नक्की काय घडलं त्या रात्री? - भाग 1
नक्की काय घडलं त्या रात्री? - भाग 1
(पहिला आवाज तुषारचा)
पुण्यातील ठिकाण। दि.15/4/20 मंगळवारची सकाळ होती। उठ उठ तुषार लवकर उठ ! माझी आई मला उठवू लागली। काय झालं? असं मी विचारले। ऊठ 8:30 वाजले आहे , 10 वाजता ऑफिस आहे ना आणि सोबतच तुझ्या नावाने एक पत्र आले आहे त्यावर only for VIP असं लिहिलेला आहे , असे माझी आई मला सांगू लागली। मी हळू आवाजात बोललो , जाऊन दे काय असेल ते फक्त आणखी 5 min झोपून दे। तुला जे करायचं ते कर , असं म्हणून माझी आई स्वयंपाकघरात निघून गेली। मी पुन्हा बेडच्या स्वाधीन होऊन झोपी गेलो। नंतर काही वेळात मला मोबाइलमध्ये मेसेजचा आवाज आला। मी मोबाइल उघडून त्यात वेळ बघितली तर त्यात 8:55 झाले होते। आज पण ऑफिस ला जायला उशीरच होईल , असे मी स्वतःलाच म्हणू लागला। मी तुषार , झेरोधा IT कंपनीमध्ये ज्युनिअर सॉफ्टवेअर इंजिनियर। नंतर मी बेडवरून उठून आवरायला गेलो। मी 9:30 पर्यंत आवरून , नाष्टा करण्यासाठी टेबल वर बसलो। टेबलावर वृत्तपत्र आणि ते पत्र आधीच ठेवलेले होते । मी नाष्टा करता करता सोबत वृत्तपत्र वाचू लागलो। 9:45 पर्यंत नाष्टा केल्यानंतर माझी नजर पत्रावर पडली , कोणी मला VIP म्हणून पत्र पाठविले , असा मनातच स्वतःला विचारू लागला । ते पत्र आणि ऑफिस बॅग घेऊन मी घरातून ऑफिस कडे निघालो। मी रिक्षात बसलो , रिक्षावाल्याला बोललो IT Park कडे घ्या । रिक्षा चालु लागली। माझ्या घरापासून ते IT Park हा 30 ते 35 min चा रस्ता होता आणि माझे ऑफिस हे 10 वाजता चालू झाले होते आणि मी 9:50 ला रिक्षातून निघालो होतो ,म्हणून आज पण उशीर होणार , बॉसचे ताणे ऐकणार आणि मित्रांमध्ये मजाक होणार हे दररोजचेच झाले होते। त्यामुळे काही मनावर न घेता मी चाललो होतो। म्हणून मी पत्राकडे वळलो । ते पत्र उघडले , तर त्यात आमंत्रण पत्र होते पुण्याच्या काही प्रसिद्ध हॉटेल पैकी एक असलेले VIIT या 5 स्टार हॉटेलचं , त्यात लिहिलेला होत 1 दिवस , 1 रात्र , 3 वेळेचे जेवण मोफत । पण ही ऑफर फक्त 14/4/20 ते 18/4/20 पर्यंतच उपलब्ध आहे। तर लवकर आमच्या हॉटेलला भेट द्या। पहिला माझ्या मनात विचार आला 'कुछ भी मतलब कुछ भी ' आणि त्या पत्रात उजवीकडे पत्राच्याखालच्या बाजूला काही अडचणीसाठी या नंबर वर कॉल करू शकता , म्हणून लिहिले होते। मी लगेच कॉल केला। रिंग वाजली तिकडून कॉल उचलला गेला । मी बोललो , हॅलो मी तूषार, आपण VIIT हॉटेल मधून बोलत आहे का?। तिकडून उत्तर आले "हो , मी या हॉटेलचा मॅनेजर बोलतोय"। सर मला एक आमंत्रण पत्र मिळाले आहे त्यात 1 दिवस आणि 3 वेळेचे जेवण मोफत आहे , तर हे कार्ड बरोबर आहे का? असा प्रश्न मी त्यांना केला।" हो , हे कार्ड आमच्याच हॉटेल ने काही लकी आणि VIP व्यक्तीसाठी बनवलेले आहे तर आपण लवकरच या संधीचा फायदा घ्या" , तिकडून उत्तर मिळाले। मी त्यांना धन्यवाद म्हणून कॉल ठेवून दिला। हे ऐकून मला खूप आनंद झाला , कारण प्रायव्हेट कंपनीमधले जास्त करून 3 स्टार हॉटेल मध्ये जाऊ शकत नाही आणि 5 स्टार हॉटेल मध्ये 1 पूर्ण दिवस फ्री मध्ये राहीचं म्हणजे एक आनंदाचीच गोष्ट आहे। 10:25 वाजता IT पार्क मधिल झेरोधा कंपनीच्या कॅम्पसमध्ये मध्ये मी पोहचलो । रिक्षावाल्याला पैसे देऊन मी कंपनीच्या आत मध्ये माझ्या डिपार्टमेंट मध्ये आलो। मी माझ्या डेस्कवर आलो आणि बॅग ठेवलीच होती तितक्यात पिऊन माझ्याजवळ आला। बॉसने तुम्हाला बोलवलय , बॅग डेस्कवर ठेवुन सरच्या रूमकडे निघालो । या या तुषार सेठ आत या अशा सुंदर शब्दात माझे स्वागत केले बॉसने । आज पण उशीर काही रेकॉर्ड बनवायच्या तयारीत आहे का ? आणि रेकॉर्डच नाव असेल "झेरोधा कंपनीतील कोणत्याही व्यक्तीकडून उशीरा होण्याची सर्वाधिक संख्या"। या महिन्यात 15 दिवसात 8 वेळा उशीर। हि माझी शेवटची चेतावणी आहे श्रीमान. तुषार । या नंतर उशीर झाला तर फक्त अर्ध्याच दिवसाचा पगार मिळेल , असे म्हणून माझा रागीट बॉस बोलला। मी हळूच "हा" , म्हणून रूमच्या बाहेर आलो। आल्या आल्या खुर्ची वर बसलोच होतो की , माझा टीममेट आणि मित्र आला त्याच नाव होतं , हर्ष। काय लेटमेट, काय म्हंटला बॉस मग , हर्षने हसत हसत प्रश्न विचारला आणि सोबत टिंगल केली। काही नाही रे शेवटची चेतावणी भेटली आज आणि या नंतर घडलं तर पगार कपात होईल , असा मी त्याला दुःखी आवाजात बोललो। तिकडून आणिखी 2 टीममेट आणि माझे मित्र-मैत्रिणी आले , ते म्हणजे योगेश आणि रिया। काय तुषारसेठ आज पण उशीर म्हणून ते दोघे चेष्टा करू लागले। तुम्ही पण मज्जा घ्या बॉस सारखी , असे मी त्याने रडक्या स्वरात बोलू लागलो। नाही रे पण तू काही तरी कर या झोपेचं , असा सल्ला योगेश ने दिला। पुढच्या वेळेपासून कधीच उशीर होणार नाही , असे मी पूर्ण विश्वासाने त्या तिघांना बोललो। हा नक्की करुन दाखेव बॉसला, माझ्यावर विश्वास दाखवत , रिया बोलली। हा आणि आणखी एक गोष्ट आज मला एक 5 स्टार हॉटेलचं आमंत्रण पत्र भेटला पूर्ण एक दिवसासाठी मोफत असणार , असा मी त्यांना सांगितलं। योगायोगाने मला पण भेटला आहे आमंत्रण पत्र ,असं रिया म्हणाली। विचित्र पणाने मला पण भेटला आहे आमंत्रण पत्र , असं हर्ष बोलला। आणि मला भेटला आहे आमंत्रण पत्र, असं योगेश बोलला। आपल्या चार जणांना मिळालं म्हणजे , बाकीचे ऑफिस मधल्या सर्व जणांना मिळालं असेल ? , असा प्रश्न रियाने केला। हर्ष बोलला , हो बरोबर असं असू शकतं , मी रवीला , गणेशला , नरेशला विचारून येतो , त्यांना आमंत्रण पत्र भेटला कि नाही ते , म्हणून हर्ष निघून गेला। मी पंकज , आरती , नारायण यांना विचारून येतो असं म्हणून , योगेश पण तिथून निघून गेला। थोड्यावेळात ते दोघे आले । दोघे एक स्वरात बोलले , "नाही भेटलं त्यांना"। म्हणून ते खुर्चीवर बसले। म्हणजे आपल्या चार जणांनाच मिळाले आहे तर , असं रिया बोलली । हा म्हणजे आपण चार मित्र 5 स्टार हॉटेल मध्ये नुसता राडा करू , आनंदाने हर्ष बोलला। मी तर खात्री करून पण घेतली आहे की नकली तर नाही ना आमंत्रण पत्र म्हणून , तर हे बरोबर आहे कार्ड , असं मी त्यांना सांगितलं। पण हे Week-day ला च उपलब्ध आहे ही ऑफर ,असं योगेश बोलला। हा जाऊरे आपण आणि करू एक दिवस मस्त आराम , असं हर्ष उत्स्फुर्तिने बोलला। हा मग कधी जायचं हि ऑफर फक्त 18 तारखेपर्यंतच आहे आणि आज 15 तारीख आहे। आपण उद्याच 16 तारखेला जाऊ , असं मी ठामपणाने बोललो। हा ठीक आहे , असे तिघे सोबत बोलले। पण आपल्या चौघांना सोबतच सुट्टी कशी मिळेल , असं रियाने विचारलं। सर्वांनी आपला आपला विचार करा सुट्टीसाठी , असं योगेश बोलला आणि हर्षला काही इशारा केला । हर्षला इशारा समजला आणि तो पण योगेशच्या स्वरात स्वर मिळविला। हा ठीक आहे , मी त्यांना म्हंटलो। योगेश आणि हर्ष हे दोघे सोबत बॉसच्या रूमकडे निघाले। मी आणि रियाने 'कुछ तो गडबड हे!' अशा नजरेने त्या दोघांकडे बघतच राहिलो। मी आणि स्वाती सुट्टी कशी घेईची याचा विचार करत बसलो होतो कि , थोड्यावेळात ते दोघे बाहेर आले आणि आनंदाने सांगू लागले आम्हांला सुट्टी भेटली । ते दोघे जशी जंग लढली आणि ती जिंकली म्हणून आम्हच्याकडे बोटाने v for Victory असं दाखवू लागले। रियाने विचारले तुम्ही हे केलं कसं ?। आम्ही बॉसला म्हंटलो कि आम्हच्या एका मित्राचं ज्याचं एका मुलीवर प्रेम होतं त्याच उद्या कोर्ट मॅरेज आहे , त्यामुळे आम्हा दोघांना साक्षीदार म्हणून जायचा आहे , त्यामुळे सुट्टी पाहिजे आणि थोडा फार नाटक केला आम्ही। बॉसने लगेच सुट्टी दिली।" कुछ भी फेक मत", असं मी त्यांना बोललो। अरे तुला माहित नाही , हे तर ऑफिसमध्ये सर्वांना माहित आहे की सरच लव्ह मॅरेज झाले आहे आणि त्यांना पण कोणी सपोर्ट नव्हता केला सुरुवातीला , म्हणून त्यांनी लगेच आम्हांला सुट्टी दिली। तुमच्यासाठी फक्त दोन शब्द "bohat hard" , अश्या शब्दात रियाने त्यांची तारीफ केली। आपल्याला पण असाच काही तरी करावं लागेल असा म्हणताच , रिया बोलली मला एक कल्पना आली आहे मी जाते ती करून येते , असं रिया म्हणाली आणि पळतच बॉसच्या रूमकडे गेली। आम्ही तिघे हिला नक्की काय सुचलं असेल , असा विचार करू लागलो। काही वेळात ती आली आणि म्हंटली ' मेरा तो काम बन गया '। वो कैसे? आम्ही तिघांनी एका स्वरात विचारलं। मी गेले आणि सांगितलं सर माझा मावस भाऊचा अकॅसिडेंट झाला आहे आणि तो मुंबईच्या दवाखान्यात ऍडमिट आहे , तर आम्ही सर्व घरचे त्याला पाहिला मुंबईला जाणार आहे ,त्यामुळे मला उद्याची सुट्टी पाहिजे ,असं मी सरांना दुःखी आवाजात बोलले । सरने थोडा विचार करून , मला सुट्टी दिली। तेरा भी दिमाग बोहात तेज हे हंमारे जैसा , असा हर्ष हसत बोलू लागला। या तारीफसाठी आपलं मनापासून धन्यवाद , असा रियाने