Participate in the 3rd Season of STORYMIRROR SCHOOLS WRITING COMPETITION - the BIGGEST Writing Competition in India for School Students & Teachers and win a 2N/3D holiday trip from Club Mahindra
Participate in the 3rd Season of STORYMIRROR SCHOOLS WRITING COMPETITION - the BIGGEST Writing Competition in India for School Students & Teachers and win a 2N/3D holiday trip from Club Mahindra

kanchan chabukswar

Tragedy


4.0  

kanchan chabukswar

Tragedy


मृगजळ

मृगजळ

6 mins 189 6 mins 189

घरच्यांशी भांडून आणि विरोध पत्करून शेवटी बेनझीर कराची शहरात येऊन धडकली. इंग्रजीमध्ये मास्टर्स केल्यावर तिला कॉलेजमध्ये नोकरी करायची होती. घरच्यांचा म्हणणं होतं की आत्याच्या मुलाबरोबर लग्न करून ती त्याच गावात राहील, आत्याचा मुलगा बारावी पास होता, घरचा बिजनेस असल्यामुळे त्याला पुढे शिकायची काही गरज नव्हती, इच्छा पण नव्हती.


बेनजीरला लहानपणी या सगळ्याची फार मजा वाटायची, त्याच्या घरी आत्याच्या घरी कायमच जाणं येण असे, घर काही परक नव्हतं, पण त्याच त्याच वातावरणात राहायची आता सक्ती वाटू लागली. प्रसिद्ध अशा जिल्हा कॉलेजमध्ये बेनझीरना नोकरी पण मिळाली, कॉलेज कॉलेजमध्येच असणारं लेडीज हॉस्टेल मध्ये बेनझीर न राहायचं ठरवलं.


गावच्या पद्धतीप्रमाणे डोक्यावरून , पूर्ण झाकलेले कपडे, असेच घालून ती कॉलेजमध्ये जाऊ लागली. तिचं तिला बरं वाटत होतं.

कॉलेजमध्ये स्टाफ रूम मध्ये तिच्याकडे बघून बाकीच्या प्रोफेसर आश्चर्य व्यक्त करत, कारण त्या फारच मॉडर्न होत्या. व्यवस्थित साडी स्लीवलेस ब्लाउज, व्यवस्थित कापलेले केस, फॅशनेबल सॅंडल, चमचमणाऱ्या पर्स, आणि सगळ्याजणी आपापल्या गाड्या घेऊन येत. त्यामानाने बेनझीर अगदीच साधी आणि गरीब होते. दिसायला गोरी सुंदर, लांब कुरळे केस असलेली बेनजीर गावच्या सशक्त वातावरणामुळे खुलून उठत होती.

आता स्टाफरूममध्ये बेनझीर ला मॉडर्न बनवायची कल्पना आली. त्याप्रमाणे तिच्या मैत्रिणींनी तिला, व्हाट्सअप, इंस्टाग्राम, मेल, आणि अशा बऱ्याच गोष्टी शिकवल्या. शिवाय आपल्या बरोबर त्या तिला ब्युटी पार्लर मध्ये पण घेऊन जाऊ लागल्या.


बेनझीरने येताना स्वतःची शिवण यंत्र आणले होते, स्वतःचे कपडे स्वतः शिवत. बाकीच्यांचे बघून तिने पण मॉडेल स्टाईलचे कपडे शिवायला सुरुवात केली आणि घालायला पण सुरुवात केली. अभ्यासू वृत्ती, शिकवण्याचे कसब याने बेनझीर कॉलेजमध्ये लोकप्रिय झाली. एक दिवशी मायरा ने तिला डेटिंग ॲप दिली. हळूच सांगितले तुझा जोडीदार निवड, कुठल्यातरी निर्बुद्ध, खेडूत, नवऱ्याबरोबर जन्म घालवण्यापेक्षा बघ कोणीतरी स्मार्ट मिळेल. सुरुवातीला बेनझीर घाबरली. पण जसा तिचा फोटो ॲप वरती चमकला तसा तिला फारच चांगला रिस्पॉन्स येऊ लागला. त्यातलेच एक राशिद, त्याच्याबरोबर तिच्या आवडी-निवडी जुळू लागल्या.


मायरा शादीशुदा असून देखील डेटिंग ॲप वर होती, जरा बिनधास्त असलेली मायरा, पार्टी, मित्र-मैत्रिणी, शॉपिंग, त्याच्यामध्ये बिनधास्तपणे पैसे खर्च करे. तिला 8 वर्षाचा गोड मुलगा पण होता. पण कॉलेजनंतर परस्पर सिनेमा किंवा पार्टीला जायला तिला काहीच वाटायचं नाही. तिच्या मुलाकडे बघायला तिने एक मोलकरीण लावली होती. नवरा खुर्शीद -रुस्तुम मोठा बिझनेस मॅन होता, बऱ्याच वेळेला तो बिझनेसच्या कामासाठी घराबाहेर असे, हे पण कारण तिला पुरेसे होते.


