Meena Mahindrakar

Romance Tragedy Others

4  

Meena Mahindrakar

Romance Tragedy Others

ग्रीक दंतकथा

ग्रीक दंतकथा

2 mins
24.4K


अधीर कवी


ग्रीक दंतकथेत ऑफयूस एक महान कवी होऊन गेला. काव्य आणि संगीतालाच त्याने आपले जीवन अर्पीले होते. त्याच्या काव्याने अनेक रसिकांवर मोहिनी टाकली होती. तर संगीताने तो श्रोत्यांना मंत्रमुग्ध करून टाकीत असे. आपल्या कलेने ऑफयूसने मोठी लोकप्रियता मिळवली होती, खूप श्रोतावर्ग जमविला होता. यूरेडीसी ही त्याच्या श्रोत्यांन पैकी एक. ती त्याच्या प्रत्येक कार्यक्रमाला हजर असायची. त्याचे साहित्य मन लावून वाचायची. ऑफयूस सोबत त्याबद्दल चर्चा करायची. त्याच्या त्रुटी असल्यास स्पष्ट सांगायची. निर्भीड आणि रसिक युरीडीसी ऑफयूसला खूप आवडू लागली आणि त्याने तिला सहचारिणी होण्याची इच्छा प्रदर्शित केली. कुठेलेही आढेवेढे न घेता ती तयार झाली. तिचे ऑफयूस व त्याचे साहित्य या दोन्हीवरही प्रेम होते. त्यांचे वैवाहिक जीवन खूप सुखी होते. ऑफयूस आपल्या क्षेत्रात खूप प्रगती करीत होता. यूरीडीसीसारख्या रसिक पत्नीची साथ मिळाल्यापासून तर त्यात अधिक रंग भरला होता. ती त्याला सर्वार्थाने परिपूर्ण होती, आणि म्हणूनच ऑफयूसचे तिच्यावर खूप प्रेम होते.

‌     

एक दिवस निसर्ग सान्निध्यात जाऊन काव्यलेखन करावे, या उद्देशाने ऑफयूस एका सुंदर वनात गेला. त्याच्यासोबत युरिडीसी होती. त्या हिरव्यागार वनात लवकरच ते दोघेही मिसळून गेले. ऑफयूसच्या काव्याला तर बहर आला. निसर्गाचं जिवंत चित्र तो आपल्या काव्यात गुंफत होता. युरीडीसी त्याच्याकरिता निरनिराळी फळे आणून द्यायची. अशीच युरिडीसी एकदा फळे आणण्यासाठी गेली असता परत आलीच नाही. ऑफयूस घाबरला तिला शोधू लागला. झाडे, वेली, पशु, पक्षी यांना वेडापिसा होऊन विचारू लागला. 

‌एका ठिकाणी युरिडीसी निपचीत पडलेली त्याला आढळली. तिचे शरीर हिरवे निळे पडले होते. तिचा स्पर्श दंशाने मृत्यू झाला होता. ऑफयूसवर आभाळ कोसळले. यूरेडीसीशिवाय त्याच्या जीवनाला काहीच अर्थ नव्हता. ती त्याची एक शक्ती होती, प्रेरणा होती अगतिक होऊन ऑफयूसने यमाला, एक तर माझा प्राण घे, नाहीतर युरिडीसीला परत पाठव, अशी कळवळून विनंती केली. ऑफयूसचे प्रेम पाहून यम भारावून गेला. त्याने तिला परत पाठवण्याची परवानगी दिली. पण त्याचबरोबर एक अट घातली, ती अशी की मृत्यूलोक येईपर्यंत ऑफयूसने मागे वळून पाहायचे नाही. ऑफयूसने मागे न पाहता चालण्यास सुरुवात केली. त्याचे मन युरिडीसीला पाहण्यासाठी बेचैन झाले होते. यमाने आपल्याला धोका तर दिला नसेल? ती आपल्या मागे येत असेल ना? अशा अनेक शंका होत्या. न राहवून त्याने मागे वळून पाहिले खरोखर युरिडीसी त्याच्यामागे येत होती. पण त्याने यमाची अट मोडली, म्हणून यमाने तिला परत नेले. आपल्या अधीरतेने ऑफयूस युरीडीसीला कायमचा गमावून बसला.


 तात्पर्य -१) मनावर नियंत्रण ठेवा 

‌२) अधीरता हाती आलेले यश गमावून बसते.


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance