Hurry up! before its gone. Grab the BESTSELLERS now.
Hurry up! before its gone. Grab the BESTSELLERS now.

kanchan chabukswar

Tragedy


3.5  

kanchan chabukswar

Tragedy


निरोप

निरोप

5 mins 127 5 mins 127

अहिंसा, ममता, सहिष्णुता, या शब्दांचे बुडबुडे फटाफट फुटत होतं. समोरचा जेव्हा हिंसा करायला सज्ज असतो तेव्हा फुकटच आपला बळी जाऊ देणे हे योग्य लक्षण नाहीच मुळी. असहकार, वगैरेची भाषा जर हातात ताकद असेल तर, दुर्बलांना वरील शब्द शोभत नाहीत. देशामध्ये सलोखा राहावा म्हणून शस्त्रबंदी लागू केली गेली, पण गुंड मवाली लोकांनी पैसे चारून शस्त्रांचा परवाना आणि आधुनिक शस्त्रांचा रतीब चालूच राहिला. बळी कोण गेले? सामान्य जनता, शांतीने राहणारे लोक? स्त्रिया? मुली.

   आयुष्याचे बारा बारा वर्ष बाराखड्या आणि न लागणारे कधीही न उपयोगास येणारे शिक्षण. भूमिती रसायन काय उपयोग झाला त्याचा? त्यापेक्षा शाळेमध्ये एक तास स्वतःच्या रक्षणासाठी कसरत करण्यासाठी, शरीर कमावण्यासाठी जर लावला असता तर आज ही वेळ आली नसती. मूर्ख स्वार्थी राज्यकर्ते, वाढलेली वंशावळ, प्रतिस्पर्धा, कुठल्यातरी भ्रामक कल्पनांचा पगडा देशाला समजलेच नाही की आवाज न करता एक भला मोठा अजगर त्यांच्या रोखाने चालून येत आहे. अजगराच्या भयाने मूर्ख राज्यकर्ते सगळा खजिना घेऊन देशाच्या बाहेर पळून गेले, राजधानी असलेला बालेकिल्ला आयताच अजगराच्या सैनिकांच्या ताब्यात पडला. 


कालपर्यंत ठीक असलेलं जीवन एकदम विस्कटून गेलं. आज ना उद्या अजगर येणार , या भीतीने जमा केलेली लढण्यासाठी ठेवलेली सामग्रीदेखील पळपुट्या सैनिकांमुळे आयतीच अजगराच्या तावडीत सापडली. शांतपणे राहणारी जनता एकदम बावचळून उठली. कोणाचे पादत्राण कोणाच्या पायात राहिले नाही. त्या अजगराने सगळ्या मुलींची, विधवांची नोंदणी केली. घराच्या बाहेर फुली काढले, धडक बंद गाडी घेऊन मुली आणि स्त्रियांना उचलून नेले गेले. काल्पनिक कथांमध्ये राक्षस प्रत्यक्षात उतरला. गेलेल्या मुली आणि स्त्रिया परत कुणालाच दिसल्या नाही.


नवरे असलेल्या स्त्रियापण सुरक्षित नव्हत्या, बाहेर गेलेले नवरे परत येतीलच असं नाही, अचानक बँकांमधील गंगाजळी संपुष्टात आली, सगळी दुकान लुटली गेली, लहान मुलांच्या शाळा आगीमध्ये भक्षस्थानी पडल्या, सगळ्या स्त्रियांना घरी बसा नाहीतर अजगराच्या गुंडांच्या मुलांच्या आई व्हा, असा सक्त संदेश देण्यात आला.


     पंचवीस वर्षाची मेहरुन्निसा, शब्बीर फळवाला, ठोक बाजारातून फळ घेऊन, गल्लीमध्ये हिंडून विकणारा. अठ्ठावीस वर्षांची कुलसुम, नवरा रियाज, पेट्रोल पंपावरती काम करणारा. दर दीड वर्षांनी होणारी मुलं.


