STORYMIRROR

Sanyogita Mahajan

Comedy Inspirational Others

3  

Sanyogita Mahajan

Comedy Inspirational Others

नात्यांच्या रेसिपीची कहाणी

नात्यांच्या रेसिपीची कहाणी

6 mins
227

 थोडा उजेड ठेवा, अंधार फार झाला..!

 पणती जपून ठेवा, अंधार फार झाला..!

 काळ्या ढगात वीज आहे पुन्हा लपून, घरटी जपून ठेवा, अंधार फार झाला...!

 हे वाटतील परके आपलेच श्वास; आता हातात हात ठेवा...!

अंधार फार झाला चोहीकडे असाच अंधार दाटून आला आहे घरोघरी कोरोनाने थैमान घातले आहे कोठेही सकारात्मक वातावरण ठेवायचे म्हटले तरी पॉझिटिव्ह या शब्दाचीच आयुष्यात प्रथमतः भीती वाटत असून नात्यांची घडी विस्कटलेली आहे असेच काहीसे विदारक चित्र सध्या सर्वत्र पहायला मिळतंय...!!!


आपल्या कुटुंबाला, नातेवाईकांना धीर देऊन त्यांचे मनोबल वाढवणे इतकच काय ते आपल्या हातात आहे...! आमचं कुटुंब मोठं...पै पाहुण्यांची रेलचेल सतत असते त्यात आमचा लेडीजचा फेमिना लाऊंज ग्रुप सगळ्या नोकरी-व्यवसायात व्यस्त पण या वातावरणामुळे खूपच फ्रस्टेट झालेल्या..😢 अशावेळी काय करता येईल याचा विचार केला मग डोक्यातून भन्नाट आयडियाची कल्पना निघाली हेल्थ न्यूट्रिशन पाककला स्पर्धा घ्यायची ...!

पण या स्पर्धेत बनविलेल्या रुचकर पदार्थांची चव कशी चाखायची हा मोठा प्रश्न पडला...!! मग ठरलं हेल्दी न्यूट्रिशन, लहान मुले आणि कोरोना पेशंट यांचा विचार करून रेसिपी पाठवा. त्यातले प्रोटीन व्हॅल्यू, कमी तेल व उपलब्ध प्रथिने इत्यादीचा विचार करून विजेती घोषित केली जातील. माझी सिंगापूरची मैत्रीण राजश्री जी प्रोफेशनल डायटीशियन आहे तिच्याकडे सर्व व्हिडिओ रेसिपी सेंड केल्या... पण हे सार ऑनलाइन करताना काही वेगवेगळे अन् भन्नाट अनुभव आले ते मांडतानाही  काहीही म्हणा मला जाम भारी वाटतयं..!!😊


पहिल्यांदा पोस्ट पडली पण ती तर तयार करतांना या 5- 50 जणींच्या पचनी पडेल का नाही याचा इमोशनल लोच्या डोक्यात होता😉 पण होईल ते होईल जाऊन धडकायचे ठरलं माझी नणंद अंजूताई आणि मी सगळ्यांना वैयक्तिक फोन केले. होय-नाही होय-नाही करत आमच्या बापड्या बाया( हो बायाच😆😜 "बाया "वाचताना दातओठ नक्कीच खातील😝 खाऊ देत माझे कुठे खाणार आहेत, त्यांचीच खातील हा..हा..हा..हा ..ही..ही🤪) या बाया बसल्या घोड्यावर चांगल्या किचन नावाची तलवार घेऊन यांचं सुरू झालं सर्चिंग, सरफिंग, गुगल दादा, युट्युब, नखरेवाली मधुरा ,आमचा फेवरेट ढब्बो प्रशांत दामले आणि कोण कोण होते बाबा यांच्या मदतीला देव जाणे...!🙄( या बायांनी गुगलला तर लय लय फिरवलं राव..😢 बिचार तिथंच तिथच फिरून फिरून वैतागल🤪)