सहा महिने उलटले, बेनझीर पण आता डेटिंग ॲप वरती बिनधास्तपणे नवीन मित्र जोडू लागली. अजून तरी तिला कोणाशी प्रत्यक्ष भेट झाली नव्हती. तेवढ्यात रमजानचा महिना चालू झाला, सगळीकडे उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण पसरले. ईदच्या दिवशी काय खरेदी करायची, किंवा कोणी काय घेणार याची चर्चा स्टाफरूममध्ये होऊ लागली. बेनजीर ला घरून फोन येऊ लागले, ईदच्या दिवशी तरी घरी ये म्हणून. कराची शहरातली चमकधमक, सजलेले बाजार, तिथे चाललेल्या संध्याकाळच्या पार्टी, रोज ऑफिसमधल्या कोणाकडेतरी संध्याकाळचं रोजा सोडण्याचं आमंत्रण येऊ लागलं. बेनझीरना फार मजा वाटू लागली. आपल्या कलीग च्या आलिशान कोठ्या त्यांच्या घरातील उंची फर्निचर बघून तिला पण भविष्य तसेच असावे अशी प्रबळ इच्छा निर्माण झाली.


राशिद एका बिझनेसमनचा मुलगा असून सांपत्तिक स्थिती फारच उच्च दर्जाची होती. त्याच्या बऱ्याचश्या फोटोमध्ये त्याच्या श्रीमंत महागड्या गाड्या त्याचे कपडे त्याच्या हातातलं महागड रिस्ट वॉच या सगळ्याची हळूहळू बेनझीरना भुरळ पडू लागली. शेवटी एक दिवशी राशिद ने तिला त्याच्यासोबत रोजा सोडण्यासाठी बोलवले. बेनजीर ला वाटले, कदाचित राशीद च्या घरी तिला आमंत्रण असेल, किंवा त्याचे मित्र-मैत्रिणी, यांच्यासोबत आपल्याला आज डिनर करता येणार. आज मायरा पण एका पार्टीला जाणार होती, त्यामुळे बेनजीर एकटीच राशीदच्या भेटीला निघाली.


हॉटेलमध्ये बराच वेळ वाट बघितल्यावरती मागून आवाज आला," बेनजीर" तिने अपेक्षांनी वळून बघितले तर एक चाळीशीचा माणूस तिच्या दिशेने येत होता. त्यांनी स्वतःची ओळख राशीदच अशी करून दिली. बेनजीर ला धक्का बसला, कारण फोटो पेक्षा राशिद बराच मोठा दिसत होता. तिचा पडलेल्या चेहरा बघून राशिद म्हणाला," मी आधीपासून असाच दिसतो, माझं वय फक्त 28 आहे, कामाचा ताण, कंपनीची जबाबदारी त्याच्यामुळे मी असा दिसतो. पण मी तुला खूप सुखात ठेवेल." बोलता-बोलता राशिद न चा हात पकडला. आपला हात सोडवून घेऊन बोलायचा प्रयत्न केला, कसेतरी जेवण आटोपून ती परत हॉस्टेल वरती आली.


दुसऱ्या दिवशी बेनझीर आणि मायरा शॉपिंग ला गेल्या, आपल्या मनात चाललेले वादळ बेनजीर ने मायरा ला बोलून दाखवले. हसून मायरा म्हणाली ," अगं बरेच जण असेच करतात, एक बायको घरी असताना दुसऱ्या मुलीं बरोबर फ्लर्ट करतात. डेटिंग वरच्या सगळ्यांना दोन हात दूरच ठेवावे. मजा करावी खावे प्यावे घरी यावे. सांभाळून राहा. नीट चौकशी कर."


दोघींना पण ईदनिमित्त शॉपिंग करायचे होते. मायराने आपल्या नवऱ्या साठी एक सुंदर बेल्ट, आणि बरेचसे सामान, विकत घेतले. तिने बेनजीर ला एक वॉलेट सिलेक्ट करायला सांगितले. त्याप्रमाणे बेनझीर ने एक महागडे वॉलेट सिलेक्ट करून दाखवले आणि त्याच्या वरती मायरा च्या नवऱ्याचे नाव पण टाकून घेतले. आपल्या आईवडिलांसाठी बहिणीसाठी देखील बेनजीर न खरेदी केली कारण ईद साजरी करण्यासाठी साठी तिला घरी जायचे होते.


