STORYMIRROR

Madhuri Sharma

Tragedy Children

3  

Madhuri Sharma

Tragedy Children

मुर्ख कासव

मुर्ख कासव

1 min
232

        एके काळी. एक कासव आणि दोन हंस खूप चांगले मित्र होते. एका वर्षीं अजिबात पाऊस पडला नाही आणि ज्या तलावात ते राहत होते ते तलाव कोरडे पडले. कासवाने एक योजना आखली आणि हंसांना सांगितले, एक काठी आणा , मी ती दातांनी मध्येच दाबून टाकीन आणि तुम्ही लोक ते तुमच्या चोचीत दाबून उडून चला आणि मग आपण तिघेही दुसऱ्या तलावात जाऊ.

हंसानी मान्य केले, आणि त्यांनी कासवाला ताकीद दिली, की तुला पूर्ण वेळ तोंड बंद ठेवावे लागेल. नाहीतर तू थेट पृथ्वीवर पडशील आणि मरशील. 

कासवाने लगेच होकार दिला. सर्व काही तयार झाल्यावर, हंस कासवाला घेऊन उडून गेले. वाटेत काही लोकांना हंस आणि कासव दिसले. ते उत्साहाने ओरडू लागले, हे हंस किती हुशार आहेत. ते कासवालाही सोबत घेऊन जात आहे. कासव राहू शकले नाही. हा विचार त्याच्या मनात आला होता हे त्याला त्या लोकांना सांगायचे होते.

तो बोलला पण त्याने तोंड उघडताच काठी त्याच्या तोंडातून निघून गेली आणि तो सरळ जमिनीवर पडला.


त्याने आपल्या अहंकारावर आणि बोलण्यावर नियंत्रण ठेवले असते तर तोही सुखरूपपणे नवीन तलावापर्यंत पोहोचला असता.


म्हणून गरज नसेल तर न बोललेले बरे.......


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy