नराधम
नराधम
बलात्कारीत ती स्री दवाखान्यातून परत घरी आली. पुन्हा आपल्या पोटापाण्यासाठी तिने तोच धंदा करायचे ठरविले होते. पण एक महिन्यात तिची अवस्था परत बिघडली होती. तिला त्या नराधमांपासून दिवस गेले होते.
नवरा नसताना तिला दिवस कसे गेले ? ह्या समाजभीतीपोटी ती घाबरली होती. ती कोणत्याही नातेवाईकाला सांगू शकत नव्हती. ज्या नराधमानी ते कृत्य केले होते ते कोणीही आपण होऊन स्विकारायला तयार नव्हते. कोणीही तिला त्यापैकी मदत करत नव्हते. तिने सारा गुन्हा पचवला होता. बेघर, असहाय स्रीला ते मुजोर गावगुंड धमकी देत होते.
झाल्या प्रकाराची वाच्यता करायची नाही. अन्यथा तुला कोणत्याही गावात राहू देणार नाही. जीवंत कापू अशी धमकी दिली होती.परंतु दिवसेंदिवस लोकांना व नातेवाईकांना तिच्या शरीराकडे बघून शंका आली होती.
लोक तिला हिणवत होते. अनैतिक संबंधातुन तिला दिवस गेले म्हणून शिव्या देत होते. तोंड काळ करुन आली म्हणायचे. आपल्या पोटातील बाळ कुणाचे? लोकांना काय सांगायचे ? हे सर्व ती सहन करण्यापलीकडे होती. तिने तिचा जीवन संपविण्याचा निर्णय घेतला.
आत्महत्येचा निर्णय पक्का झाला. एका पाणी असलेल्या विहीरीत तिने उडी घेतली व आपले जीवन संपवले.