गावी पोचल्यावरती सगळ्या कुटुंबाला बेनजीर परत आल्याचा फार आनंद झाला. आत्याने पण तिला दोन तीन वेळेला घरी बोलावले. बेनजीर च्या डोळ्यावरती घराची शहरामधली चमकधमक असून आता तिला गाव नकोसं वाटू लागलं होतं. आत्याचा सरळ मुलगा आता तिला गावंढळ वाटू लागला होता. ह्या वेळेला बेनजीर त्याच्याशी फारच उर्मटपणे वागली. मनातल्या मनात ती असे ठरवत होती की वयाने जास्त जरी असला तरी श्रीमंत नवरा बघायचा आणि आरामात पुढची जिंदगी जगायची. गावाकडील रटाळ आयुष्य, पडद्या मधल्या स्त्रिया, चूल आणि मूल, नको होतं.


आत्या जरा नाराज झाली. तिने बोलून दाखवलं नाही पण तिने बाकीच्या मुलींकडे रिश्ता पाठवायला सुरुवात केली. परत आल्यानंतर राशीद बरोबर भेट घेऊन बेनजीर ने पुढचे प्लान्स काय करायचे हे ठरवले. राशीद च्या बोलण्यातून त्याला अतिशय आनंद झाला असे दिसत होते, तो त्यांच्यासाठी वेगळा फ्लॅट घ्यायचा पण ठरवत होता, त्याप्रमाणे त्याने बेनझीरना 1,2 जागा देखील दाखवल्या, सणा निमित्त भेटवस्तू म्हणून राशीद न बेनझीर ला उंची ड्रेस, अत्तरे आणि असेच बरेच सामान दिले. बेनजीर खुश होती.


आता जवळ जवळ त्यांचे सगळेच ठरले होते. आपले लग्न जुळले याची गोड बातमी बेनझीर ने घरी दिली, आई-वडिलांच्या मत राशिद ने स्वतःहून तिला मागणी घालायला पाहिजे होती, त्याच्या आई-वडिलांनी रिश्ता पाठवायला पाहिजे होता. पण बिझनेस काम सांगून किंवा अतिशय बिझी असल्याचं निमित्त करून राशिद ने गावी जाण्याचे टाळले. त्याच्या उलट त्यानेच बेनजीर च्या नातेवाईकांना कराचीमध्ये बोलावले आणि त्यांचा सगळा इंतजाम करण्यासाठी त्याने एक फ्लॅट बेनजीर ला दाखवला. फर्निचर ने सुसज्ज असलेला फ्लॅट बघून बेनजीर खुश झाली तिने आई वडीलांना सांगितले की तुम्ही सगळे इकडे या आणि राशीदला भेटा.


खेडवळ सरळ लोक, कोणाला कुठला संशय आला नव्हता, हा हा म्हणता गावामध्ये बेनजीर च्या लग्न ठरल्याची बातमी पसरली. तिने अतिशय आनंदाने मायराला ही गोष्ट सांगितले. मायरा ने आनंद व्यक्त केलं पण ती बेनजीर ला सांभाळून राहा असा उपदेश करत राहिली. महागड्या गाड्यातून फिरणे, हॉटेलमध्ये जाणे, बेनझीरना सगळ्यांचीच अपूर्वाई वाटत होती. राशिद मात्र त्याचा कुठलाच फोटो बेनजीर ला देत नव्हता. ना तो सेल्फी काढू देत होता. त्यांची नाराजी बघून बेनजीर ने पण जास्त आग्रह केला नाही.


एक दिवशी हॉटेलचे बिल देताना त्याच्या खिशातून वॉलेट पडले, खाली वाकून बॅनजीर् ने ते उचलले तर त्याच्यावरती नाव होतं "खुर्शीद-रुस्तुम " अरेच्या, हे तर आपण मायरा च्या नवऱ्यासाठी घेतलेलं वॉलेट आहे. वॉलेट उघडून बघितलं तर आत मध्ये मायरा आणि तिच्या लहान मुलाचा गोड फोटो होता.


बेनजीरच्या डोळ्यात झरझर झर झर पाणी आले, केवढी ही फसवणूक, एक बायको जिवंत असताना, गोड मुलगा असताना, हा माणूस दुसऱ्या कोवळ्या मुली बरोबर लग्न करायला निघालेला? बेनजीर चा चेहरा बघून राशीद च्या लक्षात आले, काहीतरी गडबड आहे. तिला काही सांगण्याच्या आत बेनजीर तिथून तडक निघून गेली.


आई-वडिलांचा केलेला अपमान, आत्याची केलेली मानहानी, खेडवळ म्हणून नाकारलेला नियोजित वर, कुठे मृगजळाच्या पाठी मागे धावत होती बेनझीर? आता ना पुढे जाता येत होतं ना मागे वळता येत होतं.


Rate this content
Log in

More marathi story from kanchan chabukswar

Similar marathi story from Tragedy