मिले सूर मेरा तुम्हारा ४
मिले सूर मेरा तुम्हारा ४
“डॉक्टर काही सीरियस नाही ना?”, निनाद ने विचारले.
“आम्ही test केल्यात. त्यांचा bp लो झालेला. आता तो नॉर्मल आहे आणि त्यांचे हिमोग्लोबीन पण खुपंच कमी झालेय. बेशुद्ध आहेत. येतील शुद्धीवर. पण तरी काही तास observation मध्ये ठेवावं लागेल.”,डॉक्टर म्हणाले.
डॉक्टर च्या केबिन मधून बाहेर येत निनाद म्हणाला, “ आई आणि निशाला घरी पाठवायला हवं. तू जा त्यांच्यासोबत. मी थांबतो इथे.”
“पण मी.. मी कशी जाऊ?”
“हे बघ आत्ता आई आणि निशाला तुझी जास्त गरज आहे. मी आहे इकडे. नको काळजी करु. काही वाटलं तर मी फोन करेन.त्यांनी काही खाल्लं नाहीये. तूही खाऊन घे.”
“आणि तू ?”
“मी खाईन इकडे काहितरी.”
वृंदाचं घर तिकडून १० मिनटांवर होतं. तिने आई आणि निशाला घरी नेण्याचं ठरवलं. त्यानंतर निनाद रात्रभर हॉस्पिटलच्या बाकावर बसुन राहीला. Medicine, injection यांपैकी जे लागेल ते नर्सला आणून देत होता. त्याने canteen मधून चहा बिस्किट खाल्ले. आणि तिथेच बाकावर आडवा झाला.
इकडे वृंदाने दोघींना कसंबसं खाऊ घालून झोपवलं. तिचाही डोळ्याला डोळा लागत नव्हता. पहाटे तिचा फोन वाजला. तिने जरा घाबरुनंच फोन घेतला.
“Hello वृंदा….”
“हा बोल निनाद, काय झालं? कसं वाटतंय बाबांना?”
“ते ठिक आहेत. आणि शुद्धीवर आलेत. नर्स म्हणाली की सकाळी ९ पर्यंत तुम्ही त्यांना हलका नाष्टा देऊ शकता. आता आराम करु दे.”
“तू भेटलास का त्यांना?”
“हो मी बोललो त्यांच्याशी. ठिक आहेत ते आता. तू ये ९ पर्यंत.”
“हो चालेल.”
वृंदा डबा घेऊन आली. नाश्ता झाला तसे तिचे बाबा तिला म्हणाले,”काळजी नको करु बेटा. मी लवकर बरा होऊन घरी येईन.”
निनाद तोपर्यंत घरी जाऊन फ्रेश होऊन आला. वृंदाचे बाबा हॉस्पिटलमधून घरी येइस्तोवर निनादने त्यांची एका मुलाप्रमाणे काळजी घेतली. निताबाई दुस-या दिवशी आल्या. त्यांनी आणि निनादच्या बाबांनी संदीपरावांनी काय हवं नको ते बघितलं. त्यांना जमेल तशी मदत केली.
बाबांना बरं वाटू लागलं तसं वृंदा आणि निनाद पुन्हा मुंबईला यायला निघाले. रात्री उशिरा ते घरी पोचले. दोघांनाही भूक नव्हती.
बराच वेळ झाला वृंदा काहिच न बोलता hall मध्ये खुर्चीत बसुन होती. निनाद ला समजत होतं. तो तिच्याजवळ गेला. तिला आधार वाटावा म्हणून तिच्या खांद्यावर हात ठेवला. त्या स्पर्शात तिला खुप आपलेपणा वाटला आणि डोळे भरुन आले. एखाद्या लहान मुलीप्रमाणे ती त्याच्या कमरेला मिठी मारुन रडू लागली.
“निनाद तुझे कसे आभार मानावे तेच नाही कळत आहे मला. बाबांना काही झाले असते तर…मला विचार पण नाही करवत आहे. खरंच खुप खुप thanks. अगदी मनापासून…”
“नाही वृंदा मी वेगळं असं काहीही केलेलं नाहिये. तेच केलेय जे एका जावयाने करायला हवं. आपल्यात जरी नवरा बायकोचे संबंध नसले तरी तुझ्या आई बाबांना मी माझे आई वडील मानतो. आणि म्हणूनंच केलेय मी सगळं.”
“Thank you so much…”
“पुन्हा thanks.. मैत्रीत no sorry no thanks. “
“अं..म्हणजे?”
“म्हणजे आपण चांगले मित्र तर होऊच शकतो ना?”
“खरंच निनाद? म्हणजे तू आता माझ्याशी अबोला नाही धरणार? माझ्यावर नाही रागावणार? तुझा माझ्यावरचा राग गेला ना? सांग ना..”
“अगं हो हो. थांब जरा. किती प्रश्न विचारतेस? श्वास तर घे. नाही धरणार अबोला. आणि रागाचं म्हणशील तर अजुनही आहे माझा तुझ्यावर राग..”
“का? काय झालं?काय करु मी म्हणजे तुझा राग जाईल?”,वृंदाने मुसमुसत विचारले.
“एक गोड छान smile दे. हास बघू…”
निनाद ने असं म्हणताच तिने छान smile दिली. मग दोघेही आपापल्या जागेवर जाऊन झोपले.
दोघांची मैत्री कलेकलेने फुलत होती. आणि त्यांच्या नकळत त्यांचे प्रेमदेखील. हसणं खिदळणं, चेष्टा मस्करी, आणि रुसवे फुगवे , मनवणे अशा गोष्टींनी आता त्यांच्या आयुष्यात जागा निर्माण केली होती. एकमेकांचा सहवास त्यांना हवाहवासा वाटत होता. पण प्रेमाची कबुली कोणीच देत नव्हतं. आणि म्हणतात ना प्रेमाची जाणीव व्हायला दुरावा महत्त्वाचा असतो. तसंच झालं.
बरेच दिवस झाल्याने वृंदाला माहेरपणाला बोलावणे आले. लवकरंच अक्षय त्रितिया येणार होती. एक मोठा सण. इतके दिवस जॉब आणि संसार यांमुळे तिला जायला ज
मलं नव्हतं. तिने १५ दिवसांची सुट्टी काढली आणि पुण्याला जायची तयारी करु लागली. निनाद तिच्यासाठी खुश होता. हवापालट झाल्यावर तिला बरंच वाटेल असं त्याला वाटलं. त्याने वृंदा ला सकाळच्या गाडीत बसवले आणि स्वत: ऑफिस ला गेला.
सुरवातीचे २ दिवस चांगले गेले. मग राहून राहून निनाद ला वृंदाची आठवण येऊ लागली. रिकामं घर त्याला खायला उठे. प्रत्येक लहान लहान गोष्टींमध्ये त्याला वृंदाच आठवे. जसं की तिचा प्रत्येक स्पर्श या वस्तूंना झाला असेल. फोन करुन बोलायला जावं तर तसं आधी बोलले नसल्यामुळे त्याने पुढाकार घेतला नाही. पण करमत नव्हतं इतकं तर नक्की.
वृंदाची हालत पण काही वेगळी नव्हती. तिला परत जायची ओढ लागली होती. सण आला आणि छान आंब्याचा रस आणि पोळी खाऊन सगळे गप्पा मारत बसले होते. पण ही आपल्याच विचारात दंग.
“जिजुंची आठवण येतेय वाटतं…”,निशा तिला चिडवण्याची एकही संधी सोडत नसे.
“ए आई सांग ना गं हिला.”
“निशू दीदीला त्रास देऊ नको. तू ये मला मदतीला. तिला एकटं सोड. जावईबापूंशी बोलायचं असेल तिला..”,आई ही काही कमी नव्हती.
“आई तू पण…”
“माझ्या लेकीला कोणी काही बोललं तर खबरदार…”,बाबांनी सगळयांना दम दिला.
नाही म्हटलं तरी त्यांचं हे चिडवणं वृंदाला सुखावून जात होतं. आता कधी एकदा परत जातेय असं तिला झालेलं.
