Meena Mahindrakar

Fantasy

3.5  

Meena Mahindrakar

Fantasy

नातं

नातं

4 mins
207


एकदा त्याने तिला विचारलं 'तुझं माझं नातं काय'? आणि ह्या प्रश्नाला ती गोंधळून गेली. तिला तरी कुठे माहित होतं ह्या नात्याला काय नाव द्यायचं ते. डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूंना वाट देत ती बोलून गेली "नात्याला काही नाव नसावे...

पण ह्या उत्तराने त्याचे समाधान झाले नाही.

आणि अखेर ठरले आपले नाते म्हणजे "मैत्रीच्या थोडे पुढे ,आणि प्रेमाच्या थोडे अलीकडे...."

अशा या आगळ्यावेगळ्या नात्याला न्याय देण्यासाठी दोघांनी खूप प्रयत्न करायचा ठरवल.नात्याची उंची वाढविण्यासाठी जे काही करता येईल ते करायचे ठरवले.

दोघांनी कमिटमेंट केली.ती अशी होती

1 नात्याला योग्य न्याय देने

2  एकमेकांसाठी weekness नाही तर strents बनणे

3 स्वतःपेक्षा दुसऱ्यांचा जास्त विचार करणे

4 मैत्री न लादता ती व्यक्ती जशी आहे तशी स्वीकारणे 5 त्यांच्याकडून अपेक्षा न करणे

6 भावनांचा आदर करणे

7 मैत्रीचा नात्याचा उपयोग असा करणे की आज पर्यंत तो कोणीच केला नसेल

8 ज्यामुळे दुसऱ्यांचे भले होईल असे काहीतरी ह्या मैत्रीची फलश्रुती असेल

9 घर कुटुंब प्रत्येक नात्याला योग्य न्याय देऊन मग स्वतःसाठी जगणे

9 थोडक्यात मनाला समाधान मिळणार काम एकत्र ठेवणार काम करणे .

10 दुसऱ्यांसाठी जगणे, जपणे आणि एका विशिष्ट उंचीवर त्या नात्याला घेऊन जाणे

11 त्या नात्याला मैत्रिने उजळून टाकणे ,त्याला अमूल्य बनवणे. आपणच आपला हेवा करू असं नातं जोपासणे .

12 देव सुद्धा अशा नात्याने खुश होईल, आणि समाजासाठी चांगलं काम आपल्याकडून करून घेईल अशी ह्या मैत्रीची फलश्रुती असेल.

13 एकमेकांची पर्सनॅलिटी जास्तीत जास्त डेव्हलप करण्याचा प्रयत्न करणे .एकमेकांचा भक्कम आधार बनणे, पॉझिटिव्ह बनणे ,स्ट्रेस मधून बाहेर काढणे   14 समोरच्या व्यक्तीला एक व्यक्ती म्हणून एवढे मोठे बनवणे की आपल्याला त्या व्यक्तीचा अभिमान वाटला पाहिजे

15 नाजूक, निस्वार्थी पण आगळवेगळ असलेल्या ह्या नात्याची उंची वाढविण्यासाठी खूप कष्ट व त्यागाची गरज होती.

      

दोघांनीही ही कमिटमेंट पूर्ण करण्यासाठी जे करता येईल ते प्रयत्न करण्याचे ठरवले.☺️ पण तिला माहीत होते त्याच्याकडून ही गोष्ट फक्त काही दिवस शक्य होती. असे कितीतरी अनुभव तिने या अगोदर घेतले होते. तरीही त्याच्या मते आता तो खूप मॅच्युअर झाला होता आणि ती मॅच्युरिटी लक्षात घेऊन हे नाते जपण्यासाठी तो खूप खूप प्रयत्न करणार होता आणि त्याच्या कमिटमेंट मध्ये त्याने ठरवले होते की काही झाले तरी चालेल यानंतर मी माझ्याकडून कोणतेच दुःख होऊ देणार नाही .

अगोदर केलेल्या चुकीसाठी खरोखर माफी त्याने मागितली होती आणि यानंतरच नातं जपण्यासाठी पूर्ण प्रयत्न करण्याची हमी देऊन एकदा चान्स द्यावा असे त्याचे म्हणणे होते .

