Navanath Repe

Tragedy

1.0  

Navanath Repe

Tragedy

नावाला जयजयकार

नावाला जयजयकार

5 mins
1.1K'कली बेच देंगे, सुमन बेच देंगे ! गगन बेच देंगे ! जमी बेच देंगे !!
कलम के पुजारी सो गये तो ! वतन के पुजारी वतन बेच देंगे !!'

आजकाल दहशतवादी व दहशतवादी हल्ले हा नुसता शब्द जरी कानावर पडला तरी प्रत्येक आईच्या काळजाच पाणी पाणी होतं, पण दहशतवादी हल्ला होऊनही काही राजकीय पक्ष अथवा पक्षप्रमुख या हल्ल्याकडे व त्यात शहीद झालेल्या जवानांकडे गांर्भियाने पाहत नाहीत ही फार मोठी शोकांतिका आहे.
जम्मू - कश्मीरच्या पुलवाना जिल्ह्यात "जैशे महंमद" या दहशतवादी संघटनेने काल परवा केलेल्या भ्याड हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीसदलाचे (सीआरपीएफ) ४२ जवान शहीद झाले. स्फोटकांनी भरलेले वाहन दहशतवाद्यांनी जवानांच्या बसवर धडकवले. सुमारे ३५० किलो स्फोटकांनी भरलेले हे वाहन जवान असलेल्या वाहनावर धडकवून दशतवाद्यांनी हा क्रुर हल्ला केला. उरी येथिल लष्करी तळावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्यानंतरचा हा सर्वात मोठा हल्ला आहे. हा पाकिस्तान व तेथिल दहशतवादी संघटनांकडून केलेला भ्याड हल्ला आहे, म्हणून पाकिस्तानसारख्या क्रुरकर्मा राष्ट्राचा निषेध केलाच पाहिजे.
देशातील तरुणाई एकीकडे व्हेलेंटाईनच्या शुभेच्छा देण्यात व्यस्त होती तर, दुसरीकडे शहीद जवानांच्या घरातील मंडळी दुःखाच्या विरहात डुबून गेली होती, तसेच दुसरी खेदाची गोष्ट म्हणजे देशाचे सर्वेसर्वा हे फोटोशेसन करण्यात व्यस्त होते तर, काहींना मंदीराची चिंता सतावत असल्यामुळे ते सभा घेत फिरत होते. हल्ल्यात महाराष्ट्रातील ०२ जवान शहीद झाले असतांना देखिल पक्षाचे सर्वेसर्वा हे लोकसभा मतदार संघनिहाय जागावाटपासंदर्भात चर्चा करत असल्याचे प्रिंट मिडीयाच्या माध्यमातून वाचण्यात येते, त्यावेळी असा प्रश्न पडतो की, संपुर्ण देशातील जनता दुःखाच्या विरहात असतांना मात्र राजकीय पक्षातील नेत्यांचे अशा प्रकारचे वर्तन योग्य आहे का ?
देशाच्या सिमेवर असणारे तसेच दररोज शहीद होत असलेले जवान हे सर्वसाधारण घरातील शेतकरी कष्टकरी यांचे सुपुत्र आहेत. शेतकरी आपल्या पोटाला चिमठा देऊन मुलांना दोन वेळची "कांदा - चटणी - भाकर" खाऊ घालून आपल्या पुत्रानां देशसेवेसाठी सैन्यात पाठवत असतो. सैन्यात असणा-या वेगवेगळ्या रेजिंमेंटचा अभ्यास केला तर असे निदर्शनास येते की, त्यात 'मराठा, जाट,रजपुत,शिख,महार' अशा प्रकारच्या रेजिमेंट आहेत. पण जे आत्ताच काही दिवसांपुर्वी केंद्र सरकारने दिलेल्या सुवर्ण आरक्षणाचा फायदा घेत आहेत, त्यांच्यासाठी आतापर्यत कोणती रेजिमेंट होती ? मग जर नसेल का नाही ? जे देशासाठी कधीच शहीद होत नाहीत, ते सैनिकांच्या पत्नीविषयी अपशब्द बोलतात. म्हणजे एकीकडे आमचा बापही शेतात गळफास घेऊन मरणार अन् मुलगा देशासाठी शहीद होणार असेच ना. तर दुसरीकडे एकाच माळेतील मणी असेलेले राजकारणातील सत्ताधिश व विरोधक हे विकास कामांचा भुमिपुजन शुभारंभ, मंदीर व मतदार संघनिहाय जागा वाटप करण्यात व्यस्त होते ही खुप मोठी शोकांतीका आहे. याबद्द्ल म्हणावेसे वाटते की, "जो भगवान का सौदा करते है, वो इन्सान की किमत क्या जाने ?, जो 'धान' की किमत न जान सके, वो जान की कीमत क्या जाने ?"
