STORYMIRROR

Vilas Yadavrao kaklij

Tragedy Inspirational

2  

Vilas Yadavrao kaklij

Tragedy Inspirational

नाना

नाना

3 mins
107

माझे वडिल माझे आयडॉल अर्थात "नाना "सकाळी ६वा डबा घेवून सायकलवर रोज ३० कि .मी. शाळेत जात मी गावात सातवी नतंर शाळा नसल्याने आजोळी मामाकडे शाळेत होतो तिथे जाणेसाठी मला गावापासून ५ किमी चौफुली वर शाळेत जातांना सोडत वारा व रस्ता चढ असल्याने घामाघुम होवून मला रस्तात सोडत STगाडी येई पर्यतं थांबत व शाळेत जात ते प्राथमिक शिक्षक होते व तू खूप शिकाव अशी अपेक्षा होती एखादे शनिवारी मी आलो नाही तर ते स्वतःसायकलने मला भेटण्यास .१२ कि मी येत असे व जातांना खाऊ साठी पैसे देत त्यांचा सहवास व सायकलने येणे आजही माझे डोळयासमोरून जात नाही दुदैवाने आज त्यांचा सहवास नसल्याने आजही एकटे वाटते त्यांचे इच्छा पूर्ण करून मी पदवीधर झालो त्यांचेच ओळखीचे शाळेत मला शिक्षक म्हणून नोकरी मिळाली खेडयात विना पगारी ( नॉन ग्रॅड) शाळेत मग खरा सहवास व स्पर्धा सुरू झाली स्वतः त्यांनी जो संघर्ष पाऊस पाणी ' वादळ याची पर्वा न करता शाळेत वेळेत जाणे शाळेत ओली कपडे सुकवावीत व शिकवावे रस्तात सायकल पंचर झाली तर एका पिशवीत पंचरचे सामान व एक हातपंप तिथेच काम सुरू पाण्याऐवजी माती टाकून ट्यू व चेक करणे व पंचर काढणे चैनमध्ये पॅन्ट अडकू नये यासाठी दोन लों खडी किलप ' असे येतांना मलाही सायकलवर डबल सिट रोड कच्चा दगड गोटे असा त्या गावात दिवसातून एक लाल डबा येत ना फोन ' ना दवाखाना पाणी शेजारी एक हंडा भरून घेत व मूलांना शिकवित आजही त्यांचे विधार्थी नाव काढतात असे प्रामाणिक गुरू कधीही भेटणार नाही घरी ५वा आले कि परत शेतात जात रात्री जेवण करून शेतात राखण बैलगायी 'बकऱ्या असे सकाळी पहाटे उठुन Iपिकाला पाणी देणे (बारे देणे) दिवस उगवला कि पाणी भरून सगळ्या जनावiराचे शैण भरणे झाडलोट करणे त्यांना चारा पाणी करून घरि आंघोळ करणे चहा घेणे व डबा घेवून परत तेच चक्र असे कष्टकरी नानांचा सायकलवर परत शाळेत जाणे


पूर्वी विद्यार्थी असतांना व आज शिक्षक असतांना तेच जिवन सायकल सहवास मला लाभला कधीही न विसरणारा प्रवास अगदी त्यांनी रिटायरमेंन्ट पर्यत चालु होता मला मात्र नंतर दुसऱ्या शाळेत स्वतःच्या गावात परत विना पगारी ६ वर्ष शिक्षक म्हणून नोकरी केली नंतर पगार सुरू झाला तो १२५०रू पाहिला पगार मात्र वडिलांचा सायकल प्रवास व सहवास आज जग प्रवास करूनही ते सुख ते प्रेम ती माया मिळू शकत नाही त्यांच्या सहवासात मिळालेली शिक्षण मूल्य प्रत्यक्ष कुठल्याही विद्यापिठात मिळणार नाही आज फोर व्हीलर वर जातांनाही तो आनंद घेवू शकत नाही दुरदैवाने आज माझे नाना हयात नाही पण त्यांचा सहवास आजही माझ्या बरोबर आहेत असे वाटते आयुष्यात ना कधी रागावले वा रुसले सारे काही आमचे साठी जगले स्वतःसाठी कधीही वेळ दिला नाही असे माझे वडिल अर्थात . "नाना " त्यांचे नावातच ना- ना कोणत्याही गोष्टीला नाही म्हणने त्यांचे तत्वात बसत नव्हते असे माझे आयडॉल माझे पिता अर्थात सर्व काही तेच होते त्यांचे नकळत कष्टाचे बिज अंगी रोवले गेले व आज मी जे जीवन जगतो आहे त्यांचे कष्ट व सहवास हेच माझी आयुष्याची शिदोरी मला शेवटच्या क्षणापर्यंत पुरेल असे माझे वडिल " नाना " यांना शतशा प्रणाम करून शब्द रूपी संवाद थांबवतो जय हिंद जय नाना ...


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy