STORYMIRROR

Anil Rathod

Others

2  

Anil Rathod

Others

समाजमाध्यम

समाजमाध्यम

2 mins
179

सामान्यपणे समाजमाध्यमावर रोज शुभसकाळ पासून संदेशाची सुरवात होते, संदेश पाठविणारे आपले मित्र, भाऊ, गावातील स्नेही, काही प्रतिष्ठीत लोकं अन नातेवाईक असतात... आपापल्या परिने ज्यांना जसा वेळ मिळेल तसे संदेश पाठविण्याचा प्रयत्न करत असतात.

 कुणी वाचुन प्रतिक्रिया देतात तर कुणी फक्त चांगलं सार घेतात तर कुणी वाचून दुर्लक्ष करतात....एव्हढेच नाही तर कुणी कधीच नि काहीच वाचत नाही,तर कुणी वाचून पूर्वग्रह दूषित करून घेतात अन संदेशाची हेटाळणी करतात आणि पाठविणाऱ्याला मुर्खात काढतात, रिकामटेकडे समजतात...

त्यांना एकच सांगावसं वाटते की खरंच समाजमाध्यम ही रिकामटेकड्या लोकांचं प्लॅटफॉर्म असतं का हो ? आता ही सर्व लोकं बिनकामाची असतात का?अन संदेश वाचणारे परंतु कधीच प्रतिक्रिया व्यक्त न करणारे खूप शहाणे असतात, असं होतं का?... तुम्हाला काय वाटतं?...जर कदाचित तसं असतं तर आज पत्रकारिता, न्यूज चॅनेल यांना काहीच अर्थ उरला नसता, माध्यमें ही लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे तों कदाचित राहिला नसता. यामध्ये खरी गल्लत होते ती म्हणजे यांचे महत्व समजून न घेता आंधळेपणाने सरळ विरोध करणे.

संदेश पाठविणारे ना खूप शहाणे असतात ना रिकामटेकडे.

संदेश पाठविण्यामागे काही उद्देश असतात. जसे की आजच्या धकाधकीच्या जीवनात सर्व लोकं आपापल्या कामात व्यस्त असतात, सर्वाना प्रत्यक्ष भेटून,कधी भ्रमणध्वनी वरून,काय चाललंय,काय नाही,विचारणं शक्य नसतं, त्यामुळे काही आपली माणसं दुरावू नयेत, आपले कायम राहावे, एकमेकांच्या अडीअडचणी एकमेकांना सांगता याव्या, आपल्या सुखं दुःखाचे काही क्षण एकमेकांसोबत शेअर करता यावे, मनातील दुःख, निराशा, कामाचा थकवा दूर सारून पुन्हा नवसंजीवनी मिळावी, जेणेकरून जीवनाचा एकूणच कष्टमय प्रवास सोईस्कर, सोपं व्हावे नि आपणास पुन्हा नव्याने जीवनाला सुरवात करून जगता यावं....हा त्यामागील मुख्य अन चांगला उद्देश असतो....


Rate this content
Log in