लालबहादुर शास्त्री यांनी एक नारा दिला होता तो 'जय जवान - जय किसान' हा नारा मात्र केवळ नावापुरताच राहीला आहे का ? सरकारने व विरोधकांनी हा नारा बदलून 'मर जवान - मर किसान' असा तर केला नाही ना हा प्रश्न पडतो ? दि.१६.०२.१९ रोजी संपुर्ण महाराष्ट्रासह बुलढाना जिल्ह्यात शोककळा पसरली असतांना देशाचे सर्वेसर्वा हे विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथे विविध विकास कामांचा भुमिपुजन सोहळा पार पाडतात त्या कार्यक्रमासाठी महाराष्ट्राचे अर्धे मंत्रिमंडळ उपस्थिती दर्शविते, मात्र शहीद जवानांच्या अंत्यविधीला कोणताही राजकीय नेता अथवा पुढारी उपस्थित राहू शकत नसेल तर मग ही कधीही न विसरता येणारी खुप मोठी लांचनास्पद गोष्ट आहे, असेच म्हणावे लागेल. देशाचे प्रधानमंत्री हे गंगानदीत स्नान करून नदीकिनारा साफ करणा-या व्यक्तीचे पाय धुत आहेत, त्याऐवजी त्यांनी शहीद झालेल्या जवानांच्या आई - वडीलांचे पाय धुऊन त्यांचे अश्रु पुसण्याचे काम केले असते तर चांगले झाले असते, मात्र ते जवानांच्या जिवाची किंमत पैशाच्या स्वरूपात मोजण्याचं कार्य करतात. जर सरकारकडून हे काम केले जात असेल तर ही खुप मोठी शोकांतीका आहे.
छ. शिवरायांच्या काळात सरसेनापती प्रतापराव गुजर हे स्वराज्याच्या कामी आले होते, त्यावेळी शिवरायांनी स्वत: प्रतापराव गुजरांच्या घरी जाऊन त्यांच्या पत्नीचं सांत्वन केले व त्यांच्या दु:खात सामील झाले होते हा इतिहास आहे. तसेच शिवरायांच्या युध्दनीतीचा अवलंब करून व्हिऐतनाम सारखे छोटेसे राष्ट्र जर बलाढ्या राष्ट्राला चितपट करत असेल तर मग आमच्या आत्ताच्या लोकशाहीतील राजाला शिवराय समजलेच नाहीत की, त्यांनी समजूनच घेतले नाहीत हा प्रश्न पडतो. मात्र आमच्या राज्यकर्तांना शिवराय हे निवडणुकीपुर्वी 'शिवछत्रपतीचा आशीर्वाद अन् चला देऊ ..... साथ' ऐवढ्यासाठीच पाहीजे होते का ?
आज रस्त्याने चालणा-या गाडीतील ड्रायव्हरने शिटबेल्ट लावला की नाही हे आजच्या सुरक्षा यंत्रणेच्या नजरेतून सुटत नाही, तर मग एक आरडीएक्स भरून असलेली दहवतवाद्या़ची गाडी त्यांच्या नजरेतून सुटलीच कशी ?, जवानांची गाडी ही बुलेटफ्रुफ नाही ? हे दहशतवाद्यांना समजलेच कसे ? व तो स्फोट झाल्यानंतर ते आरडीएक्स नेमकं ३५० किलोचं होत हे मोजलं कसं ? याचा आता आम्ही बारकाईने विचार करावा लागेल.
देशातील लोकशाहीच्या राजाने स्वराज्यातील आण्णाजी दत्तो व सूर्याजी पिसाळ शोधून काढले पाहीजेत. तसेच आता देशाच्या अंतर्गत व सिमेवरील सुरक्षेवर गांभीर्याने विचार करायला पाहिजे. त्यासाठी नुसते लंबेचौडे भाषण ठोकून भागणार नाही. जनतेचे पोट हे भाषणाने भरत नसून ते राशनाने भरते त्यामुळे आता लोकशाहीतील राजाला जर पाकिस्तानसारख्या विक्रुत राष्ट्राला चितपट करायचे असेल तर, छ. शिवाजी महाराजांच्या युध्दनीतींचा व त्यांच्या गुप्तहेर खात्याचा अभ्यास करावा लागेल. मात्र हे सरकार देशाच्या सुरक्षेसाठी महायज्ञ करायचे म्हणते आणि त्या यज्ञाच्या सुरक्षेसाठी सैनिकांची नेमणूक करणार आहे. ज्यावेळी शिवरायांच्या स्वराज्यावर औंरगजेब चालून आला होता, त्यावेळीदेखिल त्याला विजय मिळावा म्हणून स्वराज्यातील काही सुर्याजी पिसाळांच्या साथीने औरंगजेब बादशाहाने कोटीचंडी यज्ञ केला होता, पण औंरगजेब बादशहाला केलेल्या यज्ञाचा काहीच फायदा झाला नाही. हा पुरावा असतानां सुध्दा आजचे सरकार जर यज्ञ करत असेल तर हे सरकार अंधश्रध्दा पसरवून जनतेची व सरकारी तिजोरीतील पैशांची उधळपट्टी करणार की काय ? तर मग जे अधिकारी यज्ञ करण्यास राजी आहेत ते दूधखुळे आहेत की त्यांचे डोकेच खुळखुळे झाले आहे का हा प्रश्न पडतो.
आता देशातील सरकारने व गुप्तचर खात्यातील अधिका-यांनी छ. शिवरायांची युध्दनीती तसेच बहिर्जी नाईकांनी साभांळलेले गुप्तचर खाते यांचा अभ्यास करून या विकृत विचारसरणीच्या पाकिस्तानी दहशतवादी संघटनांना व स्वराज्यातील सूर्याजी पिसाळ तसेच अण्णाजी दत्तो सारख्यां गद्दारांना धडा शिकवता येईल हे मात्र नक्की ...


"शायर हु मैं फर्ज है मेरा आयना दिखाना , मैं लाशों पर गझल कर नही सकता , इस जुल्म की जो सजा दो मुझे , लेकिन मैं जुल्म पर कभी खामोंश रह नही सकता !"


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy