ग्रीक दंतकथा 2
ग्रीक दंतकथा 2


फ्रिजियाचा राजा माईडस हा आसपासच्या दुबळ्या राजांना अतोनात सतावत असे. इतर राज्यांचे खजिने रिकामे करून त्याने सर्व सत्ता आपल्या हातात घेतली होती.
राजांनी कंटाळून माईडच्या जाचातून सुटण्याकरता देवाचा धावा सुरू केला. देव अपोलो ला आपले रक्षण करण्याची विनंती केली. अपोलोने राजांना आश्वासन दिले की, तो लवकरच त्यांचा अन्याय दूर करील.
अपोलो हा संगीताचा देव होता. त्याने संगीताची जादू माईडस वर केली. माईडस ला संगीताची गोडी तर लागली पण धनाची आशा मात्र कमी होत नव्हती देवाने सांगितलेले तत्वज्ञान तो एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून द्यायचा.
माइडस ऐकत नाही हे पाहून देव अपोलोने त्याचे कान काढून त्याजागी गाढवाचे कान लावले. राजाला स्वतःची लाज वाटू लागली. कितीतरी दिवस तो महालाबाहेरच पडला नाही. लपून तरी किती दिवस राहणार म्हणून त्याने एक लांब टोपीत आपले कान झाकून घेतले,
राजाने ही गोष्ट इतरांपासून जरी लपविली तरी न्हावी त्याला अपवाद ठरला.त्याच्या समोर तरी राजाला टोपी काढणे भाग होते.अशाप्रकारे राज्याचे गुपीत बाहेर पडणार होते म्हणून राजानं न्हाव्याला भरपूर बक्षीस देऊन त्याचे तोंड बंद केले. ही गोष्ट बाहेर पडली तर फाशीची शिक्षा ठेवण्यात आली.
न्हावी घरी आला पण मनावर एक दडपण घेवूनच.
राजमहालातल्या गोष्टी इतरांना तिखट मीठ लावून सांगण्याची खूप सवय होती, त्याचे तोंडाच बंद झाले. त्यामुळे तो बेचैन झाला. केव्हा तरी आपल्या तोंडून हे रहस्य बाहेर पडेल व आपले प्राण जाईल याची त्याला भीती वाटत होती.
कोणाजवळ तरी बोलल्याशिवाय त्याचे मन हलके होणार नव्हते.
अखेर न्हाव्याने युक्ती शोधली. खोल गड्डा खोदून त्या गड्डयाला राज्याची फजिती सांगितली व ते बुजवून टाकून हलक्या मनानं न्हावी घरी परतला.
एवढी सावधगिरी बाळगूनही ही गोष्ट जनतेला समजली. सर्वत्र कुजबुज सुरू झाली. राजाला हे समजताच त्याला न्हाव्याचा राग आला. त्याने न्हाव्याला बोलावून फाशीची शिक्षा देण्याचा हुकूम दिला. न्हावी लटलट कापत होता. तो राजाच्या पाया पडून जीवदान मागू लागला. पूर्ण चौकशी करून राजाने शिक्षा दयावी असे म्हणू लागला.
राजाला न्हाव्याच्या डोळ्यात सत्यता दिसत होती. अपराधी कोण याबद्दल तपासणी सुरू झाली. न्हावी राजाकडून कोठे गेला होता या बद्दल तपास काढण्यात आला तेव्हा न्हाव्याने ते गड्डे सुध्दा दाखविले ज्या ठिकाणी त्याने गुपित सांगितले होते. त्या गड्डयातून आता एक बोराचं
झाड वाढले होते राजाच्या असे लक्षात आलं की बोराचे झाड हवेने हलायचे, व त्या हवेच्या झुळके सोबत राजाचे गुपित सर्वत्र पसरत होते.
राजाला न्हाव्याच्या निर्दोष पणाबद्दल खात्री पटली व त्याने त्याला सोडून दिले. ते बोराचं झाड ही मुळासकट काढून टाकले.
तात्पर्य-- राजाची कोणताही गोष्ट जनतेपासून लपत नाही.