मग यांची स्वारी गेली कपाटात कोणता ड्रेस घालू कोणती साडी घालू की गाऊन वरतीच करू( साड्या ,ड्रेस तर काय चुळबूळ करत होते राव ...का ?काय विचारता ,इतके दिवस बिचारे कपाटात अडकून होते. बाहेर जाणं नाही की येणं नाही आणि सगळे एकदम जल्लोषात म्हणू लागले" हिप्प हिप्प हुर्रे, मालकीण जिवंत हाय रे देवा"..नाचा नाचा डी जे लावून नाचा😆) त्या त्या कपड्यांचा हि भांडण लागलं हे मालकिन मला घे ग ,तुला नको मेल्या मला घेऊ दे, ए sssही किती भडक? लग्नात नाही जायचं.. रेसिपी करायची आहे. हे पांढऱ्या, तू नको लागू तिच्या हाताला तू खराब होशील रेसिपी करू पर्यंत..! काय बोलणार नाही ही मालकीण नंतर एरियल, सर्फ एक्सेल मध्ये घालून र गड्या.....रगडेल तुला आणि धु -धु शिवा घालून तुलाही ठेवेल ही ही ही😆 असं बरच गॉसिप कपड्यांमध्ये सुरू होतं तोच एकाच्या गचांडीला पकडून मालकिणीने बाहेर काढलं अहो... कसं वाटतं ???"अहो" तो फोन ठेवा आणि बघा ..🥰तो घाल कायपण...!!येड मेलं ध्यान नेहमी फोन मध्येच🧐 जाऊदे घालते काहीतरी 😡करीत ड्रेस ,साडी पसंत पडली काहीना तरी गाऊनच पसंत पडला आणि मग या बसल्या ब्लाऊज उसवायला घेऊन ..!का??? काय विचारता लॉकडाउन दुसरं काय😆 मग आल्या क्रोकरी सेट कडे...! बिचारा तो धुळ खात पडला होता कोपऱ्यात... याला मात्र या बायांनी हलकेच अलगद घेतलं, पायात येणाऱ्या पोरांना हसडल आणि क्रोकरी सेट ला अलगद ठेवून दिलं किचन टॉप वर....!


मग लागल्या नवऱ्याच्या पाठीमागे अहोss अहोsss द्या ना आणून. मग यांच्या"अहो" चं डोकं सटकलंच.. मगाशीच सांगायला नाही का झालं? एकासाठी गावात पळवतेस सारखं सारखं, मी काय तुला हे हे वाटलो का??😡. मग आमच्या हिरोईन लागल्या की मस्का मारायला...बीचाऱ्यांची विकेट गुल झालीच मग यांच्या अहो नी पाव मागताना किलो किलो हजर केले (किती ग प्रेम उतू....पण प्रेम बीम काय नाही हा ....पुढे डोक्याला ताप नको म्हणून आधीच आणलं ही ही ही😆) मग याच उत्साहात तिन्ही पिढ्या सामील झाल्या. पहिली पिढी 70 ते 80 च्या वयाची. आता त्यांना कसं व्हिडिओ जमणार????? त्या आपल्या लागल्या आमच्या पाठीमागे काय करू ? कसं करू? खरं सांगू का, या वयाच्या आमच्या सासवा ,आत्या या स्पर्धेत उतरल्या तेव्हाच वाटलं की "मीच" ही स्पर्धा जिंकले.👑 यांचा उत्साह वाखाणण्यासारखा होता. तुरुतुरु इकडून, तिकडून करणं. नात सुना,सुना काय करतात त्यापेक्षा माझं वेगळ असावं हे यांच्या डोक्यात शिजत होतं. एकंदरीत सुरू झालं एकदाचं रेसिपी रामायण ,मग घरोघरी माझी रेसिपी किती हेल्दी आहे याची पारायण सुद्धा सुरू झाली😉. अन शेवटी तो दिवस उजाडला. रेसिपी चा व्हिडिओ करायचा...! आता कॅमेरा कसा आणि कोणत्या अँगलने पकडणार?? झाला का लोच्या..! इतके दिवस तर घरात सगळ्यांना म्हणत होते "माझी मी समर्थ आहे" मला तुमच्या कुणाची गरज नाही पण याच चिंगळ्या कॅमेरा ने माझा वाजवला की हो बाजा 😢ओ आता मी काय करू आणि कसा करू .!!????आता पडा पोरांच्या, त्यांच्या पप्पाच्या पाया🙏🏻


मग घरातील ही पोरं यांच्या पत्त्याचा डावात रंगायाची, मोबाइल गेम मध्ये दंग असायची अगदी यांच्या पिक पॉइंटला जाऊन माझं शोनु ....माझं गोडू...माझं बच्चा करत मस्का मारला काही घरातील शोनू बच्चू इतकी गोड ना की दादच देत नव्हती(आगाव कुठली 😝)आणि काही मांजरीच्या पिल्लाप्रमाणे पायात पायात करत आईला टेक्नॉलॉजी चे धडे देत होती. मराठी टायपिंग कसे करायचे .कॅमेर्‍यात कसे बोलायचे, सगळं शिकवत होते या आया भरल्या डोळ्यांनी त्यांना पाहत होत्या ,किती मोठी झाली माझी पाखरं.मूआ ss😘. पण व्हिडिओ काही लवकर बने ना 😢कट.. कट.. कट, किती ही सराव करून वाक्य चुकलंच, थांब थांब पुन्हा म्हणते .हा खाली बघू नको. इथे इथे बघ ,थांब मी माझं नावच नाही सांगितलं🙄 खूप मोठा झाला का व्हिडिओ 🤨थांब मी पुन्हा प्रॅक्टिस करून करते. आता बॅकग्राऊंड म्युझिक काय लावू ????असे आणि एक ना अनेक प्रश्न आणि त्याची उत्तरं शोधत एकदाचा तो व्हिडिओ तयार झाला. हुश्श sss😝 कोणी यात व्हिडिओ बनवायला शिकले तर कोणी कॅमेर्‍याला फेस करायला शिकले. सगळ्यांनाच खूप भारी अन स्पेशल होत होतं. कुठेही कमतरता राहणार नाही याची सगळ्या काळजी घेत होत्या.