बोलून ते तिघे हसू लागले। मी आता नाही जाऊ शकत कारण बॉसला शक होईल , मी घरी घेल्यानंतर काही तरी अक्कल लढवेल , असा मी तिघांना बोललो। ते तिघे तिथून आपल्या आपल्या डेस्कवर निघून गेले। ऑफिस संपल्यानंतर मी रिक्षामध्ये काय करू कि सुट्टी मिळेल , असा विचार करू लागलो। मग मला एक कल्पना आली कि जी प्रत्येक व्यक्ती सुट्टीसाठी करतो आजारी पडण्याचं नाटक। मी घरी पोहचलो। जेवण वगैरे केलं ।आणि योजना चालू केली। मी बॉसला कॉल केला। सर मी उद्या नाही येऊ शकणार , आजारी माणसासारखा बोलू लागलो। बॉसला समजला होता तरी पण , का? असा प्रश्न केला। सर मी आजरी आहे मला 104° feronite इतका ताप आला आहे त्यामुळे मला आराम करायचा आहे सर उद्या पूर्णदिवास म्हणून सर , आणखी पण आजारी माणसासारखा बोलू लागलो। बॉस थोडा वेळ काही नाही बोलल्यानंतर , ठीक आहे। धन्यवाद मानून कॉल ठेवला आणि सर्वांना हि खुश खबर आम्हच्या चार जणांच्या ग्रुप वर मेसेज टाकला आणि उद्या कस जायचं? नंतर हा मेसेज टाकला। हर्ष म्हंटला कि , मी माझी कार आणतो आणि सगळे 9 वाजता तयार राहा खास करून तुषार तू लवकर उठ उद्या । हा ठीक आहे ही सुवर्णसंधी थोडी वाया घालवणार आहे मी आणि रात्रीचं पण सामान सोबत आणा आपण तिथेच राहू उदयाच्या रात्री। सर्वांनी हा म्हणत स्मिथहास्याचे ईमोजी पाठवले। बाय अँड गुड नाईट मेसेज सर्वांनी टाकला। मी उद्यासाठी बॅग भरून ठेवली आणि बेडच्या हवाली झालो। पण झोप काही येत नव्हती। कारण जॉबच्या या जीवनामध्ये काही मनोरंजन आणि ते पण मोफत म्हणजे एक लॉटरिच म्हणता येईल। मी उद्या काय जेवायला ऑर्डर करू याच्याच विचारात होतो , मग इंटरनेट वर पाहून घेऊ कि उद्या काय काय ऑर्डर करायचं आहे ते। इंटरनेट वर टॉप 10 बेस्ट इंडियन डिशेस, टॉप 10 युरोपियन डिशेस , टॉप 10 आशियाई डिशेस शोधून त्यातून काही खास डिशेस मोबाईलमधील नोट्स अँप वर लिहून घेतले , अरे इतकी महत्वाची गोष्ट म्हणजे सोबत फोटो-आयडीच नाही घेतली , म्हणून सोबत फोटो-आयडी म्हणून आधार कार्ड घेतलं व ते बॅग मध्ये टाकून दिलं आणि उशिरा उठू नये म्हणून 4-5 अलार्म 7:30 वाजताचे लावून ठेवले। नंतर फ्री का खाना आणि फ्री कि 5 स्टार हॉटेलची सर्विस यांच्या स्वप्नात झोपुन गेलो। पहिला अलार्म वाजला तो पण वाजून वाजून बंद झाला । दुसरा आणि तिसरा अलार्म वाजले ते पण वाजून वाजून बंद झाले। नंतर माझ्या मोबाईल वर कॉलची रिंगटोन वाजू लागली "'तेरी मिट्टी में मरं जावा"। ते ऐकून माझी अर्धी झोप उडाली , तसाच मग मी मोबाईल वर कॉल उचला आणि कानाला मोबाइल लावला । हॅलो कोण बोलतोय? मी असा प्रश्न केला। तिकडून उत्तर आले , ये टमाट्या ज्याला भाऊ भाऊ म्हणत होता, त्यालाच विसरला!। मोबाइलवर डोळे उघडून बघितलं तर हर्ष होता। अरे भाई झोपेत होतो म्हणून नावाचं पाहिलं नाही, मी माझी सफाई दिली। वाटलंच मला झोपेतच असेल आळशी माणूस उठ लवकर , मी 9:15 ला वाजता तुझ्या घरी येईल , तर तु रेडी हो तो पर्यंत ,असा हर्षने साफ साफ आवाजात मला ऑर्डरच दिली। ओके भाई , म्हणून मी कॉल कट केला व परत डोळे बंद करून बेडवर झोपलो।पण आज ऑफिस नाही, तर एन्जॉय करायचा आहे म्हणून लगेच एका उत्साहाने बेडवरून उठलो व फ्रेश होईला गेलो। 8:30 वाजता फ्रेश होऊन टेबलवर बसलो आणि कॉमेडीच्या मूडमध्ये वृत्तपत्र वाचायला लागलो। आई आली आणि म्हंटली आज सूर्य कोणत्या दिशेने उगवला आहे? , आज इतक्या लवकर न आवाज देता स्वतःहून उठला आणि ऑफिसला आनंदाने चाललाय , अशी चेष्टा करत माझी आई म्हंटली आणि वडील हे आश्चर्याने माझ्याकडे बघत होते। नाही ग आई आज आम्ही फ्री मध्ये 5 स्टार हॉटेल मध्ये चाललो आहे , पूर्ण एक दिवसासाठी त्यामुळे मी खुश आहे आणि मी नाष्टा पण नाही करणार आहे आज , असा मी एका श्वासात बोलून टाकले। 5 स्टार हॉटेल ते व फ्री मध्ये?, असा प्रश्न वडिलांनी माझ्यावर डाघला। हो काल पत्रामध्ये मला आणि माझ्या तीन मित्र-मैत्रिणींना आमंत्रण पत्र मिळाले होते, म्हणून आंम्ही चार जणानी आजचा प्लॅन बनवला आहे, असा मी त्यांना सांगितलं। जा तुम्ही पण जगात फ्री काही नसतं , याची काळजी घ्या, असा बरोबर सल्ला वडिलांनी दिला। हो म्हणून आणि बॅग घेऊन मी घराच्या बाहेर आलो। 9:05 झाले होते आणि 10 min होते म्हणून , मी candy crush हा गेम खेळत बसलो। हर्ष हा IT पार्कच्या जवळ राहत होता , त्याच्या जवळ योगेशच घर होतं त्याला घेऊन मग रियाच घर होत जवळ, त्या दोघा नंतर माझ्याकडे ते येणार होते त्यांमुळे मी आरामशीरपणे ओठ्यावर बसून गेम खेळत होतो। 9:25 पर्यंत हर्ष त्या दोघानां घेऊन आला , तोपर्यंत माझी 8-10 लेवल पूर्ण झाल्या। आल्या आल्या सर्व माझ्याकडे आश्चर्याने बघू लागले । हर्षने डिक्की उघडली मी त्यात बॅग ठेवली व कारमध्ये बसलो। रिया बोलू लागली, वाव तुषारराव आज वेळेवर हा पण एक रेकॉर्ड आहे , असं म्हणून तिघे हसायला लागले।" रेकॉर्ड बनते हे तुटणे के लिये", अश्या शब्दात त्यांना उत्तर देऊन , मी हसू लागलो आणि ते जाऊन द्या तुम्ही आधारकार्ड किंवा काही तरी सोबत फोटो-आयडी म्हणून आणला ना? , असं मी त्या तिघांना विचारलं। सर्वांनी एका स्वरात मोठ्याने "हो , आधारकार्ड" म्हणून उत्तर दिलं। मग ठीक आहे , असं म्हणून श्वासात श्वास घेतला। तो पर्यंत हर्षने कारच्या म्युसिक सिस्टिममध्ये गाणं लावला ,
"सुन लो सारी दुनियावालो
जितना भी तुम जोर लगा लो
करेंगे पार्टी सारी रात
तुम मे दम है तो बंद करवा
पार्टी ऑल नाईट
वुई डू पार्टी ऑल नाईट"