आणि तो दिवस आलाच. निनादला कामानिमित्ताने घ्यायला यायला जमणार नव्हते. म्हणून वृंदा एकटीच मुंबईला यायला निघाली. तिच्याकडे घराची चावी होती. दरवाजा उघडून बघते तर घरात हाऽऽ पसारा. टॉवेल खुर्चीवर पडलेला, अंथरुण तसंच जागच्या जागी न आवरता पडलेलं, सॉक्सच्या जोडया एका कोप-यात फेकल्या सारख्या, किचन च्या ओट्यावर खरकटी चहा नाश्त्याची भांडी तशीच..बाथरुम मध्ये कपडे बादलीत जमलेले.. मग काय.. वृंदाने तिची bag बाजूला ठेवली. फ्रेश झाली आणि लागली घर आवरायला. तेवढ्यात निनाद चा फोन आला.
“हेलो पोचलीस का घरी?”
“ हो पोचले मी”
“एवढी धाप लागल्या सारखी का बोलत आहेस?”
“घर आवरतेय.”
“ओह.. sorry… एरवी मी स्वत:च आवरायचो गं. इकडे पहिल्यांदा आली तेव्हा बघितलं ना…आता तुझी सव…”, निनादने बोलता बोलता जीभ चावली.
“मी काही बोलले का?”,वृंदा ला साधारण अंदाज आलाच होता की निनादच्या मनात काय आहे. पण खात्री नव्हती.
“तसं नाही गं. बरं मी लवकर यायचा प्रयत्न करतो. Take care. Bye .”, उगीच जास्त बोललं जाईल म्हणून निनादने बोलणं आवरतं घेतलं.
“हो ठीके..bye”,वृंदाने फोन ठेवला आणि कामाला लागली.
संध्याकाळी जेव्हा निनाद घरी आला तेव्हा त्याला खरंच घरात आल्यासारखं वाटत होतं. प्रत्येक गोष्ट जागच्या जागी होती. देव्हा-यातील दिवा मंद तेवत होता. बाजूलाच लावलेल्या अगरबत्तीचा सुगंध मन प्रसन्न करत होता. वृंदा hall मध्ये दिसत नव्हती. त्याने चाहूल घेतली तर ती आत बेडरूम मध्ये आहे हे त्याने ओळखले. Fresh होऊन तो बाहेर cot वर येऊन बसला आणि मोबाइल चाळू लागला. तेवढ्यात त्याच्यासमोर वाफाळता चहा आणि गरमागरम भजी आली. तो वृंदाकडे बघतंच राहीला.
वृंदाने आज खुप दिवसांनी साडी घातली होती. लाल रंगाची चमकीली लाल बॉर्डर असलेली plain साडी, त्यावर black स्लीवलेस ब्लाऊज, पदर सगळा पिन करुन वरती लावलेला आणि पायापर्यंत खाली सोडलेला, ब्लाऊज च्या मागच्या मोठ्या चौकोनी गळ्याला बांधलेली लेस आणि त्यावरचं सोनेरी लटकन, नुकतंच धुतलेले केस दुस-या बाजुने पुढे घेतलेले, डोळ्यात हलकं काजळ आणि ओठांवर हलक्या गुलाबी रंगाची लिपस्टिक.. तिने चहा द्यायला हात पुढे केला तर निनाद भान विसरुन तिच्याकडे बघतंच बसला. चहा घ्यायचं त्याला सुचलंच नाही.
“चहाऽऽऽ“,वृंदाने हसत चहा पुढे केला.
“ओह हा…”, निनादने भानावर येत म्हटलं आणि चहा घेतला. “छान दिसतेय आज. काही विशेष..”
“हो विशेष तर आहे…”
विचारु की नको असं मनात ठरवत त्याने विचारलंच,”काय?”
“सांगते नंतर.. आधी चहा घे.”
“तू कधी बनवला चहा? तू तर आत होतीस?”
त्याच्या या वाक्यावर वृंदा ने चमकून वर पाहिले. निनादने पटकन जीभ चावली.
“ मी आधीच चहा आणि भजी बनवून ठेवली होती..”
“तुला कसं माहीत मी कधी येईन ते?”
“ मी office मध्ये फोन केला होता..”