नात्याला ही कमीटमेंट पूर्ण करण्यासाठी दोघांनीही आपल्या कामाच्या वेळातून 15 मिनिट सकाळी व 15 मिनिट संध्याकाळी या नात्याला वेळ देण्याचे ठरवले.

   

 पण नेहमीप्रमाणेच त्याचा हा उत्साह एक ते दोन दिवसच टिकला. सकाळी आणि संध्याकाळी नियमाने त्यांच्या नात्यांसाठी त्यांनी भरपूर वेळ काढला पण कामाची जबाबदारी वाढली त्याचे लक्ष विचलित होऊ लागले आणि नाते नेहमीप्रमाणेच मागे पडून कामाला प्राधान्य देणे सुरू झाले पण तिच्या ठिकाणी ती ठाम होती .कितीही काही झाले तरी आपण कधी कमीटमेंट मोडायची नाही म्हणून ती प्रयत्नपूर्वक दिवसाची सुरुवात गुड मॉर्निंग आणि शेवट गुड नाईट ने करू लागली. कोणतीही अपेक्षा न ठेवता आपण  नातं जपायचं हे तिने ठरवलं होतं आणि त्या दृष्टीने तिचे प्रयत्न चालू होते .

       पण आपण एखादी गोष्ट कोणावर लादत तर नाही ना ह्या शंकेने ती विचलित होऊ लागली आणि आपण कुठे चुकतो तर नाही ना? यावर विचार करू लागली.

तो मात्र कामाच्या गर्दीत परत एकदा हरवून गेला ठरवलेले पंधरा मिनिटे तो नाते टिकवण्यासाठी देऊ शकत नव्हता परत एकदा त्याची मॅच्युरिटी कमी पडून गेली पण तिला मात्र कमीत कमी एवढ्या लवकर तरी या नात्याला फोल होऊ द्यायचे नव्हते म्हणून ती थोडाफार प्रयत्न करत होती.

पण त्यांचा कमिटमेंट चा कालावधी दहा दिवसाचा होता तो मात्र अस्मरणीय होता . तो कालावधी हुरहुर वाटणारा तरीही गोड असा होता. 👌👌👌

      तो त्याच्या कमिटमेंट मध्ये कमी पडू नये म्हणून ती प्रयत्न करत होती.कारण एकाने दुसऱ्याला कमी पडू द्यायचे नव्हते.

पण तो नात तर दूर मैत्री सुद्धा विसरल्या सारख दाखवत होता. त्यामुळे ती अस्वस्थ होती. कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाणे इतकी ती मॅच्युअर नक्कीच होती ,तरीही या मागचे कारण काय? ही गोष्ट तिला अस्वस्थ करत होती नात्याचा कालावधी एवढा कमी असावा हे तिला मान्य नव्हतं आणि असला तरी तिच्याकडून तिला हे होऊ द्यायचे नव्हते.

        त्यामुळे एका रविवारी ती दिवसभर प्रयत्न करीन राहिली. काहीतरी संवाद व्हावा, शंका बोलून दूर कराव्या पण प्रयत्न करूनही तिला रिस्पॉन्स मिळाला नाही .

याच विचारांमध्ये असताना तिच्या वाचनात आले की "जेव्हा पुरुषांना जास्त काम असते, तेव्हा ते नात्याना ,भावनांना योग्य न्याय देऊ शकत नाही पण

स्त्री मात्र नाती व्यवस्थित नसतील तर काम चांगले करू शकत नाही .

वाचलेल्या या ओळीवर तीने खूप खूप विचार केला आणि हे जर सत्य असेल तर तिला त्यालाही कमी पडू द्यायचे नव्हते व स्वतःही कमी पडायचे नव्हते म्हणून तिने ठरवले आपल्या या सुंदर आणि निस्वार्थी नात्याला पूर्णविराम द्यायचा.

पण त्याआधी त्याला त्याच्या कमिटमेंटची आठवण करून द्यायची होती. कमेंटमेंट न पाळण्याचे कारणही शोधायचे होते आणि हो कमिटमेंटच्या सुंदर कालावधीतील आठवणी सुद्धा लॉक करून ठेवायच्या होत्या.

तसेच त्याला थँक्स म्हनायचे होते एवढ्या छान

कथेबद्दल.


Rate this content
Log in

Similar marathi story from Fantasy