STORYMIRROR

Anil Rathod

Others

2  

Anil Rathod

Others

अहंकाराचा वारा...!

अहंकाराचा वारा...!

1 min
141

समाजात अशी भरपूर लोकं पाहायला मिळतात. जेव्हा माणसा जवळ सुबत्ता असते किंवा एखादं प्रतिष्टेचं पद असतो, अगदी सामान्य भाषेत समजेल अन साध्या शब्दांत सांगायचं झालं, तर जेव्हा माणसाची चालती असते, तेव्हा त्या माणसाला अहंकार येतो... या अहंकाराचं वारं जर कां डोक्यात भिनलं ,तर त्याला आपली नि परकी माणसं ओळखता येत नाही...नासक्या,चंचल पैशाचा गर्व बोलू लागतं अन हा अहंकार दिवसेंदिवस वाढत जातं .... अगदी सावकाराकडून घेतलेल्या ऋणाच्या व्याजासारखं... आणि  हाच अहंकार जेव्हा परमोच्च शिखर गाठतो ना... तेव्हा त्या व्यक्तीला इतकं खाली पाडतो की

त्या माणसाला कुत्रीदेखील विचारत नाही..

मेलाय की जिवंत आहे....

अशी अवस्था ही त्या माणसाच्या उतारवयात येते, जेव्हा तें पद राहत नाही की जीव लावणारी कुणी माणसं.... ज्यांना आपलं म्हणता येईल अशी कुणी व्यक्ती....

जेव्हा ही बाब समजते, कळते आणि लक्ष्यात येते,तेव्हा खरंतर खूप उशीर झालेला असतो.....


म्हणून एकच प्रार्थना त्या जगदीश्वरापायी करावीशी वाटते की...

"अहंकाराचा वारा ! न लागो राजसा !

माझ्या विष्णुदासा ! भाविकांशी !!"


Rate this content
Log in