तीस वर्षाची मेहजाबीन, सहा मुलांची आई, पण विधवा. मोठी मुलगी 14 वर्षाची, दुसरी 12, अजगराची नजर तिच्याकडे वळली, एकाच मोहल्ल्यामध्ये राहणारे सगळे, अजगराची माणसे येऊन शब्बीरला घेऊन गेली, रियाज पेट्रोल पंपावरून परत आला नाही, त्याचा फोन आला, "फार काम आहे, बाहेर जावे लागणार आहे, जीवाला धोका नाही, तू सांभाळून राहा."


           कादंबरी सिंह, न्यूज चॅनेल चालवणारी, बिनधास्त स्त्री, तिच्याबरोबर काम करणाऱ्या मुली, गुरुजित्सिंग मान, गुरुद्वारा तला मुख्य सेवेकरी, त्याच्या सोबत असलेली माणसं, सगळेच आणि असे असंख्य अजगराच्या भक्ष्यस्थानी पडणार होते. बकासूर आला की गाडाभर अन्न एक माणूस आणि एक प्राणी याचा बळी घेऊन तो आठवडाभर शांत राहत असे, आलेला अजगर मात्र भयंकर भुकेला होता. त्याची भूक भागतच नव्हती.


त्या रात्री वस्तीमधल्या पुरुष लोकांना बाहेर काढण्यात आला, काहीही न सांगता ट्रकमध्ये भरून त्यांना कुठेतरी पाठवण्यात आलं, स्त्रिया मुले आकांत करत राहिली, त्यांना गप्प बसण्यास सांगितलं, सहकार केला तर घरचा पुरुष परत येईल असं सांगण्यात आलं. उरल्यासुरल्या टीव्हीवरून बातम्या यायला लागल्या, सगळ्या पुरुषांना गावाबाहेरची कुंपण भिंत उंच करण्यासाठी घेऊन गेले होते. आता शहराच्या बाहेरची भिंत दोन पुरुष उंच झाली होती, कोणीही भिंत ओलांडून बाहेर जाऊ शकत नव्हतं.


देश-विदेशातून आपआपल्या माणसांना घेण्यासाठी पंखवाले मोठे पक्षी आले, त्यांच्याबरोबर रक्षण करणारी सेना पण आली, पण त्या सगळ्यांना शहराच्या बाहेरच थांबवण्यात आलं. ठिकठिकाणी चौकशी नाके, कागदपत्रांची छाननी, या सगळ्यातून सुटका झाली तरच पंखवाल्यापर्यंत पोहोचणार. शक्यच नव्हतं बाहेर पडणे.


आता मात्र सगळ्या माता भगिनी कंटाळून गेल्या, त्यांचं भवितव्य त्यांना दिसू लागलं, अजगराच्या भक्ष्यस्थानी आज ना उद्या त्या पडणारच होत्या, बुरखे घाला काहीही करा, आज घराची नजर त्यांच्यावर पडणारच होती.


    गुरुजित्सिंग मान आपल्या कुटुंबासहित शहराच्या वेशीबाहेर पडल पडला, जाताना त्याच्याकडचा सगळं सामान काढून घेण्यात आलं, स्त्रियांच्या अंगावरचे सगळे दागिने काढून घेण्यात आले, खूप कसून निरीक्षण आणि चौकशी झाली, त्याला पकडून त्याच्या एम ए टी एम कार्ड मधून सगळे पैसे काढून घेण्यात आले, मग त्याला शहराबाहेर वेशीबाहेर हाकलून देण्यात आले. आता तो कुठल्या कामाचा नव्हता. धार्मिक ग्रंथाची प्रत डोक्यावर ती घेऊन "वाहेगुरू जी का खालसा" म्हणत गुरुजित्सिंग ने पंखवाल्या पर्यंत मजल मारली. कसातरी तो आजोबांच्या मायदेशी परतला. जिथे ना त्याला कोणी ओळखत होतं, ना त्याच्याकडे पैसे होते, होती फक्त सुरक्षा. एकेक करून सगळेजण शहर सोडून जाऊ लागले, त्यांची संपत्ती, घर गाडी, सर्व काही तिथेच. कफल्लक होऊन अंगावरच्या कपड्यानिशी त्यांना हाकलून देण्यात आले.