मग यांच्या रेसिपी ला सुरुवात झाली हळूहळू गौरी- नीताचं नाचणी सूप अन् थालीपीठ आलं आणि लागले दोघं नाक मुरडायला😏 नाचणी सूप मिरवून सांगू लागलं माझ्या मालकिणीचे मी ओन इनोव्हेशन आहे. माझ्या मालकिणीने मला कुठेही न सर्च करता बनवले😍 लगेच थालीपीठला लागला मिरची चा पुणेरी ठसका.....अरे... मी पण आहे ट्रॅडिशनल. मला अजूनही सगळ्या शॉपिंग फेस्टिवलला आहे मान ..!तरीही मुंबईचा सूप काही आपला ठेका सोडेना (सूप होतचं गोड भारी) तोपर्यँत एन्ट्री मारली अमृताच्या मोमोज ने..!! अन वैभवी ,ज्योती यांच्या मुगाच्या धीरड्या कडे त्याचे चोरून चोरून बघणे झालं ,"मै तेरा राजा बन जा तू मेरी राणी ,तनु महल बना दूंगा !!सुन मेरी रानी ...रानी ....बन मेरी रानी ....रानी.... शहाजहान मै तेरा तनु मुमताज बना दूंगा.!!! त्यांच नजरेनच सुरू झालं तोपर्यंत दिपाली चे आणि सुवर्णा चे कटलेट्स मध्ये टुकुर टुकुर टुकुर टुकुर दिल मे हा, ओठो पे ना आये ,भरे बाजार में दील तोड गई जालीमा म्हणत टुकुर टुकुर टुकुर सुरू झालं.☺️ इथे पुन्हा स्वाती आणि प्रीतीच्या मुगाच्या धीरड्यात नोक्- झोक सुरू झाली. एक पुणेरी ठसका तर इकडे सोलापुरी तडका आता मध्यस्थी ती कोण करायची ?????मग आले धीर गंभीर पणे रोहिता चे सातारी आप्पे....! दिले दोघांच्या हातात हात आणी म्हणाले नांदा सौख्यभरे( आप्पे रॉक धिरडे शॉक)


तोपर्यंत अमृताच्या मुगडाळ ओट्स चिला अन् सायलीच्या मोड आलेल्या कडधान्य सुपाने, रेवतीच्या पराठ्या ने घेतला सर्वांचा डायट क्लास ..रूपाच्या कचोरी ने हळूच नाक मुरडले सारखच काय ते घास पूस घासपूस ,कधीतरी मारला कचोरी डोसावर ताव तर काय बिघडलं यात आहेच कि न्यूट्रिशन भारी भारी.....! तोच लुंगी नेसून केळीच्या पानावर बसून केरळ चे पाहुणे उत्तप्पा, सुवर्णाच्या डायनिंग टेबल वर हजर झाले...! सुवर्णाने दिले एक टोचून कोरोनाचे इंजेक्शन, 💉गेले उड्या मारत सुधाबाईंच्याच् घरी(🤪😄😄 पाहुण्यांना अस करतात व्हय...कोरोना काळात जाऊ नये कुठे.😢)सुधाने त्यांना दिली चटपटीत मोड आलेल्या धान्याची भेळ सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटले अन् म्हणाले चला चव चाखायची आली वेळ....! गौरीचे पनीर सॅलड म्हणाले, चला मारू ताव सगळ्यानीच😋😋 सगळ्यांनी सगळं खाल्लं पण काहितरी चविला कमीच पडलं..! जिभेला आतून काहीतरी हवं असं वाटलं, तोच खुदकन हसत अन्नपूर्णेचे ताट आलं...! त्यात लगबगीने आले नम्रताचे उडीद पापड आणि पौष्टीक खिचडी, त्यांनीही खाल्ला एका ताटात भाव.

सुग्रास पोष्टिक गूळपोळी त्यावर मऊसूत पांढऱ्या भाताची मुद अन् त्यावर तुपाची धार बेलाचे पान...! सर्वांना नैवेद्य दाखवून महाजन पाहुणे रावळे बसले पंगतीला एकच मुखात भाव "अन्न हे पूर्णब्रम्ह उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म" अन्नदाता सुखी भव ...!!!!! कुणी उतू नये मातू नये उष्टे काही सोडू नये अशीही सफलसाठा उत्तराची संपूर्ण कहानी...!


Rate this content
Log in

Similar marathi story from Comedy