या गाण्यात आणखी मूड तयार झाला VIIT हॉटेल हे कोरेगाव पार्क मध्ये होते।म्हणजे 40-45 min चा रास्ता होता। गाडी चालू लागली मी डोळे बंद करून कसं हॉटेल असेल आतमधून , स्वीम्मीन्ग पुलचे असेल ना आणि बरेच काही विचार डोक्यात चालू होते अशीच मला झोप लागून गेली। उठ उठ तुषार लवकर उठ , आळशी माणूस , आपण पोहचलो , अश्या सुंदर शब्दात रियाने मला उठवले। मी उठलो पोहचलो का आपण ? असा प्रश्न मी केला । हो रे , रियाने मोठ्या आवाजात बोलली। या आवाजामुळे माझी झोप उडाली व मी डोळे चोळू लागलो। गेट उघडले गेले , आम्ही आत शिरलो। बाहेरचं गार्डन बघून मन हे गार्डन गार्डन झालं। हॉटेलच्या दरवाज्याबाहेर आलो तिकडुन एक सेवक आला। आमची कार पार्किंगसाठी निली व आम्ही आमच्या बॅग्स घेऊन आतमध्ये शिरलो। हॉटेल स्वछ आणि सुंदर , जिकडे तिकडे सुरक्षितेच्या दृष्टनी कॅमेरेच कॅमेरे होते , सर्व हॉटेल मध्ये गालिचा पसरलेला , हॉटेलमध्ये खूप मोठा झुंबर हा हॉटेलच्या छताला बसवलेला होता। हा नजारा बघून आम्ही रिसेप्शनिस्टकडे आलो। योगेश बोलू लागला की, मॅडम आंम्हाला चार जणांना आमंत्रण पत्र मिळाले आहे पूर्ण एक दिवसासाठी फ्री असल्याचं , योगेशने आमंत्रण पत्र दाखवलं। सॉरी , मला या आमंत्रणबद्दल मला काहीच माहित नाही , असं रिसेप्शनिस्ट बोलली। मॅडम प्लीज मॅनेजर ला बोलवता का, असं मी त्यांना म्हंटलो। ओके, म्हणून रिसेप्शनिस्टने कॉल लावला। थोड्यावेळात मॅनेजर रिसेप्शनिस्ट जवळ आला। काही प्रॉब्लेम आहे का? ,म्हणून मॅनेजरने रिसेप्शनिस्ट विचारले। सर यांचा काही तरी प्रॉब्लेम आहे म्हणून रिसेप्शनिस्टने आमच्याकडे बोट केले। काही अडचण सर? , अश्या नम्रतेने मॅनेजरने आम्हाला प्रश्न विचारला। मी बोलायला सुरुवात केली , सर आम्हाला हे आमंत्रण पत्र मिळाले आहे त्यात पूर्ण एक दिवस फ्री मध्ये आम्ही हॉटेलमध्ये राहू शकतो आणि खाऊ शकतो व मी ते आमंत्रण पत्र त्यांना दाखवलं। हो हो हे आमच्याच हॉटेलचं आहे आमंत्रण पत्र , मॅनेजरने बोलले। माझ्यावरच दडपण कमी झालं , मी म्हंटलो होतो की , मी चौकशी केली आहे आणि जर मॅनेजर नाही म्हंटला असता तर सर्वांनी मला आंधी घेऊन नक्की मारलंच असतं। मॅनेजरने रिसेप्शनिस्टला आमच्या चार जणांचा चेक-इन करण्यासाठी व पूर्ण दिवस फ्री जेवण , राहण्यासाठी व उद्या सकाळी 10 वाजता चेक-आऊट करण्यासाठी सांगितले। मॅनेजरने आमच्या चौंघाकडचे आमंत्रण पत्र घेऊन टाकले व आता तुम्हांला या आमंत्रण पत्राची काही गरज नाही।ओके सर म्हणून , रिसेप्शनिस्टने कॉम्प्युटर वर डिटेल्स टाकली व आम्हांला ओळख पडताळण्यासाठी फोटो-आयडी माघितली ।आम्ही चौघांनी आधारकार्ड रिसेप्शनिस्टला दिले। काहि वेळ कीबोर्ड वर टाईप करून आम्हांला आम्हचे आधारकार्ड वापस दिले। सर आणि मॅडम तुम्हचे चार रूमच्या चाव्या म्हणून त्या योगेशला दिल्या। रूम नं. 