नवा विचार
नवा विचार
सुधाकर काकांनी गव्हाच्या दळणाबरोबर बाजरीचंही दळण आणलेलं पाहून सुधा काकू म्हणाल्या;
" अहो आपलं फक्त गव्हाचचं दळण होतं ना ? हे बाजरीचं दळण कसं काय हो ? "
काका म्हणाले; "अगं गिरणी शेजारच्या दुकानातून घेतली बाजरी अन् घेतलं लगेच दळूण. तयार पीठ च घेणार होतो पण पिठ किती जूने असेल माहीत नाही म्हणून नाही घेतलं.पण बाजरी घेतली ".
अहो आपण बाजरी वाळवतो, चाळतो, पाखडतो अन मग दळूण आणतो . ही बाजरी कशी असेल कुणास ठाऊक. इति सुधा काकू .
माहिती गं मला सारं करतेस तू ; मशीन क्लीन बाजरी आहे ही
एक बाई अशाच दळूण घेऊन गेल्या
अहो ती नोकरी करणारी असेल
वेळ नसतो त्यांना चाळायला ,पाखडायला .
नाही गं ; गिरणीवाला आणि तिच्या बोलण्यातून तसं वाटलं नाही. मात्र बाई माॅड होत्या जीन्स , टीशर्ट घालून स्कुटी वर आल्या होत्या
होय का ? त्या बाईंचं बघून काय ?
सुधाकाकू मिश्किल हसत म्हणाल्या
तसं नाही गं ; कीती दिवस निवडन पाखडन करणार तू ; दमतेस आता . वय होत चाललंय आता.
आता सर्व सोयी उपलब्ध आहेत. स्वच्छ धान्यं मिळतं प्रत्येक दुकानात. नवीन सोयींचा उपयोग करून घ्यायला हवा ना .
तर तर इति काकू
तू नाही का साडी एवजी मस्त ड्रेस घालतेस सोयीचं अन सुटसुटीत म्हणून. वेणी घालायचा कंटाळा म्हणून लहान केस करून पोनी घालतेस . स्मार्टफोन वापरतेस . तसंच हे ही समज गं.
खरंय हो
तुमच्या मुळेच शिकले हो मी ह्या नव्या गोष्टी
सुधाकाकू प्रेमळपणे काकांकडे बघत म्हणाल्या
हळूहळू ह्या सगळ्या गोष्टी पटल्या ना तुला.
सर्वच नव्या गोष्टी वाईट नसतात गं
कळत नकळत आपण बऱ्याच नव्या गोष्टींचा,
वस्तूंचा उपयोग करतोय ना
खूप छान छान गोष्टी नव्याने आल्या आहेत.
अन आपण सर्वच जून्या गोष्टी सोडून
दील्या नाहीत ना
बदलाचा स्वीकार केला न तर जगनं सुसह्य होतं .
आपणही बदलाला सामोरे गेले पाहिजे नाही का ?
तुमची ना ही नवा विचार करण्याची पद्धत
मला फार आवडते बाई
असं म्हणत सुधाकाकूनीं भाकरी करायला
घेतल्या.
