STORYMIRROR

Sanyogita Mahajan

Others

2  

Sanyogita Mahajan

Others

मैत्री थोडं मनातलं

मैत्री थोडं मनातलं

2 mins
135

मैत्री कधीच सहज, सुलभ ,सोप्पी नसते ती गुंतागुंत असते एकमेकांत..जशी मॅगी😜.जितकी खावी तितकी टेस्टी तस जशी अनुभवावी तितकी बेस्टी .👍 कधी खळखळून हसवते... कधी कॉलर पकडून आईबाबांच्या नावाचा उद्धारपण करते...पण जेव्हा गरज असते तेव्हा आपल्याला हाकेच्या आधीच मदतीला पुढे असते.डब्ब्यात आज काय?तुझ्या खिशात किती चिल्लर..?माझ्या पर्समध्ये इतकंच..😢पर्यंत कटिंग पिण्यासाठी ही यारी सोबत असते....घरी चोरून पिक्चर्स, फिरायला जायचे प्लॅन च्या फाडु आयडिया ची कल्पना याच मंडळी देतात.😆आपण फक्त न चाचपडता अंमलात आणायच्या हं आणि जर यात कुठे चुकलात तर पृष्ठभाग सुजलाच म्हणून समजायचा😜...!!


अभ्यास एकट्याने करायचा नाही,नाहीतर मैत्री जमात खूप चिडते😡...सगळ्यांनी मिळून दांड्या मारायच्या, लेक्चर्स बंक करायचे...मग सगळं ठीक..!पण यात कोण तरी असतो कान पिळणारा मग लागतात हो नाही ,हो करत जोमाने अभ्यासाला...मग यांच्या पार्ट्या....का ..काय?विचारताय...यांचाच विजयी पताका मेरिट लिस्टला🤷🏻‍♀️.आईनं दिलेला डब्ब्यात कितीतरी वाटण्या पडतात.. चोरून खाणं पण मुश्कील... काय असेल ते यांच्याबरोबर वाटायचं...!आईचं ही बरं असतं आठवणीन प्रत्येकाचं देते..सगळे काकू मस्त झालंय म्हणून महिन्याभराचा खाऊ एका तासात फस्त करतात. कुणाचं नावं कुणाबरोबर जोडलेले आहे, हे या टोळक्याला नक्की माहीत असतं(जसं काही एजन्सी यांची या कामासाठी रजिस्टर आहे कुणाचं खरं प्रेम आहे..कुणाच्या लग्नात दंगा करायचा हे मस्त प्लॅन करून असतं मैत्रीत.शिक्षक कसे आहेत...त्यांना कोठे काय सांगून भेंडी चढवायची हे पक्के माहीत असते (ते पण बाप असतात शेंडी लावणे त्यांना कळतं🙄)मैत्री ही अशीच असते ना तिला कोणतं बंधन ना कोणती कारण....विचार जुळू देत अगर नाही जुळू देत ती ओढली जातात ...दुःखात सुखात साथ देतात. एकवेळ रक्तातील नाती दुरावतात पण हे नातं हजारदा तुमच्याशी भांडेल, दोन कानाखाली देईल...


पण तुमच्यासाठी भांडायला तेच पुढे असेल.पण खरंच सांगू हे नातं कळायला खूप अक्कल यावी लागते🤷🏻‍♀️..काहींना खऱ्या मैत्री चा अर्थच कळतं नाही.असो.....!पण खरं सांगू का मस्त असत मैत्री च ट्युनिंग जमणं... रात्रभर गप्पांचा फड...मनोसोक्त हसणं.. धायमोकलून मैत्री च्या मांडीवर रडणं.. पाठीवर सोबत आहोत ही आश्वासक थाप,डोळ्यात साठवून ठेवलेले दुःख वाचणारे प्रेमळ डोळे...हळूच गाल ओढून वेड ग वेडं... म्हणून लहान बाळासारखं ट्रीट करणं...हे जे कुणाच्या नशिबात आहे तो खरंच खूप नशीबवान आहे.चांगलं वाईट याची समज देणारं, ज्या गोष्टी कधी कधी घरात माहीत नसतात त्या फक्त मैत्री त माहीत असतात. चुकीच्या गोष्टी लक्षात आल्यावर सावध करून,कान पकडणार नातं मैत्री च असतं. मैत्रीत असतो ओलावा..लग्न झाल्यावर थोडं काय जास्तच बदलत... पण तरीही मैत्री जपावी.आपली स्पेस जपणार कोणीतरी हवं.. ती स्पेस मैत्रीत जबरदस्त जपली जाते.पण त्यासाठी तावून सुलाखून मैत्री झालेली असावी.


ओळखीच्या सगळ्यांनाच मैत्री हे लेबल चिकटवण्याचा बालिशपणा करू नये. कारण मैत्री अंतःकरणातील हळुवार जपलेला ओलावा असतो.ओळखीच्या लोकांत तो नसतो.म्हणून आपलं पहिलं वर्तुळात कोण कोण येतं ते तपासणं गरजेचं असतं.आपलं पहिलं वर्तुळ हे आपलंच पाहिजे तिथे आपल्या मैत्रीचे फ़ंडे,वसूल,राज्य ...सगळं आपलं!!मनाने तरुण रहायचं असेल ना तर मित्रमैत्रीण हे उत्तम टॉनिक आहे.ते सोबत असेल ना तर आयुष्य जगण्याचा फील खूप सुंदर आहे.तो सुंदर फील घ्यायचा असेल ना तर पक्की मैत्री करा...अन फील करा...तेरे जैसा यार कहा...तेरे जैसा याराना...!!


Rate this content
Log in