STORYMIRROR

Anil Rathod

Inspirational

3  

Anil Rathod

Inspirational

नातं महत्वाचं.....!

नातं महत्वाचं.....!

1 min
437

एकमेकांना जपणं, एकमेकांची काळजी घेणं, यातच नात्याचं खरं गमक आहे. होतात कधी-कधी चुका, हवं तर रागवावं तर कधी बिघडावं... पण आपले स्नेहबंध कायम राहतील याचंही भान असावं. नात्यांची ही एक सीमा ओळखता आली ना की नातं आपोआपच बहरतं.... पण त्यासाठी आपल्या व्यक्तीला समजून घेणंही तेवढंच महत्वाचं असतं.

नातं जपताना, जगताना कधी - कधी या गोष्टी माहित असूनही आपला इगो अनाहूतपणे नात्यात शिरतो अन् नात्यामध्ये दुरावा निर्माण होतो तर कधी नातं तुटण्याच्या स्थितीला येऊन टेकते.

अशावेळी काय करावं काहीच समजत नाही... कारण ती वेळ वाईट असते, ती परिस्थिती नाजूक वळणावरून जात असते अन् याच वळणावर जो स्वतःचा इगो सारून एक पाऊल मागे जातो ना..... त्याला साथ द्या... तेव्हा नातं पूर्ववत होऊन आपुलकी वाढते, प्रेम वाढतो.

तेव्हा थोडं विचार करायला काय हरकत आहे... कारण... नातं महत्वाचं असतं...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi story from Inspirational