेल्या शिपायाला म्हणाले.हा मुलगा खरच एकदिवस स्वतःच आयुष्य निश्चित बदलवेल.


ज्या बँकेच्या बाहेर सुरेशने चहाची गाडी लावली होती कालांतराने सुरेश त्याच बँकेत मॅनेजर म्हणून रूजू झाला. खरंच कदाचित त्या एका पेनामुळेच सुरेशचे आयुष्य बदलले. ठरवलेतर माणूस काहीही करू शकतो.आपल्या परिस्थितीची जाणिव ठेवून प्रयत्नांच्या वाटेवर जिद्दीने स्वप्नांचा पाठलाग करून ध्येय कवेत घेतले तर यशाची भरारी घ्यायला आकाशही अपुरे पडते.तेव्हा परिस्थितीअभावी रडत बसण्यापेक्षा परिस्थितीवर मात करत जिद्दीने प्रयत्न केले तर निश्चितच प्रयत्नाशी परमेश्वर असतो.


Rate this content
Log in

More marathi story from Chandrakant Dhangawhal

Similar marathi story from Fantasy