कादंबरीला कळेना, न्यूज चैनल की चालवत राहिली, पण तिला समोरचा धोका जाणवत होता, आलेल्या माहितीच्या क्लिप्स एकत्र करून तिने भरभर रेकॉर्डिंग केले, चॅनल चालवता येणार नव्हता म्हणून सगळ्या बातम्या यू ट्युबवरती टाकल्या, पण अजगराच्या सैनिकांनी नेटवर्कची वाट लावली. जमा केलेली संपत्ती, उभा राहिलेला बिझनेस, सगळं काही मातीमोल झालं. कादंबरी शेवटी आपल्या बरोबरच्या स्त्री कर्मचाऱ्यांना घेऊन रात्रीच्या अंधारात गाडीने निघाली, तिला माहित होतं ठीक ठिकाणी तपासणी नाके उभे केले आहेत, आपल्या सगळ्या फाइल्स तिने स्वतःला मेल केल्या, सगळ्या महत्त्वाचा बातम्यांचा खजिना तिने आपल्या कर्मचाऱ्यांना मेल करून ठेवला, कादंबरीची लहान मुलगी, आठ वर्षाची होती, नवरा काही कामासाठी दुबईला गेला, परतच आला नव्हता, पण त्याने तिच्यासाठी परवानगी पत्र पाठवले.


    परवानगी पत्र, जवळचे सगळे पैसे दागिने हे दाखवल्यानंतर शांतीदूतापर्यंत जाण्याचा मार्ग तिला मोकळा झाला, स्वतःबरोबर जिवाच्या जोखमीवरती तिने तिच्या हाताखालच्या आठ महिला कर्मचाऱ्यांचा जीव वाचवला आणि त्यांच्या सकट दुबईचे विमान पकडले. मेहरुन्निसा, कुलसुम यांना कुठला देश माहिती नव्हता, इथेच जन्मल्या होत्या, इथेच मरणार होत्या, नवऱ्याला उचलून नेण्यात आलं होतं. त्या रोज नवीन मरणाला सामोऱ्या जात होत्या.

त्यांच्या मुलींना पण उचलून नेण्यात आलं होतं, अजगराच्या घराकडे. परतीची वाट खुंटली होती.


   मेहरुन्निसानी आपली छोटी मुलगी, बुरख्याआड लपवली, रात्रीच्या अंधारात काळा बुरखा पांघरून मुलीला झोपेचे औषध पाजून ती संरक्षण भिंतीच्या तिथे येऊन उभी राहिली, हात पाय मारत राहिली, तेवढ्यात वरून शांतिदूतचा सैनिक डोकावला, आपल्या मुलीला एका गाठोड्यात लपेटून मेहरुन्निसाने तिचे शेवटचे चुंबन घेतले, शेवटचे तिला छातीशी कवटाळले, आणि धाडकन तिला शांतीदूताच्या रोखाने फेकून दिले.

"माफी कर दे मेरी गुडिया, मुझे माफी दे, जा तू खुश रहे, अमन चैन से रह! अल्लाह मालिक." मेहरुन्निसाने रडत रडत आपल्या मुलीचा निरोप घेतला. मुलीच्या बरोबर तिने आपल्या कुटुंबाचे छायाचित्र माहिती थोडे पैसे आणि तिच्या गळ्यातली साखळी हे ठेवलं होतं.


शांतीदूताने परत भिंतीवरून डोकावून बघितले, मेहरुन्निसाला आश्वस्त केले, तेवढ्यात धाडधाड आवाज झाला, अजगराच्या सैनिकांनी बेछूट गोळीबार केला ज्यात मेहरुन्निसा या नरकयातनेतून कायमची सुटली. पन्नास-साठ वर्षे चक्रानंतर हीच अवस्था कुठल्या कुठल्या देशांची होत आहे, तरीपण सहिष्णुतावाले आपली भाषणबाजी करतच आहेत. निरोपाचे दुःख ज्यांना द्यावा लागतो त्यांनाच कळतं.


Rate this content
Log in

More marathi story from kanchan chabukswar

Similar marathi story from Tragedy