105 ते 108 पाहिला मजला बेल-बॉय तुम्हचं सामान व तुम्हाला तुमच्या रूम पर्यंत घेऊन जाईल आणि काही पण जेवणाची ऑर्डर करायची असेल तर तुमच्या रूममध्ये टेलिफोन जवळ नंबर ठेवलेला आहे , त्यावर कॉल करुन तुम्ही ऑर्डर देऊ शकता व शेवटचं म्हणजे , तुम्हची चेक-आऊटची वेळ उद्या सकाळी 10 वाजता आहे , पूर्ण एका श्वासात रिसेप्शनिस्टने बोलुन संपविले। रिसेप्शनिस्टने दोन वेळा घंटी वाजवली ,"ट्रिंग ट्रिंग"। तिकडून एक बेल-बॉय आला , त्याने लाल शर्ट , लाल पॅन्ट , लाल टोपी व काळा बुट घातलेला व त्याच्या नेम-प्लेट वर देव असं लिहिलेलं होत । तो बेल-बॉय रिसेप्शनिस्टनच्या समोर येउन उभा राहिला। काय मॅडम? , म्हणून त्या बेल-बॉय नम्रतेने विचारले। यांच्या बॅग्स व यांना रूम नं 105 ते 108 पर्यंत घेऊन जा। ओके मॅडम , बोलून बेल-बॉयने थोडया बाजूला ठेवलेली ट्रॉली घेऊन आला। आमच्या चौघांच्या बॅग्स त्यावर ठेवल्या व चला सर माझ्या मागे मागे रूमकडे असं आम्हांला बेल-बॉय म्हणाला। आम्ही तिघे हसत रियाला बोललो , तुला विसरला तो आणि परत हसायला लागलो। हा ना पागल , रियाने तोंड फुलवत बोलली। योगेश ने रूमच्या चाव्या आम्हाला वाटल्या। 105 नंबरची रूमची चावी योगेशने स्वतःला घेतली, 106 नंबरची रूमची चावी हर्षला दिली , 107 नंबरची रूमची चावी रियाला दिली आणि उरलेली सुरलेली 109 नंबरची रूमची चावीI मग चावी वाटप समारोह नंतर लिफ्टमध्ये चढलो , पाहिल्या मजल्यावर जाण्यासाठी। आम्ही पहिल्या मजल्यावर आल्यानंतर, लिफ्ट मधून उतरलो। मी बारीक निरीक्षण करू लागलो। सगळ्या विंगमध्ये दोन दोन कॅमेरे बसविलेले होते। थोड्या-वेळात आम्ही आमच्या विंगमध्ये आलो।तिथे पण दोन कॅमेरे बसविले होते। बेल-बॉयने आम्हांला आमच्या रूम दाखविल्या। आम्ही सर्वांनी आपल्या आपल्या बॅग उचलल्या। धन्यवाद देव म्हणून , आम्ही त्याचे आभार मानले , पण काही टीप दिली नाही। देव तिथून ट्रॉली घेऊन नाराज झाल्यासारखा निघून गेला। हर्ष लगेच म्हणतो , याला टीप दिली नाही तर हा जाम नाराज दिसतोय । हो ना सवयच लागली असेल प्रत्येक व्यक्तीकडून काहीतरी टीप घेयची , रिया रागात बोलली । आम्हांला माहित आहे तुला इतका राग का आला आहे त्याच्यावर , तुला मॅडम नव्हता म्हटला म्हणून आलता आणि त्याचा राग तू इथे काढत आहेस , असं हर्ष म्हंटला व हसू लागला। आम्ही पण मोठ्याने रियाचा पचका झाला म्हणून तिच्यावर मोठ्याने हसायला लागलो। बरं बरं म्हणून रिया रागाने बॅग घेऊन रूममध्ये गेली। पोरगी चिडली रे असं म्हणून आम्ही पुन्हा हसायला लागलो। योगेश म्हंटला आता 11:10 झाले आहे तर सर्वांनी 11:30 फ्रेश होऊन माझ्या रूममध्ये या आपण तिथेच जेवायला ऑर्डर करू या मी रियाला कॉल करून सांगतो हे। मी आणि हर्षने ओके भाई , म्हणून आम्ही तिघे आपल्या आपल्या रूममध्ये गेलो। मी रूमच्या आत गेलोच होतो की इतका सुंदर रूम बघून मी हक्का बक्काच झालो। मी बॅग फेकून झोपेचा कोटा पूर्ण करण्यासाठी बेड वर पडलो। ए.सी. चालू केला , टीव्ही चालू केली मस्त आनंद घेऊ लागलो। आता क्रिकेटची मॅच आहे का नाही बघू लागलो।पण आता नव्हती मॅच काही वेळात होती , म्हणून टीव्ही बंद केला व बाल्कनीत आलो। जस मी बाल्कनीतुन बाहेर आलो मला स्विमिंग पुलचे दर्शन घडले।
